|| वेडावन का काय मी, कायजून... ||

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 22, 2019, 11:59:33 AM2/22/19
to adi...@googlegroups.com

|| वेडावन का काय मी, कायजून... ||

जल जंगल जमिन जीव...

[ स्थानिक आदिवासी बोली ]

गायचेंन काल परवां काहीं बातम्या वाचल्यां ना डोकां गर गरया दसां लागलां. रगत हों भलतां जोरात हिंडाया लागलां. भूक हो मेलीहें दसीं. काय करूं काहीच नीहीं समजं. ओगाच थोडा वेल खोपाला बसून होतुं. पण डोका बंद दसा पडलातां.

घरा जाय तंव्हा डहाणू ते कासा जाताना सगल्यां जमिनीं जाधेल नांगुन, बस ना डुग डुग्यात बिज्यांचीच वाढती गर्दी नांगुन, आदिवासींना टोचून बोलणारीं लोखां नांगुन, दुकाना ना बाजारात बिज्यांची संख्या नांगुन, नोकऱ्याना हो बीजिच लोखां नांगुन गायचेन भलतां व्याट होय. भलता राग येय, रगत पेट दसां. काय करसील वेड दसां लागल आथां..... उपाय सांगजास शांत रेहायचा.

[ साधारण मराठी ]

काल परवाच्या काही बातम्या वाचल्या (जंगल जमीन आरक्षण) आणि खूप अस्वस्थ झालो आहे. रक्त प्रवाह श्वास जोरात होतोय, भूक मंदावलीय, सारखे डोक्यात घालमेल सुरु आहे. काय करू काहीच समजत नाही. थोडा वेळ शांत बसून राहिलो तरी इत्तर काही सुचतच नाही.

घरी जाताना पण जेव्हा डहाणू ते कासा प्रवास करतो तेव्हा पण असेच होते. सगळ्या जमिनी विकलेल्या पाहून, इतरांची वाढलेली संख्या, प्रवासात आदिवासींना टोचून बोलणारी माणसे, नाक्यावर/बाजारात इत्तरांची वाढती संख्या, दूरवरून आलेले नोकऱ्यावाले बघून खूप घालमेल होते डोक्यात.

जंगल, शेती, जमिनी सोबत हळू हळू आदिवासींचे अस्तित्वच संपत आहे पण सगळे एकदम शांत. सगळे जण आपल्या आपल्या वयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, अध्यात्मिक इच्छा/स्वप्न पूर्ण करण्यात मग्न. बहुतेक जण आपल्या आपल्या चष्म्यातून विकास/आनंदी समाज बघतायेत.

कृपया मला पण एक चष्मा द्याना बनवून ज्यातून वाढते कुपोषण, खालावणारी शैक्षणिक गुणवत्ता, आश्रमशाळांची परिस्तिथी, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, हिंसा, खालावणारी जीवनमूल्य, वाढती आर्थिक विषमता, धोक्यातले आदिवासींचे अस्तित्व, जल जंगल जमिन ची लुबाड दिसणार नाही. ज्यातून फक्त माझे कुटुंब, संपत्ती, नोकरी, छंद, मित्र, इत्यादीच दिसतील. फक्त विकास दिसेल, विकास ….

फार व्याट होय डोक्यात त मन लिहून टाकूं, डोकां रिता होल. पन गायचेन अझूक गरगरतं. काही उपाय सुचवजास

जोहार !

Krishna Thakare

unread,
Mar 9, 2019, 12:54:32 PM3/9/19
to adi...@googlegroups.com
सर, माझी पण तीच अवस्था झालेली आहे। आपल्या समाजावर वेगवेगळ्या मार्गाने होणारे हल्ले बघून माझी झोपच उडालेली आहे। रक्तबंबाळ, घायाळ झालेला आपला समाज बघून मन सून्न होतंय। आपल्या समाजाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे हे पाहून खूप वाईट वाटतं। 
सर, आपण आपल्या समाजासाठी जीवतोड मेहनत करताय त्याबद्दल मी सदैव आपला आभारी आहे। मी देखील या समाज कार्यासाठी प्रयत्नशील आहे, पण मी माझ्या वैयक्तिक अतिशय बिकट परिस्थितीशी संघर्ष करत आहे, त्यामुळे अत्यंत कळवळ असूनही मला आपल्या समाजासाठी कार्य करणे शक्य होत नाही। 
तरी आपण आपले हे कार्य असेच अविरत चालू ठेवावे। ही नम्र विनंती। 
काही चुकलं असल्यास क्शमा असावी।

