धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू पाहत आहेत

694 views
Skip to first unread message
Assigned to adi...@gmail.com by me

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 11:42:37 AM7/26/14
to adi...@googlegroups.com

Sign online petition : Click here


धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू पाहत आहेत. पण त्यांचा नामसाधर्म्याचा दावा देखील किती पोकळ आहे ते बघा.

पहिला मुद्दा : ते सांगतात की धनगर (Dhangar) या नावाचे इंग्रजी स्पेलिंग (Dhangad) असे झाले आहे.

प्रतिवाद : धनगर (Dhangar) चे स्पेलिंग चुकले असे एकवेळ मानले तरी त्याचा अर्थ असा की या नावाच्या जातीचे नाव मराठीत अथवा त्या जातीच्या बोलीभाषेतही उच्चारानुसार 'धनगड' असे असायला हवे. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाच्या सुचीत असलेल्या या जातीचे खरे नाव "धांगड" असे आहे, आणि तीही "ओरांव" या आदिवासी जातीची उपजात आहे. जे आरक्षण आहे ते 'धांगड' या उपजातीस आहे. आणि 'धांगड' व 'धनगर' या मूळ नावांत कितीही जीभ ताणून पाहिले तरीही उच्चारानुसार दुरान्वये ही साधर्म्य आढळत नाही. धनगर म्हणतात की इंग्रजीत 'र'(R) च्या जागी 'ड' (D) असे लिहिले जाते. हा एक मोठाच जावईशोध म्हणावा लागेल. हे खरे आहे की इंग्रजीत 'र' आणि 'ड' यांचा बदल होतो, परंतु हा बदल नेहमी 'ड' चा 'र' असा होतो तो कधीही 'र' चा 'ड' होत नाही. (उदाहरणार्थ 'साडी' हा शब्द 'सारी' (Sari) असा होतो, 'अनाडी' हा शब्द 'अनारी' (Anari) असा होतो, परंतु नारी हा शब्द कधीही नाडी असा होत नाही, वारी हा शब्द कधीही वाडी असा होत नाही. धारवाड हे Dharwar लिहिता येऊ शकते मात्र कारवार हे कधीही Karwad (कारवाड) असे लिहिले जाऊ शकत नाही. अशी अनेको उदाहरणे देता येतील) मग जर इंग्रजीचे स्पेलिंग चुकले असेलच तर धनगड (Dhangad) चे धनगर (Dhangar) होऊ शकते मात्र कधीही धनगर (Dhangar) चे धनगड/ धांगड (Dhangad) असे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे धनगर बांधवांचा दावा की 'धनगर'चे स्पेलिंग Dhangad असे लिहिले गेले आहे हा तांत्रिकदृष्ट्या देखील सपशेल फोल ठरतो. आणि म्हणूनच आपल्या धनगर बांधवांचे असे "र-ड-णे" हे हास्यास्पदच ठरते.

'र' च्या उच्चारणात येणाऱ्या दुर्बलतेला 'रॉटासिजम' असे म्हणतात. हा अनेक भाषांत आहे. आयरिश आणि स्कॉटिश भाषेत 'र' आणि 'न' यांचा बदल होतो. स्पॅनिश भाषेत 'र' चा उच्चार 'ट' असा होतो. म्हणजे इंग्रजांऐवजी स्पेनने भारतावर राज्य केले असते तर धनगरांच्या डोक्यात ही कल्पनाही आली नसती.

दुसरा मुद्दा : धनगर म्हणतात की त्यांस छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये धनवार (dhanwar) या नावाने आरक्षण मिळाले असून तेथील धनवार व महाराष्ट्रातील धनगर हे एकच आहेत.

प्रतिवाद : पहिल्या मुद्द्यात दावा केलेली Dhangad (धांगड) आणि छत्तीसगड व मध्यप्रदेश येथील Dhanwar (धनवार) या दोन्ही वेगवेगळ्या जमाती आहेत. धनगरांचा नेमका दावा 'धांगड' वर आहे की 'धनवार'वर आहे हे त्यांचे त्यांनाच पुरेसे स्पष्ट नाही. धनवार आणि धनगर या जातींत संस्कृती, चालीरीती, धार्मिक परंपरा, देवदैवते, भाषा, पेहराव यापैकी काहीही समान नाही. मग ते एक कसे ठरतील? आता धनगर बांधवांचा असा तर दावा नाही ना की इंग्रजीत g चा सुद्धा w होतो, कारण त्याशिवाय Dhangar चे Dhanwar होऊ शकत नाही.

२०१३ साली धनवार या जातीशी नामसाधर्म्य साधणारी दोन जातीनामे छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींत सामील करण्यास हिरवा कंदील मिळाला. ती दोन नावे धनुवार/धनुहार अशी आहेत. दोन्ही शब्दांत 'न' या अक्षरास उकार आहे, त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुद्धा धनगर अनुसूचित जमातींत येऊ शकत नाहीत. कारण धनगर या शब्दात उकार नाहीच. त्यामुळे त्यांत नामसाधर्म्य देखील आढळत नाही.

बहुदा आपले धनगर बांधव अनुसूचित जमातीची कलम ३४२ नुसार केलेली व्याख्याच वाचायला विसरले असावेत. त्यात स्पष्ट लिहिले आहे की अनुसूचित जमाती केवळ त्यांनाच म्हणता येईल की ज्यांत १) आदिम वैशिष्ट्ये असतील, २) त्यांची वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असेल, ३) ते भौगोलिक दृष्ट्या पृथक असतील म्हणजेच त्यांच्या वास्तव्याचा प्रदेश हा निश्चित आणि दुर्गम असेल, ४) ते इतर जमातींत मिसळण्यास कचरत असतील.

यापैकी मुद्धा २ म्हणजे वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ही एक व्यापक व्याख्या आहे आणि भारतातील सर्वच जातींची आणि धर्मांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. (उदाहरणार्थ ब्राम्हण, जैन, पारसी, मुस्लिम, शीख या सगळ्यांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.) पण म्हणून याचा अर्थ असा नाही की ते सुद्धा अनुसूचित जमाती ठरण्यास पात्र आहेत.

मग बाकीचे मुद्दे पहिले तर असे लक्षात येते की धनगर या जातीत कोणतीही आदिम वैशिष्ट्ये नाहीत. ते भौगोलिक दृष्ट्या अजिबात पृथक नाहीत. (पृथक भौगोलिक क्षेत्र हे अनुसूचित जमातींचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.) उलट त्यांची वस्तीस्थाने ही नेहमी बदलत राहतात, त्यामुळे त्यांना मिळालेले भटक्या जमाती हे आरक्षणच योग्य आहे. धनगर दुर्गम भागात वास्तव्य करीत नाहीत, त्यांचे वास्तव्य हे कायम नागरी वस्तींत असते. ते इतर जमातींत व्यवहारासाठी मिसळण्यास कचरत नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे धनगर हे अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.


