हा पाठ दुरुस्त करून योग्य माहितीसह समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत

169 views
Skip to first unread message
Assigned to adi...@gmail.com by me

Adivasi Ekta Parishad

unread,
Apr 26, 2016, 12:23:33 PM4/26/16
to Adivasi Yuva Shakti
ई. 6वी च्या नवीन पाठ्यपुस्तकात वारली चित्र कलेवर आधारित पाठ समाविष्ट केला खरा पण त्यांत चुकीची माहिती दिली गेली आहे. उदाहरणार्थ चौक "धवलेरी" काढते. आणि हे चित्र सात-आठ स्त्रिया मिळून पुर्ण करतात इ. वारली कलेला पाठ्यपुस्तकात स्थान मिळणे हे समाजासाठी गौरवास्पद असले तरी खरी माहिती जगासमोर येणे गरजेचे आहे. चौक "सवासनी" काढतात आणि त्या एका नव-या किंवा नवरी साठी दोघी दोघी जणी असतात आणि गरजेनुसार मदतीला स्त्रीया घेतात. "धवलेरी" ही लग्न लावणारी लग्न पुरोहित असते. स्त्रीच्या हातून लग्न लावणारा, स्त्रियांना लग्न लावण्याचा मान देणारा आदिवासी वारली हा कदाचित एकमेव समाज पृथ्वीच्या पाठीवर असेल. या चुकीच्या माहितीमुळे एकीकडे मुलगी नको म्हणून भारतात स्त्री - भ्रूणहत्या करुन स्त्रीचे जगणे नाकारले जात असताना आदिवासी समाज स्त्रीला फक्त समान मानणाराच नव्हे तर तिला लग्न पुरोहिताचा उच्च व पवित्र मान आदिवासी समाज देतो,ही संपूर्ण समाजाला आणि देशाला अभिमानास्पद गोष्ट लपवली जात आहे. तरी सर्व सुजाण बंधु-भगिनींना विनंती की हा पाठ दुरुस्त करून योग्य माहितीसह पाठ्यपुस्तकात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत. :-विनोद दूमाडा - आदिवासी एकता परिषद. कृपया फारवर्ड करा. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळापर्यंत पोहचला पाहिजे.

Inline image 1


Inline image 2

जोहार मित्रहो, [विनोद दूमाडा (आएप)] :- धवलेरी(आदिवासी स्त्री विवाह पुरोहित ) ही बहुतांशी विधवा असते. धवलेरी सवाष्ण असावी किंवा विधवा असावी असे बंधन नसते. बहुतांश भारतीय समाज विधवेला पांढऱ्या कपाळाची, अपशकुनी मानताना दिसतो, विवाहासारख्या पवित्र कार्यात अपशकुन नको म्हणून तिला जवळपास सुद्धा फिरकू दिले जात नाही, तिला बंदिस्त जीवन जगण्यास भाग पाडले जाते..... पुर्वी तर तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळले जाई. म्हणजेच एक माणूस म्हणून तिचा प्रत्येक हक्क, अगदी जिवंत राहण्याचा नैसर्गिक हक्क सुद्धा हिरावून घेतला गेला होता. तीने न केलेल्या चूकिची(पती निधनाची) शिक्षा तिला दिली जात असे किंबहुना आजही दिली जाते. तथाकथित "प्रगत" व "सुसंस्कृत" समाज विधवेला ही अमानुष-अमानवीय वागणूक देत असताना समाजाने रानटी - असंस्कृत व मागास मानलेला आदिवासी समाज मात्र स्त्री ला एक माणूस म्हणून पुर्ण अधिकार व मानाची वागणूक देताना दिसतो. एखाद्या स्त्रीच्या पती निधनानंतर तिला पुनर्विवाहाचा हक्क तर देतोच देतो पण विवाह नाही केला तरी तिला शुभ कार्यापासून वंचित ठेवले जात नाही. दोन विधवा एकत्र बसून लग्नातील हळद,बाशिंग ह्या कार्यक्रमात नियमित सहभागी होताना दिसतात. बहुतेक समाजात लग्न पुरोहित पदावर पुरुषांचा एकाधिकार व मक्तेदारी असताना आदिवासी समाज मात्र एका विधवेकडून लग्न लावून घेतो. संपूर्ण मानवजातीला आदर्श घेण्यासारखी ही परंपरा आदिवासी समाजाने आजही टिकवली आहे. अशा एक ना अनेक सुंदर परंपरा आदिवासी समाजाने जिवंत ठेवल्या आहेत..... कधी कधी वाटते की मानवता जिवंत ठेवायची असेल, हे जग जीवघेण्या स्पर्धेच्या विनाशातून वाचवायचे असेल तर आदिवासींना सुसंस्कृतपणा शिकवणे बंद करून जगाने आदिवासींकडून मानवतावादी जीवन पद्धती शिकावी. मद्यपी, रानटी, घाणेरडे, क्रुर ही विविध माध्यमांनी निर्माण केलेली प्रतिमा भेदून पाहावी.... एक नितांत सुंदर जीवन दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही.
--

vishnu shelke

unread,
Apr 27, 2016, 1:48:50 PM4/27/16
to adi...@googlegroups.com
very nice information...about our tribal culture....


