पालघर नगर परिषद पुन्हा केली सेनेने काबीज , बहुजन विकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही
डहाणू वार्ताहर [संतोष पाटील]
पालघर नगर परिषदेचा अंतिम निकाल हाती आला असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्राप्त करून सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळवले आहे .महायुतीने २८ पैकी १७ जागांवर यश प्राप्त केले आहे . पालघर नगर परिषदेच्या निवडणुकी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच दि. २३/३/२०१४ रोजी झालेल्या मतदानासाठी एकूण ७ प्रभागातून २८ जागांसाठी १२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना आज मतमोजणी दरम्यान अंतिम निकाल हाती आले असून शिवसेनेने १७ राष्ट्रवादी १० तर काँगेसला फक्त १ जागेवर समाधान मानावे लागले या निकाला दरम्यान मतमोजणीचा कौल ऐकण्यासाठी आलेल्या जनतेने गर्दी करून गोंधळ घातल्यानेपोलिसांनी अचानक लाठीमार केला या दरम्यान ६ महिला जखमी झाल्या असून [१.वासन्ति वसंत म्हात्रे वय ६० ,२. तन्वी परेश पाटील वय १४ ,३ज़ायदा गुलाब शेख ४. बबिता यादव म्हात्रे वय ४७ ५. जानवी जयेश पाटील वय ३० ] त्यांनाग्रामीण रुग्णालय पालघर येथे दाखल केले . मात्र बहुजन विकास आघाडीला मतदार राजाने या निवडणुकीत घरीच बसायला लावले असून त्यांच्यावर आत्म परिक्षनाचि वेळ आणली आहे. या निवडणुकी मध्ये उमेदवारांना मिळालेले मताधिक्य पुढील प्रमाणेशिवसेना ;१] प्रियांका प्रवीण पाटील १६८० २अ ,२] सुनिता मधुकर पाटील१४६२ २ब ,३] जितेंद्र धर्मराज पामाळे१५६९ २ड ४] जयश्री महेश भानुशाली १३८६ ३ब ५] लीना हेमंत पाटील १८९८ ३क ६] श्री रहीस मोबीन शेख १६५६ ३ ड ७} संजय पांडुरंग गायकवाड २४१९ ४ अ 8) उत्तम मोरेश्वर घरत २६०५ 4 ब ९} रेशमा सुदाम गडग २५७६ ४ क. १०} स्वाती सुरेश मोरे २४६५ ४ ड . ११}प्राजक्ता नंदकुमार वर्दे ९९१ ५ अ . १२} प्रलय शरदचंद्र पटेल १०३७ ५ ब. १३} उत्तम रमेश पिंपळे १२४५ ५ ड. १४}कश्मीरा केतन पाटील १७२९ ७ अ. १५. सागर चिमन दुबळा १६७६ ७ ब. १६} अंजली परेश पाटील १६३३ ७ क. १७. अतुल जनार्दन पाठक – १५१७ ७ ड. राष्ट्रवादी:- 1.रेश्मा रविंद्र म्हात्रे १०६५ १ अ. २. बिंदीया संतोष दिक्षीत ११०२ १ ब. ३. प्रविण मधुकर मोरे ९७५ १ क, ४. सुरेश किसन दुबळा १०४३ १ ड. ५. प्रितम विश्वनाथ राउत – १२७९ २ क, ६. मकरंद सिताराम पाटील १७७७ ३अ, ७.श्वेता मकरंद पाटील -९९१ ५ क . ८. नंदकुमार वामन पाटील -१२०६ ६ अ,९.सचिन बाबूराव पाटील १३०१ ६ क, १०. वनिता प्रफुल्ल प्रजापती – ११२३ ६ ड.काँग्रेस- उज्ज्वला केदार काळे- १३२९ ६ ब.आता पालघर विकासाच्या डृष्टीने सक्षम नगराध्यक्ष कोण होणार यांकडे पालघर वासीयांचे लक्ष लागलेय.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2f5f4e79-9f32-40af-8cac-ecbb52d97434%40googlegroups.com.--
-----------------------------------------------------------------------
Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2f5f4e79-9f32-40af-8cac-ecbb52d97434%40googlegroups.com.