Rahul C Bhangare

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 11:46:03 AM7/26/14
to adi...@googlegroups.com

अनुसूचित जमाती आणि धनगर यांतील फरक

१) व्यवसाय:

अनुसूचित जमातींचा कोणताही वंशपरंपरागत अर्थार्जनाचा व्यवसाय नसतो. अगदी अलीकडच्या काळात ते स्थायी शेती करू लागले आहेत. मात्र धनगर हे वंशपरंपरेने पशुपालक आहेत. धनगरांकडे मेंढ्या, शेळ्या, म्हशी, घोडे असे मोठ्या भांडवली किंमतीचे पशु असतात. ते पशुआधारित दुधाचा व्यवसाय, लोकरीचा व्यवसाय, पशुमांस विकण्याचा व्यवसाय, सुत कातण्याचा व्यवसाय, शेळी मेंढी पालन हे व्यवसाय करून अर्थार्जन करतात. अनुसूचित जमातीचे लोक जे पशु पाळतात ते व्यवसाय म्हणून नव्हे तर वैयक्तिक उपयोगासाठी पाळतात. जसे शेतीसाठी बैल किंवा राखणीसाठी कुत्रा वगैरे. त्यामुळे आर्थिक मिळकतीसाठी पशु पाळणारे धनगर अनुसूचित जमाती या वर्गीकरणात बसत नाहीत.

२) भौगोलिक प्रदेश:

अनुसूचित जमातीचे निकष ठरविण्यासाठी संविधानाच्या ३४२व्या कलमात असे स्पष्ट लिहिले आहे की त्यांचा वास्तव्याचा प्रदेश हा पृथक असायला हवा (Geographical isolation). याचा अर्थ असा की अनुसूचित जमातीच्या लोकांचा वास्तव्याचा प्रदेश हा एका छोट्या भौगोलिक क्षेत्रातच सीमित असून, तो इतर नागरी वस्तीपासून पूर्णत: अलिप्त असतो. अनुसूचित जमातींच्या गावांत शक्यतो केवळ एकाच जमातीच्या माणसांची वस्ती असते.

याउलट धनगर हे नेहमी स्थलांतर करीत असल्याने त्यांचा कोणताही भौगोलिक प्रदेश निश्चित नाही. धनगरांची वसतिस्थाने ही वेगळी असली तरी ती पृथक/अलिप्त नसतात (non-isolated). त्यांची वस्ती ही नेहमी इतर नागरी वस्त्यांच्याच सान्निध्यात असते. मराठा आणि इतर उच्चवर्णीय जातींतच धनगर समाजाची वस्ती आहे, त्यामुळे त्या वस्त्या पृथक म्हणजेच isolated ठरत नाहीत. आणि भौगोलिक प्रदेशाचा पृथक (isolated) असणे हा सर्वात महत्वाचा निकष ते पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.

महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जमातींचे भौगोलिक क्षेत्र हे काही जिल्ह्यांपुरातेच मर्यादित आहे, बहुतांश जमाती या वैयक्तिकरित्या प्रामुख्याने प्रत्येकी एक किंवा दोन जिल्ह्यांतीलच ठराविक दुर्गम अलिप्त, आणि पृथक भौगोलिक क्षेत्रांत वसलेल्या आहेत, त्याउलट धनगर समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे, त्यामुळे त्यांचा भौगोलिक प्रदेश हा पृथक (isolated) म्हणताच येऊ शकत नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा काही पृथक (isolated) प्रदेश ठरू शकत नाही.

३) आर्थिक स्थिती

आर्थिक स्थितीचे अचूक आकडे मिळत नाहीत, मात्र काही सरकारी अथवा संशोधन संस्थांची प्रकाशित झालेली आकडेवारी ग्राह्य धरता येऊ शकते.

धनगरांच्या आर्थिक सुबत्तेविषयी माहिती देण्यासाठी एक संदर्भ देतो.

Indian Veterinary Research Institute, Izatnagar आणि Central Avian Research Institute, Izatnagar यांनी केलेला एका सामाजिक आर्थिक अभ्यासमालेचे निष्कर्ष सादर करतो. सदर निष्कर्ष हे Journal of Recent Advances in agriculture या अभ्यासपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. (पूर्ण संदर्भ पुढील प्रमाणे : Socio Economic Profile of Sheep Reared Dhangar Pastoralists of Maharashtra, India, by Patil D. S., Meena H. R., Tripathi H., Kumar S. and Singh D.P., in J. Rec. Adv. Agri. 2012, vol. 1(3): pages 84-91)

वरील अभ्यास निरीक्षणानुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत प्रत्येक धनगर कुटुंबाकडे सरासरी ६९.४८ इतक्या मेंढ्या, आणि २० इतक्या शेळ्या एवढी संपत्ती स्वत:च्या मालकीची होती, आणि ही एक दोन नव्हे तर परीक्षण केलेल्या प्रत्येक कुटुंबाची सरासरी आहे हे विशेष. याव्यतिरिक्त घोडे आणि म्हशी यांचीही उपलब्धता प्रत्येक कुटुंबाकडे उल्लेखनीय संख्येत आहे. याच अभ्यासमालेत असे निदर्शनास आले आहे की एकूण ७३% धनगर कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे ६०००० रुपयांहून अधिक होते. (म्हणजे दरमहा ५००० रुपयांहून अधिक) तर भूमिहीन लोकांची संख्या केवळ १४% होती.

याउलट STATISTICAL PROFILE OF SCHEDULED TRIBES IN INDIA 2010 या जनजातिय कार्य मंत्रालय भारत सरकार, (MINISTRY OF TRIBAL AFFAIRS) यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ५६.६% आदिवासी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. तर २००६-१० च्या दरम्यान करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ४० % हून अधिक आदिवासी लोकसंख्या भूमिहीन होती. या आर्थिक स्थितीच्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की सामाजिक दृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या देखील धनगर हे अनुसूचित जमातींपेक्षा वेगळे आणि अधिक पुढारलेले आहेत,

४) ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक स्थिती

धनगरांचा इतिहास पाहिल्यास पुढील बाबी समोर येतात, विजयनगर साम्राज्याची स्थापना धनगरांनी केली होती. धनगरांनीच होयसाळ, होळकर, राष्ट्रकुट, मौर्य आणि पल्लव या इतिहासातील मोठ्या राजसत्ता स्थापन केल्या आहेत. प्रसिद्ध कवी कालिदास आणि कनकदास हेदेखील धनगर होते. थोडक्यात असे लक्षात येते की धनगरांनी इतिहासात राजसत्ता उपभोगल्या असून, त्यांची सामाजिक स्थिती देखील उत्कर्षाची राहिली आहे. (संदर्भ: http://www.dhangar.org/)

त्याउलट आदिवासी जमातींचा इतिहास पाहिला तर अगदी थेट महाभारतीय काळातही उपेक्षित असलेल्या एकलव्याच्या उदाहरणावरून त्यांच्या ऐतिहासिक दुर्लक्षित, उपेक्षित आणि पृथक सामाजिक परिस्थितीची कल्पना येते.

आणि म्हणूनच धनगर हे अनुसूचित जमातींपासून पूर्णत: वेगळे ठरतात.



