|| *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* ||
आदिवासी कलाकार एकत्रीकरण बैठक आयोजित करीत आहोत. आपल्या संपर्कात असलेल्या *सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी होण्यास सांगावे*.
आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल अशी खात्री आहे.
💡 *उद्देश* :
कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी एक प्रयत्न.
📍 *ठिकाण* :
बिरसा मुंडा सभागृह, कासा ग्राम पंचायत, ता. डहाणू, जि. पालघर
📆 *दिनांक* :
३०/०९/२०१८, रविवार (सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत)
👥 *अपेक्षित सहभागी*
१) आदिवासी कलाकार, युवक, ग्रुप, गट, बचत गट, इत्यादी
(चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे, शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)
२) आणि सदर विषयाला धरून रचनात्मक मार्गदर्शन करणारे
🏷 *बैठकीचे विषय*:
- कलाकारांचे अनुभव, अपेक्षा, आव्हाने, अडचणी आणि त्याची उपाय योजना
- आदिवासी कलेतून आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी लागणारी तयारी
- आयुश तर्फे आगामी उपक्रम माहिती (वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती, महिला गट बांधणी विशेष उपक्रम) - लक्ष ८०० कलाकार/युवा
📝 *नोंदणी*
आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे
आयुश । आदिवासी युवा शक्ती