--
Ramesh
मयुरेश वाघ, वसई
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत श्रमजीवी संघटना व वसई जनआंदोलन समिती यांचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला असणार हे रविवारी जाहीर होणार आहे. जनआंदोलन समितीमध्ये भाजप किंवा काँग्रेसला पाठिंबा द्यावा याबाबत दोन मतप्रवाह असून आता कोणता निर्णय जाहीर होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. खासदाराच्या विजयाचे गणित आम्हीच ठरविणार असा दावा श्रमजीवी व जनआंदोलनने केला असून बविआचा पराभव करणाऱ्याला पाठिंबा देणार, असे त्यांनी म्हटले आहे. पालघर मतदारसंघातील दुर्गम आदिवासी भागात तसेच वसईच्या पूर्वपट्ट्यात श्रमजीवीचे संघटन व ताकद आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा मागितला आहे. बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रमजीवी संघटनेच्या विद्युल्लता पंडित, बाळाराम भोईर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महायुतीला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यावर बोईसर, भिवंडी ग्रामीण हे विधानसभेचे मतदारसंघ शिवसेनेने श्रमजीवीला सोडावेत अशी मागणी श्रमजीवीने केली असली तरी त्यावर पुढे निर्णय होईल, असे उद्धव यांनी सांगितल्याचे कळते. श्रमजीवी संघटनेचे कामकाज वेगळे चालते असे दिसत असले तरी श्रमजीवी व जनआंदोलन समिती या दोन्हींचे निर्णय आमदार विवेक पंडित हेच घेतात. वसईच्या ग्रामीण भागात पालिकेला विरोध करून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सहभागाने स्थापन झालेल्या जनआंदोलन समितीमध्ये सर्वपक्षांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यात भाजपला पाठिंबा द्यावा, असे काहींचे म्हणणे आहे. तर काँग्रेसला पाठिंबा द्यावा, अशी मागणी ख्रिस्ती पट्ट्यातील जनआंदोलन कार्यकर्त्यांकडून होत आहे. जनआंदोलनाने कुणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पंडित यांना कोअर कमिटीने दिले असून आता ते कार्यकर्त्यांची मते आजमावून घेत आहेत. जनआंदोलन ठरवेल त्याचे काम करू, अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. रविवारी बैठक रविवार ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता वसई रोड साईनगर येथील मैदानात श्रमजीवी, जनआंदोलनच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा होणार असून त्यात या दोन्ही संघटनांची भूमिका जाहीर होणार आहे. श्रमजीवी, जनआंदोलन या शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा देतील असे सध्या तरी दिसत आहे. एक तर काँग्रेस किंवा भाजपला पाठिंबा देणे किंवा कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार काम करू देणे, असे पर्याय जनआंदोलनसमोर आहेत. 'बहुसंख्य कार्यकर्त्यांचा कल कुठे आहे हे पाहून निर्णय घेणार आहोत. गावांवर पालिका लादणाऱ्या बहुजन विकास आघाडीचा पराभव करणे हे आमच्या कार्यकर्त्यांचे लक्ष्य असून त्यांचा पराभव करू शकेल अशा उमेदवाराला पाठिंबा देऊ', असे पंडित यांनी सांगितले. रविवारच्या मेळाव्यात ते सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे काय निर्णय जाहीर होतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रमजीवी-जनआंदोलनने पाठिंबा दिल्यास किमान ५५ ते ६० हजार मते त्या उमेदवाराच्या पारड्यात पडू शकतात, असा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती व जनआंदोलन समितीचे नेते विजय पाटील यांचे राजेंद्र गावितांशी चांगले संबंध आहेत. सांडोर येथील काँग्रेस कार्यालयाचे उदघाटन बुधवारी झाले त्यावेळी विजय पाटील हे काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थित होते. आपण वसईत त्या परिसरात होतो व मुझफ्फर हुसेन यांची भेट घ्यायची असल्याने आपण तिथे गेलो होतो, असे पाटील यांनी सांगितले. गावित यांचा आज अर्ज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनीही वसईत येऊन मच्छिमार तसेच इतर संस्था, संघटनांच्या पदाधिकार्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. गावित आज १२ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करताना काँग्रेस-राष्ट्रवादीही शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता