FW: लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ....श्रमदानातून होणार आदिवासी गावाचा विकास

11 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 4, 2017, 2:27:53 PM1/4/17
to AYUSH google group

 

 

From: AYUSH main [mailto:ay...@adiyuva.in]
Sent: Thursday, 5 January, 2017 12:30 AM
To: AYUSH main
Subject: FW:
लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ....श्रमदानातून होणार आदिवासी गावाचा विकास

 

 

 

 

From: vijaykumar ghote [mailto:vijayk...@gmail.com]
Sent: Tuesday, 3 January, 2017 9:53 AM
To: AYUSH Adivasi Yuva Shakti
Subject:
लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ....श्रमदानातून होणार आदिवासी गावाचा विकास

 

 लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ......नवीन वर्षाचे  स्वागत  ग्रामस्वच्छता अभियानाने ..! धागुर ता. दिंडोरी या गावात नवीन वर्षाचे स्वागत ग्रामस्वच्छता अभियानाने केले  . गावातील सर्व नागरिक, परिसरातील काही सामाजिक संस्था ,मंडळे  सहभागी झाले होते  .   धागुर हे नाशिक आणि दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर वसलेले साधारणता १२३० लोकवस्तीचे आदिवासी गाव . नाशिक शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर आहे . परिसर शेतीविकासात आघाडीवर असला तरी गावात फारसा विकास झालेला नाही . नागरिकांच्या मुलभूत गरजा आहे तश्याच आहेत . जानेवारी २०१७ पासून " लोकसहभागातून विकासाकडे "  चा नारा देत विकासाच्या दिशेने पाउले पडली  .  धागुर गावाच्या सर्व नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत ग्राम स्वच्छता मोहिमेने केले .  गावातील विविध समस्यांचा अभ्यास करून त्या समस्या शासकीय निधी व लोकसहभागातून सोडवल्या जाणार आहेत त्यासाठी मानस फाऊंडेशन , नेचर क्लब ,या सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार असून  महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या दुरुस्थिसाठी आघाडीवर असलेल्या " दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान नाशिक. या संस्थेचा मोठा सहभाग असणार आहे .   गावाच्या परिसरात विविध विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत त्यात सार्वजनिक घन कचरा व्यवस्थापन केंद्र , गावातून निघणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प , गावाच्या  मालकीचा बायोगॅस प्रकल्प , गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण , रोजगार हमी योजना आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जाणार आहेत .   या मोहिमेत दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान , नेचर क्लब ,नाशिक , गोल्ड जिम नाशिक . आदीसह अनेक सामाजिक  संस्था  सहभाग  झाल्या होत्या  . गाव विकासाबरोबर गावातील नागरिकांना गाव पातळीवर रोजगार निर्मिती केली जाणार आहे . धागुर गावच्या सरपंच वर्षा निंबेकर , उपसरपंच भास्कर बुरुंगे , सदस्य  संगीता पडवळे , लक्ष्मण कुंदे , ग्रामविकास अधिकारी  श्रीमती गवारे , संगीता दोंदे , समाधान भोये , दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदजी बोरा , भीमराव राजोळे , आशिष बनकर ,आकाश जाधव , सागर घोलप , प्रेम जगताप ,  आदीसह  गावातील सर्व नागरिक यात सहभागी झाले होते  . गावाचं www.gramdhagur.com  गावाची संपूर्ण माहिती देणारे संकेत स्थळ लवकरच सुरु केले जाणार आहे . धागुर हे गाव लवकरच स्मार्ट व डिजिटल विलेज म्हणून भारताच्या नकाशात चमकेल . गावाच्या विकासात अनेक कंपन्याना सहभागी केले जाणार  असल्याची  माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय घोटे यांनी दिली .     

Reply all
Reply to author
Forward
0 new messages