आदिवासी लेखणीतुन साकारतोय 'पहाडी फुलोरा'
मराठी साहित्यात आज आदिवासी साहित्याची धुरा पेलणारे आदिवासी साहित्यिक निर्माण होत आहेत ही सर्वाधिक आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आदिवासींचं जगणं, दुःख, संस्कृती, परंपरा, जीवनशैली, निसर्गाशी असलेलं नातं, आव्हाने, स्थलांतर असे विविध पैलू आपल्या लेखणीतुन मांडत असताना अनेकांनी आदिवासींचा वाट्टेल तसा वापर केल्याचे दिसून येते. साहित्याची उंची तर वाढत होता, परंतु त्या ओझ्याखाली आदिवासी दाबला जात होता. त्याच्या पात्रातून नको त्या गोष्टी काल्पनिकपणे वदवून घेतल्या गेल्या. साहित्यिकांना पुरस्कार तर मिळाले पण ज्याच्यावर साहित्य लिहिले गेले त्याची संस्कृती मात्र बाटविण्याचे काम सर्रास केले जात होते आणि आहे.
परिवर्तनाच्या चळवळीत वाहरू सोनवणे, तुकाराम धांडे, भुजंग मेश्राम, नजूबाई गावित, गोविंद गारे या काही आदिवासी विचारवंतांच्या कठोर मेहनतीतुन आदिवासी साहित्याने मराठी साहित्य विश्वात मुहूर्तमेढ रोवली. यांच्या सोबत अनेक साहित्यिक आज आपलं जगणं लेखणीच्या माध्यमातून जगासमोर परखडपणे मांडत आहेत. याच परिवर्तनवादी चळवळीतून राजू ठोकळ यांचा 'पहाडी फुलोरा' हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. DS media publishing ने प्रकाशनाची जबाबदारी उचलून ते विचार पुस्तकरुपाने साकारले आहेत.
काव्य संग्रहातील विचारांना दृश्य रूप देत निखिल आहेर यांनी आपल्या कल्पकतेतून उत्कृष्ट असे मुखपृष्ठ बनविले आहे. मुकुंद साबळे, प्रशांत मोरे, विशाल गोंदके व इतर मित्र परिवार यांनी आपला खारीचा वाटा उचलत काव्य संग्रहाला आर्थिक हातभार लावला आहे. मयूर नवाळे यांनी आपल्या कामातून वेळ काढून कविता मुद्रित केल्याने त्यात जिवंतपणा आणला आहे.
जे जगत आलोय, जे जगत आहे, जे जगावे लागणार आहे हे प्रामाणिकपणे मांडण्याचे काम कवीने केले आहे. दि.25 डिसेंबर 2015 रोजी लाडगाव, ता. अकोले, अहमदनगर येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळाव्यात या काव्य संग्रहाचे प्रकाशन होत आहे. आपण हा पहाडी फुलोरा नक्की स्वीकाराल अशी अपेक्षा करतो.
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c7959688-dd9d-433f-a7ed-d544253bd532%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2TDzfAvWmg%2B4--cy1tzyC276Ejt%3DtP1jAVJi1gfFC7-Qw%40mail.gmail.com.