असून ३ ते ४ हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले. गुरूवारी सीपीएमचे उमेदवार खरपडे यांनी आपला अर्ज दाखल केला. राज्यमंत्री गावित यांच्यावर टीकानरेंद्र पाटील, पालघर डहाणू तालुक्यातील आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या कार्यपध्दतीवर खडे बोल सुनावले. पालघर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा डहाणू येथील श्यामराव पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणूचे माजी आमदार कृष्णा घोडा यांनी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या कार्यपध्दतीवर टीका करीत सांगितले की, आदिवासीसाठी असलेल्या अनेक योजना डहाणू, तलासरी तालुक्यात पोहोचल्या नाहीत. आदिवासी विभागाकडे नागरिकांचे प्रश्न तसेच विकास कामे मंजुरीसाठी नेली असता तेथील अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत राज्यमंत्री गावितांनी सांगितल्यावरच मंजुरी देऊ, अशी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघात पालघर प्रमाणेच डहाणू तालुक्याचाही काही भाग येत असून हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने आम्ही आघाडीचा उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांना प्रचंड मेहनत करून निवडून आणले. मात्र निवडून आल्यानंतर गावित मतदारांपासून दूर गेलेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांपासून देखील खूपच लांब निघून गेले, असे कृष्णा घोडा यांनी सुनावले. आदिवासी विभागामार्फत तसेच राज्याच्या अनेक योजनामधील विकासकामासाठी निधी आणल्याचा डांगोरा राजेंद्र गावित दररोज पिटत आहेत. मात्र हा निधी कुठे खर्च केला व गेला कुठे ते दिसत नसल्याने त्याचे नेमक काय झाले, याचा खुलासा गावितांनी करावा, अशी भूमिका कृष्णा घोडा यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य व ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आघाडीतील कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद विसरून लोकशाही बळकट करण्यासाठी आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी झटले पाहिजे, असे आवाहन केले. गावितांचे आश्वासन आघाडीचे उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी साडेचार वर्षांत आपल्याकडून झालेल्या चुकांची कबुली देत आपण निवडून आल्यानंतर यापुढे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेहमी संवाद साधू व खासदार निधीतील विकास कामे केली जातील, असे आश्वासन दिले. या मेळाव्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दामू शिंगडा, आमदार आनंद ठाकूर, एनसीपी तालुका अध्यक्ष राजेश पारेख, काँग्रेस तालुका अध्यक्ष भरत राजपूत, डहाणू नगराध्यक्ष मिहीर शहा, एनसीपी प्रदेश सदस्य प्रभाकर राऊळ माजी नगरसेवक शशीकांत बारी, माजी जिप सदस्य विवके कोरे व पांडुरंग बेलकर, सुरेंद्र पाटील, मुकुंद चव्हाण, बाबा जोशी तसेच जिल्हा परिषद व पंचायत सिमती सदस्य, नगर सेवक, सरपंच उपस्थित होते. |
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/bd9a64fc-62cf-4bec-84a1-78020f343bc3%40googlegroups.com.
मित्रहो.!
आज रविवार दि.०६एप्रिल२०१४ रोजी वसई साईनगर येथे वसई-जन आंदोलन समिती व श्रमजीवी संघटना यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा जाहिर करण्यासाठी वसई चे आमदार मा.श्री.विवेक(भाऊ) पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित श्रमजीवी संघटनेच्या च्या संस्थापिका अध्यक्षा श्रीम.विद्द्युलता पंडित,जिल्हा परिषद ठाणे कृषी,दुग्ध व पशुसंवर्धन सभापती श्री.विजय पाटील, व.वि.म.पालिकेचे विरोधी पक्षनेते श्री.विनायक निकम,श्रीम.डॉमिनिका डाबरे,श्री.फ्रान्सिस लोपीस,वसई-विरार ब्लाँक काँग्रेस च्या अध्यक्षा श्रीम.वेरणेकर, वसई जन आंदोलन समितीचे समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.!!
सदरच्या मेळाव्यात "महायुती"च्या उमेदवारास पाठिंबा जाहिर.!!
महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,लालबहादुर शास्त्री यांच्या कल्पनेतला काँग्रेस पक्ष आता वसई-विरार मध्ये राहिला नसून..काँग्रेसने अखेर विरारच्या माफियागिरी समोर नांगी टेकत आपले घाणेरडे राजकारण दाखवले..!!