22-02-2019 10:29 pm को "AYUSH main" <ay...@adiyuva.in> ने लिखा:
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6d426f510996d5424d9b5993b9b6180a%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Parag Patil

unread,
Mar 10, 2019, 5:18:41 AM3/10/19
to adi...@googlegroups.com
आपण लिहिलेली परिस्थिती 100 टक्के बरोबर आहे.
फक्त साधारण समाजातच कशाला, ही परिस्थिती सर्वच ठिकाणी आहे. माझा संबंध जास्त करून शैक्षणिक संस्थांशी असल्याने इकडचे उदाहरण देऊ इच्छितो.

१. कोणत्याही मोठ्या शैक्षणिक संस्थे मध्ये (आयआयटी, आयआयएम) एस.टी. प्राध्यापक १% पेक्षा कमी आहेत.आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये एक ही आदिवासी प्राध्यापक नाही.

२. आयआयटी कानपुर मध्ये, एका आर्टिकल नुसार, फक्त आरक्षित मुलांनच कमी मार्क्स मिळाल्याने काढून टाकले गेलेले .

३. एस टी, एस सी च्या मुलांना कमी मार्क्स मिळाल्यामुळे ऍडमिशन मिळाले याचा ठप्पा आयुष्यभर मिरवावा लागतो.पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय सोसले आहे यावर कोणीही चर्चा करीत नाही.

४. ऍडमिशन च्या वेळी, काही काही शिक्षक , जाणून बुजून एस टी एस सि आणि ओ बी सि ना प्राध्यान्य देने टाळतात.

५. आरक्षण हे चुकीचे आहे, या गैरसमजुतीला खतपाणी घालणारे विद्यार्थी खूप आहेत.

६. जवळपास चतुर्थ श्रेणीत खूप लोक आदिवासी, आणि आरक्षित समाजातील आहे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आता कोणत्याही नवीन बनलेल्या संस्थानमध्ये, यांना पर्मनंट केले जात नाही. आणि नोकऱ्या outsource केल्या जात आहेत. या मुळे सामाजिक सुरक्षा नाहीशी झाली आहे.

एकंदरीत जातींवरून , समाजावरून, दिसण्यावरून एवढ्या प्रतिष्ठित संस्थानात एक प्रकारचा लपलेला भेदभाव सर्रासपणे चालतो.

अजून एक , मुंबई पासून एवढ्या जवळ आपण राहत असून सुद्धा, आपल्या (डहाणू, जव्हार, विक्रमगड,वाडा वगैरे) कडे, एकही मोठे कॉलेज नाही. 
आपल्या भागात कमीत कमी 5 सिनियर कॉलेजेस , एक मेडिकल कॉलेज आणि 2 इंजिनीरिंग चे कॉलेजेस असले पाहिजेत.

काही कॉलेजेस आहेत, पण तिथे शिक्षक नाहीत.

उदाहरणार्थ, मी 3 वर्षांपूर्वी तलवाड्याला एका विद्यार्थ्यांशी बोलत होतो, तो म्हणाला की science च्या कॉलेजला physics ला शिक्षक नाही आणि भूगोल शिकवा लागतो. यापेक्षा वाईट काय असू शकते. 

विक्रम गड मधल्या डिप्लोमा कॉलेजला एक ही शिक्षकाची phd नाही (3 वर्षांपूर्वी).

७. आपल्या भागातील आश्रम शाळेत आता खूप कमी शिक्षक पर्मनंट आहेत.

