।। वारली चित्रकला उपक्रम माहिती मे २०१९ ।।

7 показвания
Преминаване към първото непрочетено съобщение

AYUSH | adivasi yuva shakti

непрочетено,
4.06.2019 г., 8:06:534.06.19 г.
до AYUSH | Adivasi Yuva Shakti
।। वारली चित्रकला उपक्रम माहिती मे २०१९ ।।

 आपल्या माहितीसाठी या महिन्यातील उपक्रम माहिती. 
 
१) *कलाकार सर्वेक्षण आणि नोंदणी* : 
नियुक्त ६ समन्वयकां मार्फत कलाकार सर्वेक्षण आणि नोंदणी करण्यात आली डहाणू, तलासरी, पालघर तालुक्यातून संपर्क करून आवश्यक माहिती संकलित करण्यात आली. २०८ जणांची नोंदणी झाली आहे. 
*जास्तीत जास्त कलाकारांनी आणि इच्छुक युवकांनी सहभागी व्हावे* आपल्या संपर्कात कळवावे 
 
२) *क्षमता बांधणी* : 
या उपक्रमासाठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. त्यामुळे निर्धारीत कार्य अधिक सुलभ पद्धतीने होईल. 

३) *प्रकल्प प्रगती बैठक*
क्वेस्ट (Quality Evaluation for Sustainable Transformation Centre) च्या मुंबई कार्यालयात १३ मे रोजी आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती च्या उपक्रमाविषयी प्रगती अहवालाविषयी बैठक पार पडली त्यात डॉ सुनिल दा पऱ्हाड, चेतन दा गुराडा, आशिष दा डोंबरे सहभागी होऊन माहिती दिली
 
४) *कलाकार एकत्रीकरण गंजाड* : 
१५ मे जिव्या सोमा म्हसे यांचा स्मृती दिन रोजी डॉ सुनिल दा पऱ्हाड, बंडू दा वडाली, स्वप्निल दा दिवे, पूनम चौरे, बबिता वरठा, सुचिता कामडी यांनी त्यांच्या घरी आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली. 
 
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम बद्दल गंजाड येथील काही कलाकारांचा गैर असल्याने. त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा करून सगळ्यांसोबत शंका निरासनासाठी त्यांनी ठरवलेल्या दिवशी १५मे रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. पण त्यातील नेमके कुणीही आले नाहीत. इत्तर उपस्थित कलाकारांसोबत बैठक पार पडली आणि उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.  
 
५) *काहींची शंका* : 
विशेष केंद्रीय सहाय अंतर्गत मंजूर "आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती" योजने संदर्भात २८ मे रोजी प्रकल्प कार्यालयाकडून गंजाड येथील कलाकारानी केलेल्या लेखी आक्षेपा बद्दल पत्र मिळाले त्याचा खुलासा २९ रोजी कार्यालयाला जमा करण्यात आला. 

_काही वयक्तीक आकसा मुळे आक्षेप घेतला असावा असे प्रथम दर्शनी वाटते. (कदाचित २०१७ साली डहाणू रोड स्थानकात रोशनी फाऊंडेशन तर्फे सुशोभीकरण अंतर्गत आदिवासी संस्कृती बद्दल आक्षेपार्य चित्र दुरुस्त करण्याची सूचना आयुश तर्फे केल्याचा राग मनात ठेवला असावा)_. कारण अनेक वर्षांपासून वारली चित्रकलेच्या प्रत्येक उपक्रमाबद्दल सगळी माहिती बैठका, कार्यक्रम, समाज माध्यमे यातून देत आलो आहोत आणि जे जे सहभागी होतात, मार्गदर्शन देतात त्या आधारे विविध रचना केली जाते. 

असो जे जे कलाकार, युवक या उपक्रमात जोडू इच्छितात त्या सगळ्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न गेली १२ वर्ष आहेत आणि ते कायम राहतील. समाज हितासाठी आपल्या सगळ्यांची ऊर्जा कमी यावी हि अपेक्षा. 
 
६) *कलाकार एकत्रीकरण बैठक कासा* : 
२९ मे रोजी कासा येथे कलाकार एकत्रीकरण बैठक पार पडली. रमेश दा हेंगाडी यांनी त्यांचा अनुभव आणि सांस्कृतिक संपदा या बद्दल मार्गदर्शन केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू चे प्रकल्प अधिकारी सौरभ कटारिया उपस्थित होते त्यांनी पण सगळ्यांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. पांडुरंग दा बेलकर यांनी सांस्कृतिक महत्व, इतिहास विषयी माहिती दिली. राम दा उराडे यांनी चित्रकला, वाद्य, संगीत यांचे आदिवाससी जीवनातील महत्व या विषयी माहिती दिली. डॉ सुनिल पऱ्हाड यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. ११४ कलाकार उपस्थित होते त्यांची आवश्यक नोंदणी करून ओळख पत्र देण्यात आले. 
 
