आदिवासी एकजुटिचा विजय असो ......
किनवट व राज्यातील बोगस विरोधी आंदोलन पेटल्याशिवाय रहानार नाही ..आज सकाळ पासुनच सर्वत्र या बोगस विरोधी आंदोलन छेडन्याचे ठरवत आहेत ...उद्या पासुन नाशिक ,जळगाव ,परभणी .जालना ,बिड ,येथिल आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असुन त्यानी निवेदन देन्याचे ठरवले आहेत ..तसेच इतर जिल्ह्यातुन निवेदन देण्याबाबत तय्यारी चालु आहे ...किनवट्च्या धरर्तिवर सर्वत्र बोगस लोकांवर गुनहे दाखल झाले पाहिजे ...आज शिक्षण घेवुन सुद्धा आदिवासी तरुण बेरोजगार आहे ...या बद्द्ल सर्व आदिवासी विद्यार्थी संघटना निवेदन देनार आहेत ...राज्यात सर्वत्र बोगस असुन त्यांच्या विरुद्ध फक्त आदिवासी IAS अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड साहेब कार्यवाही करतात ...10 लोकांवर गुनहे दाखल करतात ...या निडर अधिकारी यांची बदली करन्यासाठी बोगस आंदोलन करणार आहेत ..अश्या कर्तव्य दक्ष अधिकार्यासाठी सर्व समाजाने पुढे येणे महत्वाचे आहे ..आज सकाळ वर्तमान पत्रात डॉ . भारुड साहेबानी इतर समाजाला आव्हान केले असुन .आदिवासी समाजाला विकासापासुन वंचित फक्त बोगस लोकान्मुळे रहावे लागले त्या मुळे सर्व समाजाने सहकार्य करा ..असे सांगितले ...सर्व समाजबांधव सहकार्य करत आहेत पन आपण खरे आदिवासी म्हनुन आपल्याला पुढे यावे लागेल ...शासनाला डोळे उघडुन पहावेच लागेल ..खरया आदिवासींची दखल घ्यावीच लागेल ..अन्यथा येनार्या काळात सर्व आदिवासी संघटना योग्य ती दखल घेतीलच ..राज्यभर निवेदन द्या व व्हाट्स अप वर , फेसबुक , वर्तमान पत्रात प्रेकाशित करा ...आपली संख्या तरी कळु द्या ....सर्व संघटनांचे प्रेतिनिधीनी तय्यारीला लागलेले बघुन बरे वाटत आहे ..हि आदिवासी एकजुटिची ताकत आहे ...जय आदिवासी ...डॉ .सतिश पाचपुते .
बोगस आदिवसीना कुणी लाडवले ? - Madhav Sarkunde
किनवटमध्ये बोगस आदिवासींच्या विरोधात मोर्चा निघाल्यानंतर वाटस अप्पावर ते प्रकरण वायरल झाले आणी कालपासून अनेक पोस्ट येणे सुरु झाले. हे सारे बघून फार बरे वाटले कि आता आदिवासी तरुण जागा झालाय.त्याला त्याच्या हक्काची जाणीव झाली त्याला.आपला हितशत्रू कोण आहे ह्याची पुसटशी जाणीव झाली.म्हणून मी या तरुणांचे अभिनंदन करतो तसेच किनवट येथील उप-जिल्हा अधिकारी डॉ भारुड साहेबांचे विशेष आभार मानतो
कॉंग्रेसच जबाबदार :
खरे म्हणजे हा मन्नेरवार्लूचा हा प्रश्न जुनाच आहे. त्याला कॉंग्रेस फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. हे सरकार येण्या पूर्वी महारष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यांच्या काळात मराठवाड्याबरोबर अनेक विभागात बोगस आदिवासींनी जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले माझ्या माहितीनुसार एकट्या मराठवाड्यात मन्नेरवार्लू या जातीने २४ हजार वैधत प्रमाणपत्र मिळवून घेतले. आणि तेसुद्धा तिकडली कॉंग्रेसच्या कृपेनीच.म्हणून आता आदिवासींनी एका मोर्चा मा.अशोकराव चव्हाण ह्यांच्या घरावरसुद्धा काढाल पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे कि ते ख-या आदिवासींची बाजू घेणार कि नाही ? कारण सुरवातीपासून आदिवसी कॉंग्रेसची बाजू घेत आलाआहे.आणि कॉंग्रसचे नेते खोट्या आदिवासींची बाजू घेत आले.ही या प्रकरणातली खरी गोम आहे.
राजीव सातव झोपलेत का ?
खरेच बोगस आदिवासींची घुसखोरी ख-या आदिवासिंवरचे फार मोठे संकट आहे.या संकटाशी आज आदिवासी तरुण लढत आहेत. परंतु ज्या आदिवसींचे मत घेऊन जे सातव निवडून आले ते मात्र मुग गिळून बसले आहेत.असे का? त्यांनी ख-या आदिवासींच्या बाजूने उभे राहून बोगस आदिवासींना आव्हान केला पाहीजेत.परंतु ते मात्र तसे करत नाहीत.त्यांना फक्त आदिवासीचे मत हवीत. त्यांच्या सुखादुखाबद्दल काही सूतक नाही. अशी आहे इथली राजनीती.सातव आदिवासिना मुर्ख तर समजत नाहीत? खासदार सातवाना आदिवासींनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. म्हणून त्यांनी प्राधाण्याक्रमाने आदिवासींच्या बाजूने राहिले पाहिजे. मागच्या वेळीसुद्धा राजीव सातव धनगरांची बाजू घेवून राज्य मंत्री मंडळात गेले होते. राजीव सातव ह्यांच्याही घरावर मोर्चा नेला पाहिजे.
डॉ टाराफे तुम्ही नेतृत्व करा
अशा वेळी आमदार डॉ टाराफे ह्यांनी रान उठवायला हवे. या आंदोलनात ते कुठे दिसत नाहीत. कुणी म्हणतात ते विदेशात गेलेत. ते खरे आहे का ? किमान सोसलं मेडिया अथवा प्रिंट मेडियामध्ये आपले मतं तर मांडा.कारण असेच काही क्षणं असतात कि जे तुम्हाला इतिहासात कायमचे स्थान देत असतात.संतोषराव संधी गमावू नका. समाज आणि राजसत्ता या पैकी समाजाची निवड करणारेच खरे नेते असतात ,बाकी सारे मतलबी राजकारणी !
.आदिवासी प्रश्नांचे खेळणे करू नका.
आज आदिवासीच्या हक्कावर चारी बाजूने हल्ले हमले होता आहे. विषमतावादी शक्ती - मग ते कॉंग्रेसची असो कि बीजेपी - आदिवासींना पार नेस्तानाबूत करण्यासाठी तत्पर आहे. म्हणून आदिवासीचा लढा लढतांना विचारपूर्वक व गंभीरपणे लढला पाहिजे.केवळ वाटस अप्पवर बकवाजबाजी करू नये. प्रसिद्धीसाठी लढाई लढणारे आपल्या शत्रुपेक्षाही भयानक असत्तात.अशा मूर्खाना वेळीच फटकारले पाहिजे. आदिवासी हक्काचा लढा हा आदिवासींच्या जीवन मरणाचा लढा. त्याचे खेळणे करून मनोरंजन करू नका ! - Madhav Sarkunde