Rahul C Bhangare



AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 11:59:05 AM7/26/14
to adi...@googlegroups.com
आज आनंदी आनंद झाला, माझा आदिवासी एक झाला

आज जरी आम्ही शांत, उद्याचे आम्हीच विक्रांत

धनगर आदिवासी असल्याचा जावई शोध लावणारांचा धिक्कार असो


AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2014, 12:06:51 PM7/26/14
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 1:32:15 PM7/27/14
to adi...@googlegroups.com


महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा दाखला (जारी करणे व पडताळणी नियमन) कायदा २०००, कलम ११-१(अ)नुसार, जो कोणी खोटी माहिती देऊन किंवा खोटे विधान किंवा दस्तऐवज किंवा कोणत्याही इतर फसवणुकीच्या मार्गाने (other fraudulent means) खोटे प्रमाणपत्र प्राप्त करील, तो कमीत कमी सहा महिने ते दोन वर्षे कठोर कारावास अथवा दोन हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांस पात्र राहील. 
(According to the THE MAHARASHTRA SCHEDULED CASTES, SCHEDULED TRIBES, DE-NOTIFIED TRIBES (VIMUKKTA JATIS), NOMADIC TRIBES, OTHER BACKWORD CLASSES AND SPECIAL BACKWARD CATEGORY (REGULATION OF ISSUANCE AND VERIFICATION OF)) CASTE CERTIFICATE ACT 2000, Section 11-1(a), Whoever obtains a false certificate by furnishing false information or filling false statement or documents or by any other fraudulent means, shall on conviction be punished with rigourous imprisonment for a term which shall not be less than six months but which may extend upto two years or with fine which shall not be less than two thousand rupees, but which may extend upto twenty thousand rupees or both.)

वरील कायद्यानुसार फसवणुकीच्या मार्गाने (by other fraudulent means) धनगर बांधव अनुसूचित जमातीचे आरक्षणाचा फायदा मिळवू पाहत आहेत. तेव्हा या कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली त्यांचेवर कदाचित केस करता येऊ शकते. मात्र याच कायद्याच्या कलम ११(२) नुसार थेट कोर्टात केस दाखल करता येत नाही. अशी केस फक्त एखादी चौकशी समिती अथवा सदर समितीने नियुक्त केलेला एखादा अधिकारी हाच करू शकतो. तेव्हा या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल अशा प्रकारे केस करता येईल काय याचा कायदेतज्ञांशी मसलत करून विचार करता येईल. तसेच अशाच स्वरूपाच्या इतर कायद्यांतील कलमांनुसार काही गुन्हे दाखल करता येतील का हेदेखील कायदेतज्ञांशी विमर्श करून ठरवता येईल. 
आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. तेव्हा केवळ धनगर बांधवांची मागणी ही चुकीची कशी आहे हे दाखवून देण्याचा बचावात्मक पवित्रा न घेता कायद्याच्या चौकटीतून अशा प्रकारे आक्रमकतेने हा लढा लढला पाहिजे. - 

Rahul C Bhangare

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 1:42:31 PM7/27/14
to adi...@googlegroups.com

जेव्हा देशाला गरज होती

आदिवासी सर्वात पुढे होता

आज आदिवासींना देशाची गरज होती

प्रत्येक जण धनगरांत बसला होता

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 27, 2014, 1:51:06 PM7/27/14
to adi...@googlegroups.com

चेतन Chetan

unread,
Jul 27, 2014, 2:54:33 PM7/27/14
to adi...@googlegroups.com
बोगुस लोकांनी आपल्या  चोरल्या त्यांच्यावर अशी केस टाकली पहिजे भले त्यांना कोर्टाने सोडून दिले आणि strict  action घेतली नाही. हे मुडदे सुद्धा लोकांसमोर आणि मंत्रीमंदाला समोर आले तर आपल्यावरील अन्याय झाला आहे हे त्यानाही कळेल.
जे लोक आदिवासी (S T) status ची demand करत आहेत त्याना सध्या जे आदिवासी आहेत त्यांच्या मध्ये न आणता वेगळ्या status  मध्ये आणले जाईल व त्यांना त्यांच्या  सध्याच्या आरक्षनाचेच फायदे मिळतील हे मंजूर असेल तरच त्यांनी हि demand करावी. जर हे त्यांना मान्य नाही तर याचा अर्थ हाच कि त्यांना आम्हा आदिवासींच्या विविध सरकारी , निमसरकारी आणि शैक्षणिक संस्थामधील रेकाम्या जागेवर  मारायचा आहे
काही reseach paper ची लिंक
http://ignca.nic.in/cd_07013.htm
("The Warlis and the Dhangars The Context of the Commons" -Ajay Dandekar)
http://ignca.nic.in/cd_07014.htm  
"Cultural Dimension of Ecology A Case Study of the Oraons"





--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/71a4d7ff-ce58-4f2a-bba9-c7b0990ff9ab%40googlegroups.com.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

चेतन Chetan

unread,
Jul 27, 2014, 3:04:24 PM7/27/14
to adi...@googlegroups.com, AYUSH Adivasi Yuva Shakti
बोगुस लोकांनी आपल्या  चोरल्या त्यांच्यावर अशी केस टाकली पहिजे भले त्यांना कोर्टाने सोडून दिले आणि strict  action घेतली नाही. हे मु
​द्देसुद्धा लोकांसमोर आणि मंत्रीममंडळा  समोर आले तर आपल्यावरील अन्याय झाला आहे हे त्यानाही कळेल.
जे लोक आदिवासी (S T) status ची demand करत आहेत त्याना सध्या जे आदिवासी आहेत त्यांच्या मध्ये न आणता वेगळ्या status  मध्ये आणले जाईल व त्यांना त्यांच्या  सध्याच्या आरक्षनाचेच फायदे मिळतील हे मंजूर असेल तरच त्यांनी हि demand करावी. जर हे त्यांना मान्य नाही तर याचा अर्थ हाच कि त्यांना आम्हा आदिवासींच्या विविध सरकारी , निमसरकारी आणि शैक्षणिक संस्थामधील 
​रिकाम्या ​
जागेवर 
​​
​डल्ला ​
मारायचा आहे
​. अशा रक्तपिपासू (parasitic)​ लोकांपासून सावध राहयाल पाहिजे.
आमची संस्कृती माणसाला माणूस म्हणून जगवणारी आहे आणि हे धनगर तर अजूनही स्पृश्य अस्पृश्यता पाळतात यांना कोण आदिवासी म्हणेल ?

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 2, 2014, 10:56:51 AM8/2/14
to adi...@googlegroups.com, adi...@gmail.com, chet...@gmail.com

खरे आदिवासी कोण ?