काँग्रेसच्या नेत्यांनी विरारच्या माफिया धनशक्तिस शरण जात श्री.राजेंद्र गावितां सारख्या राज्यमंत्र्यांचा आपमान करत..त्यांना खासदारकिचे गाजर दाखवत फसवून विरारच्या माफियांना पाठिंबा देवून..पुन्हा विकावु,गलिच्छ राजकारण केले..!! टाडाचे आरोपी,गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या विरारच्या माफिया शक्तीस काँग्रेस ने पाठिंबा जाहिर केल्यामुळे..काँग्रेसचे नाराज पक्षनिष्ठ कार्यकर्तेही आता विरारच्या मफियांची "दहशत" मोडून काढण्यासाठी वसई जन आंदोलन समिती समवेत महायुती बरोबरच जातील..!!
आता नक्कीच अब की बार.. महायुती का सरकार.!!
shared on fb
पालघरचा तिढा कायम | |
- सकाळ वृत्तसेवा |
कॉंग्रेस, गावितांच्या अस्तित्वाचा प्रश्न | |
- भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा |
राजेंद्र गावितांचा पत्ता कट | |
- - सकाळ वृत्तसेवा |
...
...
शेवटपर्यत टिकले ते ' मावळे ',आणि अर्ध्यावर उडाले ते ' कावळे '
राजकारण,पार्टी,खुर्ची हे सर्व अळवाच्या पानावरच पाणी असते हे आदिवासी
विकास मंत्री गावित यांना जबरदस्ती माघार घ्यायला लावण्याच्या काँग्रेस
पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे . पक्षश्रेष्ठीच्या एका
फतव्याच्या फटका-याने हे मंत्री,नेते वाफ होउन उडुन जातात .निवडणुकीच्या
आधी सामाजिक लढ्यातील ब-याच कार्यकर्त्यांना पक्ष-पार्ट्याची आमंत्रणे येत
असतात,राजकारणातील सोनेरी आश्वासनांना आणि स्वप्नांना भुलून बरेच उथळ कार्यकर्ते
सामाजिक लढा,संघटना सोडुन पक्षांच्या भाऊगर्दित सामील होतात.काय असते की "
शेवटपर्यत टिकले ते ' मावळे ',आणि अर्ध्यावर उडाले ते ' कावळे ' ! तर आपली
सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की "कावळे होउन राजकारणात
जाण्यापेक्षा आदिवासी समाजाच्या लढ्यात टिकुन राहा आणि आदिवासी मावळे
म्हणुन अभिमानाने मिरवा.राजकीय पक्ष आदिवासी जनता किंवा नेता कोणाचाही
विचार करत नाहीं हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .वसई-विरार पासुन अगदी
डहाणु-तलासरी पर्यंत बिल्डर लाँबीचा एकछत्री अंमल राहावा व आदिवासींच्या
जमीनी बिनबोभाट लुटता याव्यात म्हणुन कसा डाव खेळले बघा ! तिकडे दुसरे
डाँ.गावित वैद्यकिय शिक्षणमंत्री मुलगी भाजपातुन उभी राहीली म्हणुन
मंत्रीपद गेलं वरुन आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात गुंतवले.आदिवासी
मंत्र्यांना ही वागणुक पण पक्षश्रेष्ठिचे पहा,सोनिया गांधी कांग्रेस
अध्यक्ष आणि मनेका गांधी,प्रियंका गांधी मात्र भाजपात .त्यांनी केलं तर वाह
वाह आणि आम्हि केलं तर गंदी बात ?? सावध व्हा आणि ह्या मृगजलाच्या मागे
लागण्यापेक्षा चला कंबर कसा स्वायत्ततेसाठी लढा,स्वतचा जिल्हा मिळवुन घेउ.
त्यासाठी सर्व आदिवासी बांधवापर्यंत पोहचा त्यांना जागृत करा,एकत्र करा
त्यानंतर राजकारणाचा विचार करा जेव्हा सत्ता व निर्णय प्रक्रिया
आदिवासींच्या हातात असेल.आता ती परकियांच्या हातात आहे म्हणुन सद्या
पक्षांसाठी लढण्यापेक्षा प्रथम सत्ता व निर्णय प्रक्रिया आदिवासींच्या
हातात येण्यासाठी लढा . आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली एक होउ
या,प्रथम समाजासाठी लढु या !! आदिवासी एकता-जिंदाबाद !! स्वयत्त जिल्हा
आदिवासींच्या हक्काचा-नाहीं कोनणाच्या बापाचा !! जय आदिवासी!!
...</
...<table