8. आपल्याला जाणून धक्का बसेल, मागच्या १० वर्षांमध्ये जवळपास १००० विद्यार्थी आश्रम शाळांमध्ये सर्पदंश, विंचू , करंट ने वारली आहेत. या वर सरकारने काय केले आहे हे माहिती नाही.

मुलांच्या मूलभूत सोईंवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस , मुंबई ने कित्येक रिपोर्ट दिले आहेत, पण याने काहीही फरक कोणालाही पडत नाही.

एकंदरीत, आदिवासींच्या शिक्षणाची, आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची अवस्था भयंकर दयनीय आहे. एवढे सारे महत्वाचे मुद्दे असताना ,सरकार , न्युज चॅनल्स ,बातम्या फक्त हिंदू मुस्लिम मधेच अडकून पडले आहे ही आपल्या देशाची एक शोकांतिका आहे.

जोहार!!

Parag Patil,
PhD Scholar,
Discipline of Chemical Engineering,
IIT Gandhinagar

+91-9421178717
   या विक्रम

On Sat, Mar 9, 2019, 23:24 Krishna Thakare <anur...@gmail.com> wrote:
सर, माझी पण तीच अवस्था झालेली आहे। आपल्या समाजावर वेगवेगळ्या मार्गाने होणारे हल्ले बघून माझी झोपच उडालेली आहे। रक्तबंबाळ, घायाळ झालेला आपला समाज बघून मन सून्न होतंय। आपल्या समाजाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे हे पाहून खूप वाईट वाटतं। 
सर, आपण आपल्या समाजासाठी जीवतोड मेहनत करताय त्याबद्दल मी सदैव आपला आभारी आहे। मी देखील या समाज कार्यासाठी प्रयत्नशील आहे, पण मी माझ्या वैयक्तिक अतिशय बिकट परिस्थितीशी संघर्ष करत आहे, त्यामुळे अत्यंत कळवळ असूनही मला आपल्या समाजासाठी कार्य करणे शक्य होत नाही। 
तरी आपण आपले हे कार्य असेच अविरत चालू ठेवावे। ही नम्र विनंती। 
काही चुकलं असल्यास क्शमा असावी।
22-02-2019 10:29 pm को "AYUSH main" <ay...@adiyuva.in> ने लिखा:

|| वेडावन का काय मी, कायजून... ||

जल जंगल जमिन जीव...

[ स्थानिक आदिवासी बोली ]

गायचेंन काल परवां काहीं बातम्या वाचल्यां ना डोकां गर गरया दसां लागलां. रगत हों भलतां जोरात हिंडाया लागलां. भूक हो मेलीहें दसीं. काय करूं काहीच नीहीं समजं. ओगाच थोडा वेल खोपाला बसून होतुं. पण डोका बंद दसा पडलातां.

घरा जाय तंव्हा डहाणू ते कासा जाताना सगल्यां जमिनीं जाधेल नांगुन, बस ना डुग डुग्यात बिज्यांचीच वाढती गर्दी नांगुन, आदिवासींना टोचून बोलणारीं लोखां नांगुन, दुकाना ना बाजारात बिज्यांची संख्या नांगुन, नोकऱ्याना हो बीजिच लोखां नांगुन गायचेन भलतां व्याट होय. भलता राग येय, रगत पेट दसां. काय करसील वेड दसां लागल आथां..... उपाय सांगजास शांत रेहायचा.

[ साधारण मराठी ]

काल परवाच्या काही बातम्या वाचल्या (जंगल जमीन आरक्षण) आणि खूप अस्वस्थ झालो आहे. रक्त प्रवाह श्वास जोरात होतोय, भूक मंदावलीय, सारखे डोक्यात घालमेल सुरु आहे. काय करू काहीच समजत नाही. थोडा वेळ शांत बसून राहिलो तरी इत्तर काही सुचतच नाही.

घरी जाताना पण जेव्हा डहाणू ते कासा प्रवास करतो तेव्हा पण असेच होते. सगळ्या जमिनी विकलेल्या पाहून, इतरांची वाढलेली संख्या, प्रवासात आदिवासींना टोचून बोलणारी माणसे, नाक्यावर/बाजारात इत्तरांची वाढती संख्या, दूरवरून आलेले नोकऱ्यावाले बघून खूप घालमेल होते डोक्यात.