आदिवासींच्या नावाचा गैरफायदा घेऊन आदिवासी माणसांच्या सवलती मिळवण्यासाठी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे . आदिवासी जमातीच्या यादीत अनेक कावळ्यांचा ( List of the Scheduled Tribes ) समावेश करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरु आहे खर्या आदिवासींच्या ताटातले काढून खोट्या आदिवासिना देऊन आदिवासी समाज नष्ट करण्यासाठी राजकीय मंडळी पुरेपूर प्रयत्न करत आहेत . या धर्तीवर खरे आणि खोटे आदिवासी कोण ? सत्यता काय हे आपणास माहित पाहिजे . 
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार संसदेने अनुसूचित जमातींची ( Scheduled Tribes ) यादी अधिसूचित केली आहे . राज्यघटनेतील तरतुदीत अनुसूचित जमातींच्या संदर्भात असे स्पष्ट करण्यात करण्यात आले कि ,’ अनुसूचित जमात किंवा तिचा काही भाग किवा अनुसूचित जमातीच्या अंतर्गत अनुसूचित जमात किंवा फक्त संसद आदिसुच्ना जाहीर करू शकते . या यादीत नवीन अनुसूचित जमातींचा / गटांचा किंवा उपगट यांचा अंतर्भाव करणे ,त्यात दुरुस्ती करणे किंवा एखाद्या गटास /उपगटास वगळण्याचा अधीकार हा राज्यघटनेने संसदेला दिला आहे .” कोणत्याही राज्य सरकारला किंवा केंद्र सरकार ला तो अधिकार नाही . राष्ट्रपती संसदेच्या मान्यतेशिवाय अधिसूचना जाहीर करू शकत नाही .
भारतीय राज्यघटनेतील हि इतकी ठळक तरतूद लक्क्षात न घेता आज अनुसूचित जमातीत घ्या म्हणून अनेक लोक बोंबा मारत आहेत तर अनेक पुढारी फक्त आपली मतपेटी साबूत ठेवण्यासाठी एका पाठोपाठ आश्वासने देत आहेत . आदिवासींमध्ये घ्या म्हणून मागणी करणार्यांचे प्रबोधन करण्याएवजी राजकीय लोक अजून या आगीला हवा देत असून पेटवण्याचा प्रयत्न्न करत आहेत .महाराष्ट्रात एकूण लहान मोठ्या ४७ जमातीचा समावेश अनुसूचित जमातींच्या यादीत करण्यात आलेला आहे या ४७ जमाती आणि त्यांच्या तत्सम जमाती /उपजमाती किंवा गट ,समूह यांच्यातील २८ जमाती गटांच्या ,उप गटाच्या नाम्सादृश किवा पुढे मागे काना ,मात्रा ,उकार वेलांटीचा दुरुपयोग करून बोगस आदिवासी जाती फायदा घेत आहेत .हे विधान खोटे नसून दि. २३/४/१९८६ च्या शासन निर्णयाने व डॉ. फरेरा कमिटीच्या आणि ना. सुधीर जोशी कमिटीच्या नियुक्तीने हे शिद्ध केले आहे .
सामाजिक व सांस्कृतिक उत्क्रांतीचा मार्ग समजण्यासाठी मानवी जीवनाचे सुरुवातीचे रूप आपल्याला आजच्या आदिवासी जमातींच्या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळते . स्वताला आदिवासी म्हणून घेणारे गट बिगर आदिवासी जाती गट ज्या आदिवासी गटाचे ते हक्क सांगतात त्या गटाशी त्यांचा कोणताही सांस्कृतिक ,सामाजिक , संबध दिसत नाही .तसेच ते खर्या आदिवासींच्या सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक कार्यात सण उत्सवात सहभागी होत नाहीत . एखाद्या गटाची किंवा समूहाची संस्कृती आणि व्यक्तिमत्व हि संपूर्णपणे /एकरूपी व्यूह ( holistic and integrated configuration ) असते .एकात्मिक सांस्कृतिच्या काही अंशात्मक भागात आदिवासी व बिगर आदिवासी जाती समुहात समानता आढळली तरी असे दोन समूह एक असत नाहीत . आदिवासी जमातीस किवा त्यातील एखाद्या उप जमातीस जेव्हा राष्ट्रपती अधिसूचनेद्वारे अनुसूचित ज्मातीचां दर्जा देतात ( Status of S T) ,तेव्हा त्या जमातीच्या सांस्कृतिक व व्यक्तिमत्वाच्या वैशीष्ठयांची त्यांनी दखल घेतलेली असते .अर्थात हि वैशीष्ट आदिवासी संशोधन समिती व मानववंश सर्वेक्षण यांचेकडून सप्रमाण शिद्ध झाल्याशिवाय आणि जनजाती सल्लगार समितीने ( T A C ) तिला मान्यता दिल्याशिवाय असा बदल संविधान स्वीकारू शकत नाही . जे बिगर आदिवासी जातीसमुह आदिवासी भागात राहतात आणि ज्यांचे आदिवासी जमातीशी नामसदृश असते किवा भौतिक सांस्कृतिक काही बाबींमध्ये दोघांत साम्य असते असे तोतया आदिवासी ब्रिटीश प्रशासकांच्या लेखनातून किंवा ब्रिटीश काळातील पुराव्यांतून व तत्कालीन ग्याझेटीअर्समधून संदर्भ सोडून उतारे उद्धृत करतात .ब्रिटीशांनी जाती जमातींची माहिती मिळावी ह्या हेतूने अनेक ग्रंथ लिहिले आहेत .तेही आदिवासी व बिगर आदिवासी पुरावा म्हणून महात्वाचे आहेत ,अलीकडेच ‘मानव विज्ञान सर्वेक्षण विभागाने ‘ “ पीपल्स of इंडिया “ या ग्रंथामध्ये देशातील जाती जमाती संदर्भात पुराव्यानिशी लिखाण केले आहे आणि आदिवासी जमाती संधर्भात त्यातील पुरावा अधिकृत मानला जातो .
राज्यघटनेने अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये राज्यातील ४७ आदिवासी जमातींचा समावेश केलेला आहे परंतु विस्तारित क्षेत्रातिल स्वयंघोषित आदिवासी हेतुपुरास्कर महादेव कोळी , ढोर कोळी , टोकरे कोळी ,व मल्हार कोळी नावाने उतावळे होऊन ( self declaring ) आदिवासी झाले आहेत OBC अंतर्गत मोडणार्या कोळी जातीचा आणि त्यातील १७ उप्जातीचा उल्लेख अनुसूचित जमातीत केलेला नाही सोनकोळी,मच्छिमार कोळी , आहिर कोळी ,पान्भ्रे कोळी ,खानदेश कोळी ,वैती ,सूर्यवंशी ,मांगेला ,या जाती केवळ कोळी या शब्दाचा सारखेपणाने आम्हीच “महादेव कोळी “ आहोत असे सांगतात .व बनावट जातीचे दाखले घेऊन नोकरी पण करत आहेत . व सरकार त्यांना पाठीशी पण घालत आहे .आज कमीत कमी २० लाख महादेव कोळी जातीचे दाखले घेऊन मजा मारत आहेत .
आदिवासी महादेव कोळी हि जमात स्टार्ट कमिटीच्या अहवालात (१९३०) अबोरीजनल अंड हिल्स ट्राइब्स या सदरातील शेड्युल २ मध्ये क्रमांक १५ वर नमूद आहे तर सूर्यवंशी कोळी ,मांगेला ,वैती कोळी या जाती शेड्युल ३ मध्ये व अनुक्रमे ६३,७३,व ११९ वर ओबीसी म्हणून आहेत .अनेक्स “ ब “ गव्हर्मेंट of बॉम्बे पोलिटिकल and सर्विस रेजोल्युशन न.१६७३/३४ बॉम्बे कास्ट दिनांक २४/४/१९४२ (रीव्ह्लुशन ) अन्वये शेड्युल “ए” लिस्ट of इंटरमेडीयटमध्ये सोनकोळी म्हणजेच मच्छिमार कोळी हि जात क्र. ११६ वर ओबीसी म्हणून नमूद असून त्याचा फायदा ते मिळवत आहेत .
“स्टार्ट कमिटी, आदिवासी आणि प्रा.डॉ गोविंद सदाशिव धुर्ये “
१९२८ साली इंग्रज राजवटीत मा. ओ.बी.एच.स्टार्ट या इंग्रज अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली “स्टार्ट कमिटी’” स्थापन केली होती या समितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,मा.डॉ सोलंकी ,मा.ए.व्ही. ठक्कर, (ठक्कर बाप्पा ) ,इत्याती ख्यातनाम आणि मान्यवर सदस्य होते .तत्कालीन मुंबई राज्यातील अस्पृश्यांचा व आदिवासिं जमातीच्या उत्थानासाठी कोणकोणत्या उपयोजना करता येतील ,या विषयी संशोधन केले होते . १९३० साली सदरचा अहवाल सादर झाला या मुळ अहवालाचा आधार घेऊन व त्यात योग्य त्या सुधारणा करून १९५० साली राज्यघटनेने अनुसूचित जाती आणि जमातींची यादी घोषित केली . एकूण ४७ अनुसूचित जमातिना संसदेने राज्यघटनेद्वारे आरक्षण दिले .१९५५ साली राज्य शासनाने काका कालेलकर समिती नेमली या समितीच्या शिफारसीनुसार उत्तर जातींची वर्गवारी करण्यात आली या कालावधीत कोणत्याही जातीला मर्यादित क्षेत्र्बन्धन नव्हते याच वेळी मुंबई विध्यापीठाचे थोर समाजअभ्यासक प्रा. धुर्य्रे यांनी सामाजिक ,भौगोलिक ,भौतिक ,व्यावसायिक ,सांस्कृतिक ,धर्म,रूढी,परंपरा,लग्नबंधन इत्यादी तत्वानुसार आदिवासी महादेव कोळी जमातीचे संशोधन केले व आपला अहवाल तत्कालीन मुंबई राज्य सरकारला सादर केला .त्यात आदिवासी महादेव कोळी आणि कोळी हे एक आहेत असे कुठेही लिहिले नाही शिवाय त्यांनी तसा उल्लेख देखील टाळला .मग तेव्हा पासून आजपर्यंत जो घुसखोरीचा मार्ग शोधला जातोय त्याला अडाणीपणा म्हणायचा कि पदीचे मत ..” गाजराची पुंगी ,वाजली तर वाजली ,नाहीतर चाऊन खाल्ली “ असेच म्हणावे लागेल अभ्यास करून बोंबा मारा ना कशाला तुमच्याही डोक्याला ताप आणि आमच्या आदिवासी समाजालाही . जे आश्वासने देत आहेत त्यांचे तोंड वाकडे झाले पण सरळ काही बोलता येईना .
- Vijaykumar Ghote




