आज ठाणे येथे तलावपाळी ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आदिवासी समाजात घुसू पाहणाऱ्या धनगरांच्या आरक्षणा विरोधात मोर्जा पार पडला.परंतु या मोर्चाला मुंबई ठाण्यातील म्हणावा तसा समाज बांधव एकवटला नाही, याचेच दुख:होते .
याचाच अर्थ असा होतो कि अजूनही आपला समाज या बद्दल जागरूक नाही किंवा जाणून बुजून या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आहे कि अजूनही आपण या राजकीय पुढार्यान प्रमाणे गटबाजीच्या राजकारणात अडकलो आहोत
सध्या संपूर्ण जगात सोशिअल नेटवर्किंग साईट्सचे पेव आहे ते आपल्याही समाजाच्या विविध सोशिअल नेट वर्किंग साईट्स वर असणार्या विविध ग्रुप अथवा मंडळांमध्ये दिसते online होणार्या अनेक चर्चा सत्रा मध्ये अनेक जन सहभाग नोंदवतात, विविध प्रकारची मते मांडतात परंतु जेव्हा समाजाला यांची खरी गरज असते तेव्हा यापैकी कुणाही हजर असत नाही का? फक्त online व आभासी जगात चर्चा म्हणजे समाजकार्य असा यांचा समज आहे का?
.
तसा जर त्यांचा समज असेल तर त्यांनी खुशाल चर्चा कराव्यात अथवा चर्चेची गुर्हाळ पाडावीत फक्त समाजाच्या नावाचा या लोकांनी वापर करू नये कारण अशा षंढ लोकांची आमच्या कणखर समाजाला कुठल्याही प्रकारची गरज नाही.
समाजातील नोकरदार वर्गाच विशेष अभिनंदन व्वा काय उपस्थिती होती तुम्हा लोकांची? तुम्हाला समाजाच्या नावाने मिळणाऱ्या नोकर्या हव्यात त्यांत बढती हवी पण समाजासाठी काम करणे मात्र नको.
अरे आता तरी जागे व्हा, कुंभकर्णा सारखे झोप काय काढताय ? आपल्या ताटातील भाकरी दुसर्यांनी पळवण्या पर्यंत आपण झोपलो आहोत का? माझी सर्व समाज बांधव,समाजातील तरुणवर्ग यांना विनंती आहे कि आता वेळ आली आहे द्या झुगारून सर्व राजकीय बंध,विसरा आता गटतट या सर्व जन एकत्र देऊ लढा.
कारण आता नाही तरी पुन्हा कधीच नाही .
आपलाच,
दीपक मुठे
सदस्य
महादेवकोळी युवा
आज आदिवासिंच्या नोकरदार वर्गाने पाठ फिरविल्यानेच आज अनेक जाती आदिवासी आरक्षणावर हात टाकत आहेत.
आपले पोट भरलेले असताना यांना उपाशी समाजाची जाण होत नाही हेच दुर्दैव ।
आदर्श अशा आदिवासी संस्कृतीला या हरामखोरांनीच काळिमा फासलाय...!
ते जर पुढे सरसावले तर अजुनही खुप काही सकारात्मक घडू शकते...अन्यथा केंद्र काय निर्णय घेणार हे वेगळे सांगायला नको.
धनगर समाजातील ज्या स्त्रिया रस्त्यावर येवून आंदोलने करत आहेत त्यांच्या बांगड्या यांना घरपोच भेट द्याव्यात असेच वाटत आहे.
विद्रोही
आदिवासी संघर्ष