जंगल, शेती, जमिनी सोबत हळू हळू आदिवासींचे अस्तित्वच संपत आहे पण सगळे एकदम शांत. सगळे जण आपल्या आपल्या वयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, अध्यात्मिक इच्छा/स्वप्न पूर्ण करण्यात मग्न. बहुतेक जण आपल्या आपल्या चष्म्यातून विकास/आनंदी समाज बघतायेत.

कृपया मला पण एक चष्मा द्याना बनवून ज्यातून वाढते कुपोषण, खालावणारी शैक्षणिक गुणवत्ता, आश्रमशाळांची परिस्तिथी, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, हिंसा, खालावणारी जीवनमूल्य, वाढती आर्थिक विषमता, धोक्यातले आदिवासींचे अस्तित्व, जल जंगल जमिन ची लुबाड दिसणार नाही. ज्यातून फक्त माझे कुटुंब, संपत्ती, नोकरी, छंद, मित्र, इत्यादीच दिसतील. फक्त विकास दिसेल, विकास ….

फार व्याट होय डोक्यात त मन लिहून टाकूं, डोकां रिता होल. पन गायचेन अझूक गरगरतं. काही उपाय सुचवजास

जोहार !

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6d426f510996d5424d9b5993b9b6180a%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.

Bhavesh Lokhande

unread,
Mar 11, 2019, 2:53:28 AM3/11/19
to adi...@googlegroups.com
@Parag Patil : अत्यंत योग्य माहिती आहे.
आपल्याला  जाणून बुजून संघर्षात गुंतवून ठेवण्याची खेळी जातीवादी सरंजामी मानसिकतेचे लोक आपल्या लोकांना हाताशी धरून करत राहतात. 
आपल्याच अनेक मुलांना मी आरक्षणविरोधात बोलताना पाहतो तेव्हा कीव येते.एससी एसटी यांनी एकत्र राहिले पाहिजे , एकमेकांना साथ दिली पाहिजे या मताचा मी आहे.
पालघर जिल्ह्यात ज्या तऱ्हेने जल जंगल जमीन यांवर टोळधाडी पडताहेत ते पाहून वाईट वाटते. आपली गावे स्वावलंबी नाहीत ,  ग्रामपंचायती स्वायत्त नाहीत, तरुण प्रौढ यांच्यात एक विचार नाही , आणि जिल्हापातळीवर मूठभरांच्या राजकारणाने जिल्ह्यात मूलभूत सुविधा नाहीत. 
एका प्रशस्त मेडिकल कॉलेज आणि संलग्न हॉस्पिटलची गरज आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज आहे.
बरे संघर्ष करून ,शिक्षण घेऊन , जी मुले पुढे जात आहेत त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम इथली व्यवस्था करतेय, सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये एससी एसटीच्या प्राध्यापक , कर्मचाऱ्यांची , अधिकाऱ्यांची संख्या नाममात्र आहे. २०० पॉईंट रोस्टर सारख्या क्लुप्त्या लढवून मनुवादी ते अजूनच नगण्य करण्याच्या मागे आहेत. 
माझे हे निरीक्षण आहे कि , आपले लोक लॉबिंग करत नाहीत. आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून स्ट्रॅटेजी ठरवत नाहीत.
शोषितांनी शोषक कितीही चांगले वागले तरी त्यांचे अनुकरण करू नये. पण आपले लोक आपल्यावरचा अन्याय विसरून शोषकांच्या पक्षाकडे,संघटनेकडे,संस्कृतीकडे आकर्षित होतात. आणि हेच आपल्या सर्वांच्या ऱ्हासाचे कारण असणार आहे !

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
Bhavesh Lokhande

चेतन Chetan

unread,
Mar 11, 2019, 11:36:18 AM3/11/19
to adi...@googlegroups.com
Aadivsi is best sellable product. This is what the mind set of nontribals and leaders of our country towards aadivsi

Reply all
Reply to author
Forward
0 new messages