नाव घेतल कि जाणकार व्यक्तीना पोट धरून हसण्या शिवाय पर्याय नाही उरत, आणि न जाननार्यांनी जाणून घ्या ठकाबाबा कोण आहेत, आदिवासी समाजातील एक उपेक्षित कलाकार जे आदिवासी नसते तर आज कुठे तरी समाजात एखाद्या मानकरी असल्याचे जीवन जगले असते, समाजात त्याना चांगले स्थान असते शब्द रचना समजून घेण्यासारखी आहे, उगच वाक्यांची फेराफेरी नको म्हणून स्पष्ट बोलन आहे. इथे मान नाही अस नाही परंतु मान कोणता हे सुधा माहित हव. ठ्काबाबा आपल्यातील असून देखील आपल्याच बऱ्याच श्या समाज बांधवाना माहित नाही कि हे कोण.
ठकाबाबांना मी न शब्द वर्णित अश्या अवस्थेत पाहिलं त्यावरून मी स्वतः ची समाजातील लायकी समजून घेतली अस समजण्यास अडचण नाही. साल २०१३ मध्ये भंडारदरा येथे मी देखील फिरण्यास गेलो असता, निदर्शनास आले होते कि ठकाबाबा स्वत जवळील पत्रक लोकाना दाखवीत व त्या लोकांचे मनोरंजन करत, ते लोक पत्रकातील दाखविल्या प्रमाणे म्हणत बाबा याचा आवाज दाखवा बाबा त्याचा आवाज दाखवा काढून, जीव तुटत होता परंतु माझ्या समोर उपाय काही नव्हता. आपल्यातील एक कलाकार इतक्या उपेक्षित अवस्थेत आणि तो कालाकार ज्यान आदिवासी नाव गाजवल.
ठकाबाबा राहणार मु. पो. उडदावने तालुका अकोले, जन्म १९ डिसेंबर १९३२ साली सध्या वय ८२ तरी देखील तरुणाला लाजवेल इतका जोश. अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, हेच काय अवघा भारत भर आदिवासी नाव गाजवणारे ठकाबाबा आज समाजात उपेक्षित अवस्थेत जगत आहेत, उपेक्षित म्हणजे ज्या रुबबाबत आज त्यांच्या कार्यामुळे त्यांनी जगायला हव होत तो रुबाब नाही. ठकाबाबान पेन्शन मिळावी म्हणून त्यांच्या मुलाने आज पर्यंत ४ फाईली प्रकल्प ओफिस मध्ये दाखल केल्यात परंतु कोणी हि दखल घेतली नाही आणि आजही कोणाला दाखल घ्यवी अस वाटल देखील नाही.
ठकाबाबाचे कार्य आमच्या पिढीला नाही जमणार करण् ते आमच्या पर्यंत आलच नाही तरी देखील प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न असेल, कांबड नृत्य, कळसूबाई च्या पायथ्यशी राहणारे आदिवासींचे हे नृत्य पारंपारिक रीतीने चालत आले आहे. ठकाबाबा यांच्या पथकाला सन, १९६५ साली २६ जानेवारीला गणराज्य नृत्य स्पर्धेसाठी दिल्ली येथे २० दिवस ठेवण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्री व इंदिरा गांधी यांच्या हस्ते सदरील पथकास सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.
ठकाबाबा व त्यांचे पथक आदिवासी नृत्य कला भंडारदरा पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटकांस आपल्या कलेतून अनेक वर्षा पासून मनोरंजन करीत आलेले आहेत. मुळात येथे मनोरंजन हा शब्द वापरन म्हणजे ठकाबाबान्चा अपमान केल्या सारख आहे कारण त्यांची ती कला आहे ते नृत्य आपली संस्कृती आहे कोणाच्या मनोरंजनाची सोय नाही. ह्या कलेचे देणे हे पूर्वजांचे देणे आहे. या कले मुळे आदिवासी वेगळा कसा आहे समजत. ठकाबाबा प्राण्यांचे तसेच पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढतात. शारिरीक कला देखील करतात त्यात म्हत्वाच चेहऱ्यात बदल घडवून आनन म्हणजे गुप्तहेर म्हणून काम केल असत कोणाच्या बपाच्यान पकडले नसते गेले कधी इतका. यांसोबत आदिवासी संस्कृती लग्नाची गाणी, आणि नृत्य प्रकार.
ठकाबाबा यांनी आता पर्यंत भारतभर कार्यक्रम केलीत खूप ठिकाणी मान सन्मान झाला उपस्थितांची मने जिंकली आणि हेच खर कलाकाराच सुख आहे, ठकाबाबा यांना विविध ठिकाणी विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेल आहे त्यातील प्रतिभा रत्न पुरस्कार, सार्वमत परिपत्र पुरस्कार, सुवर्ण पदक सर्व पल्ली राधाकृष्ण यांचे कडून, तत्कालीन आदिवासी सचिव पांडा साहेब यांचे कडून सन्मान व सन्मान पत्रक, भीमथडी बारामती पुरस्कार, सारडा कॉलेज अहमदनगर यांचे कडून सन्मान व गौरव, पोलिस खात्याकडून देखील गौरव कृष्णप्रकाश यांनी ठकाबाबा यांचा सत्कार केला, तसेच एका कार्यक्रमात कवी वाहरू दादा यांचा ठकाबाबा यांच्याकडून पुरस्कार देऊन सन्मान, असे आजून बरेच पुरस्कार आणि सन्मान भेटले भारतभर, घरा मध्ये ठीगभर प्रमाणपत्रे परंतु त्यांवर एक वेळेचा चाहा देखील उकळणार नाही, मग त्यांचा उपयोग काय.
अश्या कलावंताची आपल्याच आदिवासी खात्याला दखल घ्यावी म्हणून सुधा वाटल नाही हि खेदाची बाब आहे. खेतेवाडीच्या मेळाव्या च्या निमीत्तान पुन्हा ठकाबाबाची भेट झाली म्हणून बर वाटलं त्यांची व त्यांच्या कार्याची समाजाला जान व्ह्यावी म्हणून हा छोटासा प्रयत्न.
जय आदिवासी
प्रविण धांडे