From: AYUSH main [mailto:ay...@adiyuva.in]
Sent: Thursday, 5 January, 2017 12:30 AM
To: AYUSH main
Subject: FW: लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ....श्रमदानातून होणार आदिवासी गावाचा विकास
From: vijaykumar ghote [mailto:vijayk...@gmail.com]
Sent: Tuesday, 3 January, 2017 9:53 AM
To: AYUSH Adivasi Yuva Shakti
Subject: लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ....श्रमदानातून होणार आदिवासी गावाचा विकास
लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ......नवीन वर्षाचे स्वागत ग्रामस्वच्छता अभियानाने ..! धागुर ता. दिंडोरी या गावात नवीन वर्षाचे स्वागत ग्रामस्वच्छता अभियानाने केले . गावातील सर्व नागरिक, परिसरातील काही सामाजिक संस्था ,मंडळे सहभागी झाले होते . धागुर हे नाशिक आणि दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर वसलेले साधारणता १२३० लोकवस्तीचे आदिवासी गाव . नाशिक शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर आहे . परिसर शेतीविकासात आघाडीवर असला तरी गावात फारसा विकास झालेला नाही . नागरिकांच्या मुलभूत गरजा आहे तश्याच आहेत . जानेवारी २०१७ पासून " लोकसहभागातून विकासाकडे " चा नारा देत विकासाच्या दिशेने पाउले पडली . धागुर गावाच्या सर्व नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत ग्राम स्वच्छता मोहिमेने केले . गावातील विविध समस्यांचा अभ्यास करून त्या समस्या शासकीय निधी व लोकसहभागातून सोडवल्या जाणार आहेत त्यासाठी मानस फाऊंडेशन , नेचर क्लब ,या सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार असून महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या दुरुस्थिसाठी आघाडीवर असलेल्या " दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान नाशिक. या संस्थेचा मोठा सहभाग असणार आहे . गावाच्या परिसरात विविध विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत त्यात सार्वजनिक घन कचरा व्यवस्थापन केंद्र , गावातून निघणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प , गावाच्या मालकीचा बायोगॅस प्रकल्प , गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण , रोजगार हमी योजना आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जाणार आहेत . या मोहिमेत दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान , नेचर क्लब ,नाशिक , गोल्ड जिम नाशिक . आदीसह अनेक सामाजिक संस्था सहभाग झाल्या होत्या . गाव विकासाबरोबर गावातील नागरिकांना गाव पातळीवर रोजगार निर्मिती केली जाणार आहे . धागुर गावच्या सरपंच वर्षा निंबेकर , उपसरपंच भास्कर बुरुंगे , सदस्य संगीता पडवळे , लक्ष्मण कुंदे , ग्रामविकास अधिकारी श्रीमती गवारे , संगीता दोंदे , समाधान भोये , दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदजी बोरा , भीमराव राजोळे , आशिष बनकर ,आकाश जाधव , सागर घोलप , प्रेम जगताप , आदीसह गावातील सर्व नागरिक यात सहभागी झाले होते . गावाचं www.gramdhagur.com गावाची संपूर्ण माहिती देणारे संकेत स्थळ लवकरच सुरु केले जाणार आहे . धागुर हे गाव लवकरच स्मार्ट व डिजिटल विलेज म्हणून भारताच्या नकाशात चमकेल . गावाच्या विकासात अनेक कंपन्याना सहभागी केले जाणार असल्याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय घोटे यांनी दिली .