७) *गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ* : 
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कलावस्तू: भौगोलिक उपदर्शनी (GI) वस्तूंचा प्रसार व्हावा यासाठी एका गॅलरी तर्फे कालावस्तूंची मागणी करण्यात आली होती. त्यांना नमुना कलावस्तू पुरवण्यात आल्या आहेत. मिळणाऱ्या प्रतिसादावरून पुढील दिशा ठरवले जाईल. कलाकरांना चांगली संधी आहे आंतराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत त्यांच्या कलावस्तू पोचवता येतील.

८) *इ कॉमर्स फोटोग्राफी*
कलाकारांनी जमा केलेल्या कलाकृतींचे फोटोग्राफी करण्यात आली आहे. जेणेकरून कलाकारांचे वयक्तिक प्रोफाईल आणि मार्केटिंग मटेरियल बनविणे सोप्पे होईल. ज्या कलाकारांनी नमुना वस्तू जमा केली नसल्यास त्वरित जमा करावे. 

९) *कलाकृति संचय निर्मिती*
 प्राथमिक इंव्हेटरीसाठी कळकरांकडून कलाकृती खरेदी करण्यात येणार आहेत, जेणेकरून मार्केटिंग ऍक्टिव्हिटी सुरु करता येतील. त्यासाठी जास्तीत जास्त कलाकारांनी निवडक कलाकृती संबंधित माहिती सोबत त्वरित खंबाळे येथील कलाकेंद्रात जमा करावे. 

जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभाग घ्यावा आपल्या संपर्कात कळवावे. नोंदणी साठी .kala.adiyuva.in

पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मिती आणि त्यातुन आर्थिक स्वावलंबन हेतूने प्रयत्न कायम राहतील. Lets do it together, जोहार !

_________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती 
सहकार्य : आदिवासी विकास विभाग 

Sanjay Dabhade

непрочетено,
13.07.2019 г., 2:43:0713.07.19 г.
до adi...@googlegroups.com
♦एससी/ एसटी व इतर मागास 
विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क वसूल करण्यास 
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना प्रतिबंध करणारे ' नोटिफिकेशन ' जाहीर - आपल्या संघटनेच्या प्रयत्नांना यश ....❗
   
♦ ( संदर्भ - डीएमईआर चे नोटिफिकेशन दिनांक १२ 
जुलै २०२९ ....)

प्रिय सर्व साथी , 
कृपया खालील अत्यंत महत्वाच्या नोटिफिकेशनची नोंद घ्यावी हि नम्र विंनती .....
    दिनांक ९ जुलै रोजी आपण 
' आरक्षण हक्क संरक्षण समिती , पुणे ' ह्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्राच्या ' वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग , मुंबई ' DMER
ह्यांना लेखी निवेदन प्रत्यक्ष भेटून दिले होते . 
    महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयातील एससी / एसटी / विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क सरकार भरत असते ....व इतर मागासांचे निम्मे शुल्क सरकार भरते .  परंतु खासगी महाविद्यालये मात्र लाखो रुपयांची फी प्रवेशावेळीच मागतात व विद्यार्थी पालकांना रडकुंडीस आणतात . ह्याला प्रतिबंध करणारे नोटिफिकेशन त्वरित म्हणजे विद्यार्थी जॉइनिंग ला जाण्या आधीच प्रकाशित करावे अशी मागणी आपण केली होती .
   त्यानुसार दिनांक १२ जुलै रोजीच म्हणजे विद्यार्थ्यांचे जॉइनिंग सुरु होण्याच्या एक दिवस आधीच ' वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग , मुंबई ह्यांनी तसे अत्यंत महत्वाचे नोटिफिकेशन जारी केले आहे .
    जर महाराष्ट्रातील कोणत्याही खाजगी वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयाने एससी एसटी विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क मागितले तर त्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल , असा स्पष्ट इशारा ह्या नोटिफिकेशन द्वारे शासनाने दिलेला आहे .  
  हे नोटिफिकेशन विद्यार्थी व पालकांनी प्रवेशाच्या वेळेस नक्की घेऊन जावे ......❗

   आपला , 
♦डॉ .संजय दाभाडे , 
       पुणे ....
     ९८२३५२९५०५ .....

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c7f7b448-1e1f-462f-9327-449e5d4a5c2b%40googlegroups.com.
IMG-20190713-WA0004.jpg

चेतन Chetan

непрочетено,
14.07.2019 г., 13:31:0614.07.19 г.
до adi...@googlegroups.com
जोहार
जिंदाबाद

Отговор до всички
Отговор до автора
Препращане
0 нови съобщения