To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 4, 2014, 10:33:06 AM8/4/14
to adi...@googlegroups.com, adi...@gmail.com, chet...@gmail.com
महाराष्ट्र शासन 
आदिवासी विकास विभाग -
महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या अनुसुचित जमातीच्‍या व जातीच्‍या तुलनात्‍मक माहिती देणारे वि‍वरण पत्र 
शासन निर्णय सांकेतांक क्रमांक - १९८५०४२४०००००००१२४ 
जी.आर. दिनांक - 24-04-१९८५ 
यामध्ये सर्व घुसखोरी करणाऱ्या जातीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे pdf फाईल मध्ये पान क्र ११ वर बघा . आणि जास्तीत जास्त आदिवासींपर्यंत पोहचवा 
अधिक माहिती साठीhttps://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Ratnagiri/GCST048501.PDF



...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 6, 2014, 1:33:03 PM8/6/14
to adi...@googlegroups.com, adi...@gmail.com, chet...@gmail.com


केंद्र सरकारने धनगरांना कधीचेच धूडकारले आहे.

धनगर आदिवासी नसून ते क्षत्रिय आहेत.१९११ साली अजमेर येथ हिंदू महासभेची मिटिंग झाली त्यामध्ये धनगर हे क्षत्रिय आहेत असा निर्णय धर्ममार्तंडानी दिला. धनगर हे पशुपालक आणि मेशपालक आहेत त्यांनी काढलेल्य गायींच्या दुधानी आर्या अभिषेक करत होते. या उलट शतपथ ब्राह्मण या ग्रंथात शुद्राचे म्हणजे अनार्याच्या हातचे (आदिवासीच्या हातचे) दुध अभिषेकासाठी अपवित्र मानल्या जात असे.ह्याचाच अर्थ असा कि धनगर आणि आदिवासी हे दोन वेगळे समाज समूह आहेत वेगळे आहेत. धनगर क्षत्रिय असल्यामुळे त्यांचे व आर्यांचे चांगलेच पाटत होते.

धनगर आर्य धर्म व्यवस्थेला मानणारे आहेत. म्हणूनच धनगर आर्यच्या देवदेवतांना मानतात. पंढरपुरचे विठोबाचे मंदिर विष्णू वर्धन ह्याने बांधले आहे.तो धनगर होता. पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर हिने हजारो हिंदू देवदेवतांचे मंदीरं बांधली. ह्यावरून ते वैदिक परंपरेला मानणा-या होत्या हे शिद्ध होते .तसेच त्या अत्यंत सधन होत्या हेही दिसून येत.

या उलट सर्व आदिवासी अनार्य असून ते अवैदिक परंपरेतील आहेत.आदिवासींनी कोणत्याच वैदिक देवतांचे मंदिर उभारले नाही. मुसलमान राजवटी धनगर समाजाचे राज्य गेल्यामुळे ते पठारावर मेंढ्या पालनाचा व्यवसाय करू लागले. धनगर हे समाजशात्र, मानववंशशात्र , धर्मशात्र , इतिहास इत्यादीच्या कसोटीवर आदिवासी म्हणून सिद्धच होऊ शकत नाहीत.आज धनगर आपण आदिवासी आहोत असा दावा करत आहेत ते केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटीच !

त्यांना वाटते आदिवासी असंघटीत व साधेभोळे आहेत. आपण त्यांच्यात घुसण्याच प्रयत्न 
केले तर ते प्रतिकार करणार नाहीत. परंतु आज आदिवासींचे आंदोलन बघून त्यांचे धाबे दणाणले. खरे म्हणजे धनगर समाजाचा हा प्रयत्न कधीच सफल होणार नाही. शुधीर जोशी कमिटीने धनगर समजाला आदिवासिमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शक्य झाले नाही.त्या कमिटीत धनगर समाजाचे नेते प्रत्यक्ष अण्णा डांगे होते. त्यानाही ते शक्य झाले नाही .

तसेच १९८१ साली केंद्रा सरकारने सुद्ध धनगर जातीचा आदिवासीमध्ये सामील होण्याचा प्रास्तव पूर्णपणे नाकारला. त्यामुळे माझा धनगर समाजाच्या नेत्यांना प्रेमचा सल्ला आहे कि त्यांनी आदिवासी मध्ये येण्यासाठीची केवीलवाणी धडपड करण्यापेक्ष.स्वतंत्र सूचीची मागणी करून वाटेल तेवढे आरक्षण घ्यावे.

Madhav Sarkunde 

...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 17, 2014, 10:22:14 AM12/17/14
to adi...@googlegroups.com, adi...@gmail.com, chet...@gmail.com









...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 18, 2014, 10:57:40 AM12/18/14
to AYUSH google group

आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर....

धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सभागृहात मुद्दा चर्चेत घेण्यात आला. यात विष्णु सावरा यांनी यास विरोध दर्शवताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यात एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाची बाजू सावरत आरक्षण देण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे आदिवासी विरोधी मत व्यक्त केले.

राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आदिवासी आरक्षणाचा छल केला जात असताना सर्व आदिवासी बांधवान्नी अतिशय जागृत राहून आपल्या हक्कान्साठी सरकारचा निषेध नोन्दविण्यास तैयार रहावे.

विष्णु सावरा यांची कोंडी करण्यासाठी जसे सर्व बिगर आदिवासी नेते एकजुट होत होते तसे आपण आता आपल्या न्याय्य हक्कान्साठी सरकारला आपली ताकद दाखवून द्या. अन्यथा येणा-या आपल्या पिढ्या आपणास कदापि माफ करणार नाहित.



SACHiNe SATVi

unread,
Dec 19, 2014, 2:30:50 AM12/19/14
to adi...@googlegroups.com
 
Adivasi Vikas Mantryavar Dabav takanya sathi ata Media aani Non Tribal Leaders Pudhe yetil.
Tyana Vidhan sabhetil tyanchya Bhumike baddal aani pudhil vatchalis e mail dvare kalavun support karu shakto (vishnusavara[at]rediffmail[dot]com)
 
Ata apan sagalyani Apalya Sarv adivasi Amdar/Khasadar/Nete/karyakarte yani ektra yeun adivasi samaja pudhil sagali sankate ek ek karun sodavali tar nakkich changale divas yetil.. nahi tar ankhin 60 years nantar pan apan fakt arakshanachya navavar bhandat basanar aani 95% Samajala ajun basic suvidha pan nasatil...
 
Ya sobatach apan pudhil samasya sodavanya sathi pan pudhakar ghenya sathi agrah karuyat...
- PESA implementation
- Quality of Education
- Employement and Resource utilisation
- Tribal Culture policy
- Tribal Empowerement
 
Note : Last time jase Madhukar Pichad Yana support karun chalval ubhi rahili hoti, tasech ata Vishnu Savara yanna pan support karuya...
 
Adivasi Hita sathi ek vichar....

AYUSH activities

unread,
Dec 19, 2014, 8:07:46 AM12/19/14
to adi...@googlegroups.com


आदिवासी सवलती साठी होणारया घुसखोरी आणि बोगस आदिवासी विरुद्ध एल्गार 

१४ - १४ जानेवारी २०१५ रोजी आदिवासी एकता परिषद व सांस्कृतिक महासंमेलनात एक मुखी मागणी 
संपूर्ण भारतातून ५ लाख आदिवासींचा उलगुलान 

चलो नांदुरी (सप्तशृंगी गड) जिल्हा नाशिक 

आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी बचाव कृती समिती, महाराष्ट्र राज्य
 


...

Prashant Karwande

unread,
Dec 19, 2014, 1:28:00 PM12/19/14
to adi...@googlegroups.com

Sir
We are always with you Sir. आपण सर्व जण मिळुन श्री. सावरा यांची साथ देऊन आपण भक्कम  पाठिंबा  धनगर विरोधी आंदोलना ला देउ.

Prashant Karwande

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 20, 2014, 12:33:32 PM12/20/14
to adi...@googlegroups.com
...

Ravindra Talpe

unread,
Dec 21, 2014, 12:54:08 PM12/21/14
to adi...@googlegroups.com
Dear Sachin,
This is really good advertise.
We to Project this way. Yalgar of 5 lakh people.

On 12/20/14, AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in> wrote:
>
>
> On Friday, December 19, 2014 11:58:00 PM UTC+5:30, karwande.prashant wrote:
>>
>> Sir
>> We are always with you Sir. आपण सर्व जण मिळुन श्री. सावरा यांची साथ देऊन
>> आपण भक्कम पाठिंबा धनगर विरोधी आंदोलना ला देउ.
>>
>> Prashant Karwande
>> On 18 Dec 2014 21:27, "AYUSH Adivasi Yuva Shakti" <adi...@gmail.com>
>> wrote:
>>
>> आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर....
>>
>> धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सभागृहात मुद्दा चर्चेत घेण्यात आला.
>> यात विष्णु सावरा यांनी यास विरोध दर्शवताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यात
>> एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाची बाजू सावरत आरक्षण देण्यास पक्ष सकारात्मक
>> असल्याचे आदिवासी विरोधी मत व्यक्त केले.
>>
>> राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आदिवासी आरक्षणाचा छल केला जात असताना सर्व
>> आदिवासी बांधवान्नी अतिशय जागृत राहून आपल्या हक्कान्साठी सरकारचा निषेध
>> नोन्दविण्यास तैयार रहावे.
>>
>> *विष्णु सावरा यांची कोंडी करण्यासाठी जसे सर्व बिगर आदिवासी नेते एकजुट होत
>> होते तसे आपण आता आपल्या न्याय्य हक्कान्साठी सरकारला आपली ताकद दाखवून
>> द्या*.
>> अन्यथा येणा-या आपल्या पिढ्या आपणास कदापि माफ करणार नाहित.
>>
>>
>>
>>
>> 2014-12-17 20:52 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Wednesday, August 6, 2014 11:03:03 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>> Shakti wrote:
>>
>>
>>
>> <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf>
>> - Madhav Sarkunde <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf>
>>
>> On Monday, August 4, 2014 8:03:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> महाराष्ट्र शासन
>> आदिवासी विकास विभाग -
>> महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या अनुसुचित जमातीच्‍या
>> व जातीच्‍या तुलनात्‍मक माहिती देणारे वि‍वरण पत्र
>> शासन निर्णय सांकेतांक क्रमांक - १९८५०४२४०००००००१२४
>> जी.आर. दिनांक - 24-04-१९८५
>> यामध्ये सर्व घुसखोरी करणाऱ्या जातीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे pdf फाईल
>> मध्ये पान क्र ११ वर बघा . आणि जास्तीत जास्त आदिवासींपर्यंत पोहचवा
>> अधिक माहिती साठीhttps://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%
>> 20Resolutions/Ratnagiri/GCST048501.PDF
>>
>>
>>
>>
>>
>>
>> <https://lh4.googleusercontent.com/-aqqqO42DQkg/U9PR9dKH3SI/AAAAAAAA47w/tv-qt7vl5Q4/s1600/home+pae.png>
>>
>>
>> VDO : http://www.adiyuva.in/2014/07/blog-post_21.html
>> Pics : https://www.facebook.com/media/set/?set=a.571462489546159.150501.
>> 100000472403313&type=1
>>
>>
>>
>>
>> On Saturday, July 26, 2014 9:29:05 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> आज आनंदी आनंद झाला, माझा आदिवासी एक झाला
>>
>> आज जरी आम्ही शांत, उद्याचे आम्हीच विक्रांत
>>
>> *धनगर आदिवासी असल्याचा जावई शोध लावणारांचा धिक्कार असो*
>> <http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.dhangar.org%2F&h=aAQE4MMtz&enc=AZMMneluraawMZZevRimUl3avnLbog0ZsiMpROF0gFXqJM4TVeI009OGcMifMJoIaSDsgoStm7RvrzhS8MW0mdn4jOgLurbVK6I2NHFvTLVKEW5_OUEKgEObYqBy5o4Pw9yz5HC-8bgGt9nbqQ2RmBmiGyaNV2HCq-8pVgsPmWEPZw&s=1>
>> )
>>
>> त्याउलट आदिवासी जमातींचा इतिहास पाहिला तर अगदी थेट महाभारतीय काळातही
>> उपेक्षित असलेल्या एकलव्याच्या उदाहरणावरून त्यांच्या ऐतिहासिक दुर्लक्षित,
>> उपेक्षित आणि पृथक सामाजिक परिस्थितीची कल्पना येते.
>>
>> आणि म्हणूनच धनगर हे अनुसूचित जमातींपासून पूर्णत: वेगळे ठरतात.
>>
>>
>>
>> Rahul C Bhangare
>>
>>
>>
>>
>> On Saturday, July 26, 2014 9:12:37 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> Sign online petition : Click here
>> <http://www.change.org/en-IN/petitions/the-governor-of-maharashtra-stop-including-non-tribals-into-st-for-political-benefits#news>
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+u...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/3002651f-1f79-45c9-a37f-b9da8010e988%40googlegroups.com.
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>


--
Thanks & Regards,
Ravindra U Talpe
==============================
Cell: 98227 65531
==============================

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 29, 2014, 9:49:05 AM12/29/14
to adi...@googlegroups.com, Social MLA Savara, Vishnu Savara
मा॰ विष्णु सवरा साहेब 
आदिवासी विकास मंत्री 
महाराष्ट्र राज्य, मुंबई,
मा॰ मंत्री महोदय,
आपण हिवाळी आधिवेशनामध्ये आदिवासी समाज हिताच्या घेतलेल्या भूमिकेबद्दल सर्व आदिवासी समाजात कौतुक होत आहे. आम्ही सर्व आदिवासी समाज संघटनांन मार्फत आपले अभिनंदन करत आहोत॰ तसेच प्रसंगी वेळ पडलीच तर आपल्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची ताकद ठेवत आहोत॰ तेव्हा पुन: शा आपण घेतलेल्या आदिवासीहिताच्या भूमिकेबद्दल अभिनंदन व सर्व समाज संस्था- संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत॰
धन्यवाद 
कळावे 
आपले विश्वासु 
१} ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉईज फेडरेशन 
२} सहयाद्रि आदिवासी सेवा संघ मुंबई (रजि.)
३} क्रांतिवीर राघोजी भांगरे स्मृती ग्रंथालय (रजि.)
४} अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मुंबई 
५} महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव संगटना मुंबई 
६} आदिवासी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य 
७} आदिवासी साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई 
८} आदिवासी युवक क्राती, मुंबई 
९} आदिवासी उन्नती संघटना, मुंबई 
तसेच विविध आदिवासी संघटना

On Friday, December 19, 2014 1:00:50 PM UTC+5:30, SACHiNe SATVi wrote:
...

Yogesh Dhapshi

unread,
Jan 1, 2015, 10:02:37 AM1/1/15
to adi...@googlegroups.com

sachinnathe09

> --
> -----------------------------------------------------------------------
> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
>  
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1

>  
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f7527bff-5c6d-46b1-a5ef-385b841fcb1c%40googlegroups.com.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 6, 2015, 12:09:02 PM1/6/15
to adi...@googlegroups.com







मा॰ विष्णु सवरा साहेब 
आदिवासी विकास मंत्री 
महाराष्ट्र राज्य, मुंबई,
मा॰ मंत्री महोदय,
आपण हिवाळी आधिवेशनामध्ये आदिवासी समाज हिताच्या घेतलेल्या भूमिकेबद्दल सर्व आदिवासी समाजात कौतुक होत आहे. आम्ही सर्व आदिवासी समाज संघटनांन मार्फत आपले अभिनंदन करत आहोत॰ तसेच प्रसंगी वेळ पडलीच तर आपल्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची ताकद ठेवत आहोत॰ तेव्हा पुन: शा आपण घेतलेल्या आदिवासीहिताच्या भूमिकेबद्दल अभिनंदन व सर्व समाज संस्था- संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत॰
धन्यवाद 
कळावे 
आपले विश्वासु 

देश भरतील आदिवासी समाज संघटना, संस्था, ग्रुप, मंडळे, ग्राम सभा, तसेच विद्यार्थी / कर्मचारी / अधिकारी / नेते / कामगार / अभियंता / वैदकीय अधिकारी / लोकप्रतिनिधी/ बेरोजगार / शेतकरी / वकील / चालक / खाजगी कर्मचारी संघटना. 

त्यातील काही निवडक खालील प्रमाणे :- 
  • आदिवासी युवा शक्ती (आयुश ग्रुप)
  • आदिवासी युवा सेवा संघ, डहाणू, ठाणे - पालघर
  • आदिवासी महासंघ, पुणे. शाखा जुन्नर, संगमनेर, अकोले.
  • आदिवासी समाज कृती समिती,पुणे.(शाखा कोल्हापूर, राजगुरुनगर, मुलुंड)
  • पुणे शहर आदिवासी नागरी सह. पतसंस्था, नवी सांगवी.
  • अखिल भारतीय आदिवासी परिषद, नवी दिल्ली, (शाखा महाराष्ट्र),  
  • सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटना, महाराष्ट्र.
  • महाराष्ट्र आदिवासी सेवा संघ, पुणे
  • गोंडवना समाज संघटना,पुणे.
  • कोकणा  कोकणी आदिवासी समाज सेवा संघ, पुणे.
  • राजश्री आदिवासी पारधी समाज संघटना,पुणे.
  • परधान समाज संघटना, पुणे.
  • हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी संघटना, पुणे.
  • आदिवासी विकास प्रतिष्ठान,पुणे.
  • पि.चि.म.न.पा.अनुसूचित जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, पिपरी, पुणे १८.
  • पुणे म.न.पा.अनुसूचित जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, पुणे.
  • आदिवासी कर्मचारी विकास सेवा संस्था, वाई, जि.सातारा.
  • नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, पुणे.
  • सह्याद्री आदिवासी गृहरचना संस्था, पद्मावती.
  • सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ, गुरव पिंपळे,
  • सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ, धानोरी.
  • सह्याद्री आदिवासी सेवा संघ, मुंबई.
  • सह्याद्री ठाकूर-ठाकर समाज उन्नती मंडळ, सुदुम्बरे.
  • आदिवासी भीमाशंकर तरुण मंडळ, धानोरी.
  • नवजीवन आदिवासी संस्था, बोपखेल.
  • आदिवासी विकास मित्र मंडळ, दिघी.
  • आदिवासी ग्राम विकास प्रबोधिनी, जुन्नर
  • त्रिमूर्ती आदिवासी सह. गृहसंस्था मर्या.,दिघी.
  • भीमाशंकर सह. गृहरचना संस्था, तळेगाव दाभाडे.
  • भीमाशंकर प्रासादिक भजनी मंडळ, शिवलिंग मंदिर, देहुगाव.
  • शिवनेरी सह. हौसिंग सोसायटी, दापोडी.
  • शिवकुंज होऊसिंग सोसायटी व मित्र मंडळ, गोखले नगर.
  • महादेव कोळी समाज विकास मंडळ , देहूरोड.
  • पुणे जिल्हा आदिवासी विद्यार्थी संघटना, पुणे.
  • आदिवासी उन्नती संघटना,पश्चिम विभाग, खेड.
  • राजा हरिचंद्र सेवा मंडळ, भोसरी.
  • आदिवासी समाज सेवा मंडळ, सुतारवाडी.
  • शिवशक्ती आदिवासी मंडळ, तळेगाव दाभाडे
  • हिंदू महादेव कोळी दिंडी सोहळा संघ, आळंदी.
  • हिंदू महादेव कोळी धर्मशाळा, आळंदी.
  • कळमजादेवी महिला मंडळ तळेगाव दाभाडे.
  • आदिवासी समाज उन्नती मंडळ, बिबवेवाडी.
  • संत ज्ञानेश्वर ग्रामविकास संस्था, सांगवी.
  • आदिवासी विकास संघटना, शाखा संगमनेर, अकोले, राजूर, शेंडी.
  • आरक्षण हक्क कृती समिती, पुणे.
  • पडकई प्रतिष्ठान, राजगुरुनगर.ता. खेड, जि.पुणे
  • लळीत रंगभूमी, बहुरंग पुणे.
  • आजी माजी सरपंच संघटना, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका
  • आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा समिती, डेहणे. ता.खेड.जि.पुणे.
  • प्रेरणा वधूवर सूचक मंडळ, नवी सांगवी.
  • हिंदू महादेव कोळी मित्र मंडळ, मुंबई, शाखा टीटवाळा, बदलापूर, अंबरनाथ
  • वारली सेवा संघ, मुंबई (पालघर)
  • गोंडवाना मित्र मंडळ, मुंबई. नागपूर.
  • पारधी महासंघ, मुंबई..
  • आदिवासी युवक क्रांती दल, मुलुंड, मुंबई.
  • आदिवासी मोखाजीबाबा सेवा मित्र मंडळ, मुंबई.
  • आदिवासी एकता परिषद, जव्हार, मोखाडा, खोडाला, पालघर, शहापूर, भिवंडी, मुरबाड,.
  • मागासवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, पुणे.
  • आदिवासी उन्नती सेवा मंडळ, राजूर.जि.अ.नगर.
  • हिंदू महादेव कोळी समाज सेवा संघ, राजूर. जि.अ.नगर.
  • महाराष्ट्र राज्य आदिवासी एकीकरण समिती, मुंबई.
  • वीर बिरसा मुंडा आदिवासी विद्यार्थी संघटना, पुणे विद्यापीठ.
  • पी.एम.पी.एल. आदिवासी कर्मचारी संघटना, पुणे.

  • ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉईज फेडरेशन 

  • सहयाद्रि आदिवासी सेवा संघ मुंबई (रजि.)

  • क्रांतिवीर राघोजी भांगरे स्मृती ग्रंथालय (रजि.)

  • अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मुंबई
  • महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव संगटना मुंबई
  • आदिवासी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य
  • आदिवासी साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई 

  • आदिवासी युवक क्राती, मुंबई 

  • आदिवासी उन्नती संघटना, मुंबई 
  • पालवी आदिवासी सेवा फौंडेशन ठाणे (पालघर, विक्रमगड, जव्हार, नाशिक, विरार, नागपूर, अमरावती, चीन्दावारा- मध्य प्रदेश )
  • आदिवासी युवक कल्याण संघ, जिल्हा हिंगोली 
  • आदिवासी कर्मचारी संघटना, जिल्हा हिंगोली
  • अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा परभणी 
  • बिरसा मुंडा ब्रिगेड जिल्हा यवतमाळ


तसेच विविध आदिवासी संघटना

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 6, 2015, 1:06:43 PM1/6/15
to adi...@googlegroups.com
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 6, 2015, 1:12:04 PM1/6/15
to adi...@googlegroups.com




या सर्वाना सिनेमामध्ये,टी व्ही मध्ये यांचे सरकारी कार्यक्रम यात आदिवासी कसे असतात हे दाखवतांना आदिवासी बरोबर ओळखता येतात.
तेव्हा ते आदिवासी म्हणून धनगरला त्यात सादर करीत नाही.
प्रसार माध्यमांनी ‘३%आरक्षण ध्नागारला आधीच आहेच’असा युक्तिवाद न करता,
"धनगर आदिवासी मध्ये घुसू पाहतात"
असेहि न म्हणता,आदिवासींचा धनगरांच्या आरक्षणाल विरोध असे मथळे महिनाभर टी .व्ही वर दाखवले त्याचा अर्थ शासन धन्गारला उन्नतीसाठी काही आरक्षण देऊ पाहत आहे त्यास आदिवासी विरोध करतात असाच संदेश दिला.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 9, 2015, 9:31:16 AM1/9/15
to adi...@googlegroups.com



आदिवासींच्या (S.T) ७ % आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला अ.जमातीचे(S.T) आरक्षण देण्यासाठी प्रथम धनगर समाजाला अ.जमातीच्या यादित घटनेच्या अनुच्छेद ३४२(२) प्रमाणे समाविष्ट करावे लागेल. त्या शिवाय त्यना आदिवासींना असलेले आरक्षण मिळणार नाही.एकदा त्यांचा S T मध्ये समावेश झाला की S T मध्ये वर्गीकरण करून त्याना वेगळे आरक्षण देण्यास राज्य घटनेत राज्याला ( केंद्र व राज्य सरकार )आडकाठी नाही.केंद सरकारने S.T च्या ७.५% आरक्षणात बदल करण्याची अनुकुलता दर्शविली नाही. त्यमूळे केंदातील नोक-यात त्यांचा वाटा असेल जर त्याना ST चा दर्जा दिला.
राज्यसरकार आणि रजिस्ट्रार जनरल यानी शिफारस केलेले दावे राष्ट्रीय एस.टी आयेग फेटाळू शकतात जर शिफारस निकषाना धरून नसेल तर.राज्य सरकार त्यना गृहीत धरते की काय ?
धनगर आणि इतर ४ जाती, आदिवासीं मध्ये समाविष्ठ करण्यासाठी केलेले निकष पूर्ण करीत नाही म्हणून संसदेने दोनवेळा दावे, विधेयक-Bill रूपात -फेटाळले आहे.राज्य सरकार पून्हा शिफारस करत असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला काळीमा फासणारी घटना असेल.

"धनगड" चे भाषांतर "धनगर" नाही हा मूद्दा संसदेने निकाली काढला आहे .

म्हणून मूख्यमंत्री आणि त्याना पाठिंबा देणारे सर्वच जनतेची दिशाभूल करीत आहेत...








...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 14, 2015, 7:06:38 AM1/14/15
to adi...@googlegroups.com
...

Dr. Pradeep Valvi

unread,
Jan 15, 2015, 5:59:36 AM1/15/15
to adi...@googlegroups.com

Can you go and check list of students qualified for Yashada coaching class. All are bogus adivasi by reading there surname only just get Mahajan Mali Deshmuk Joshi ect all this surname I hav found in many competitive list but no action by govt????????

Dr Pradeep Karma Valvi

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

Santosh Gedam

unread,
Jan 16, 2015, 8:47:31 AM1/16/15
to adi...@googlegroups.com

AYUSH team plan for fight so that mainstream politics stop playing with the rights of aboriginal communities....We are not illiterate now & we know what forces work behind these dirty practices against non mulnivasi people...
Do call me for collective action...

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

Santosh Gedam

unread,
Jan 16, 2015, 9:15:43 AM1/16/15
to adi...@googlegroups.com

Mah. Act of 2001 & subsequent rules make validity certs. mandatory. HC might have ruled exemption on job or education, but this is not so... Write to the Yashada director & ask him to follow law... If need be file complaint in violation of law demanding stringent IPCs violating the constitutional rights of ST/SCs....

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 25, 2015, 11:19:11 AM3/25/15
to adi...@googlegroups.com






Nidrashan at Nashik
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 27, 2015, 10:17:10 AM3/27/15
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 28, 2015, 6:33:01 AM3/28/15
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 28, 2015, 6:34:00 AM3/28/15
to adi...@googlegroups.com
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 28, 2015, 10:39:27 AM3/28/15
to adi...@googlegroups.com
...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 29, 2015, 1:15:10 AM3/29/15
to adi...@googlegroups.com
...
Reply all
Reply to author
Forward
0 new messages