--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMrDCLno%2BNgsiXbLDNF2stvUx3vWyvr0Ec55PNiD4dYK5MFiOg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

vinay kantela

unread,
Apr 27, 2016, 1:49:01 PM4/27/16
to adi...@googlegroups.com
Well said, I double it.

Vinay.

2016-04-26 21:53 GMT+05:30 Adivasi Ekta Parishad <adivasiekta...@gmail.com>:

--

Adivasi Ekta Parishad

unread,
May 20, 2016, 1:26:47 PM5/20/16
to Adivasi Yuva Shakti
प्रत्येक आदिवासी वारली, मल्हार कोळी, कोकणा, धोडी, कातकरी या वारलखंड आता किंवा वरलाट प्रदेशात म्हणजे उत्तर कोकणात राहणाऱ्या तरुण बंधु भगिनींनी फक्त आणि फक्त धवलेरीकडूनच लग्न लावून घेण्याचा हट्ट धरला पाहिजे. आपली सुंदर संस्कृति संवर्धित करावी.या पृथ्वीच्या पाठीवर एकही एवढा प्रगत विचारांचा समाज दिसणार नाही. जो स्त्रियांना लग्न कार्यात एवढे महत्वाचे स्थान देत असेल. बहुतेक समाजात लग्न लावायचे काम पुरूष वर्गाकडेच राखून ठेवलेले दिसते. मग तो ब्राह्मण, फादर, पास्टर, मुल्ला-मौलवी असो वा स्वतचे घाणेरडे पाय धुवून सत्संगी भक्तांना पाजणारा निरंकारी महात्मा असो.सर्वच धर्म पंथ स्त्रियांना दुय्यम स्थान देताना दिसतात. आणि एखादी स्त्री जर विधवा असेल तर तिची परिस्थिती तर फारच बिकट असते. तिने न केलेल्या चुकीची शिक्षा तिला सुसंस्कृत मानणारा समाज देत असतो. तिच्या नवऱ्याचे निधन झाले ह्यात त्या बिचार्‍या बाईची काय चुकले ........? पण त्यासाठी तिला मृत नव-या बरोबर जिवंत जाळून मारायलासुद्धा हा स्वतला पुढारलेला आणि उच्च समजणारा समाज मागे पुढे पाहत नसे. आजही एखाद्या विधवा स्त्रिया दुसरा विवाह नाकारून आयुष्यभर पांढऱ्या कपड्यात शृंगाराशिवाय राहण्यास भाग पाडले जाते. विशेषतः विवाहासारख्या शुभ प्रसंगात तर तिला समोर सुद्धा येऊ दिले जात नाही. का ? तर शुभ कार्यात अपशकुन होईल म्हणून... तिला पांढऱ्या कपाळाची, अपशकुन म्हणून चिडवून मरणाच्या यातना दिल्या जातात. या उलट स्वतला प्रगत समजणाऱ्या आणि आदिवासींना मागास, अनपढ, रानटी म्हणणाऱ्या या समाजाला एका स्त्री च्या यातना, भावना समजू नये हे किती मोठे विडंबन आहे...? या उलट आदिवासी समाज मात्र स्त्री ला समानतेचा व पुर्ण स्वातंत्र्याचा अधिकार देतो. पती निधनाचा दोष विधवेला न देता तिला मनपसंत व्यक्ती बरोबर दुसर्‍या लग्नाची परवानगी देतो. आणि एखादी विधवा लग्न न करता राहिली तरी तिला पुर्ण सन्मानाने वागवतो. लग्नात सवासनीचे काम सोडून ती सर्व कार्यक्रमात सहभागी होऊ शकते. लग्न गीते गाऊ शकते, लग्न मंडपात मुक्तपणे नाचू शकते, हळद घेते, बाशिंगाला बसू शकते...... एवढेच काय तर आदिवासी समाज याच विधवेकडून नवीन वधूवराचे लग्न लावून घेतो. एवढे पुढारलेली संस्कृति कोणत्या जातीची आहे का...? धवलेरी ही एक विधवा असते जी आमचे लग्न लावते...... किती महान गोष्ट आहे.... माणसाला माणुस म्हणुन पुर्ण सन्मानाने जगवणारी ही महान संस्कृति पुढे नेणे तरुण तरुणींची आमची जबाबदारी आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा. गुलामासारखे ब्राह्मण, फादर, महात्मा, पास्टर यांच्या पुढे लग्न लावायची भिक मागून खाली मान घालून उभे राहून जगायचे नाही. तर सन्मानाने लग्न लावेल तर धवलेरीच...!!

Inline image 1


For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Adivasi Ekta Parishad

unread,
May 20, 2016, 1:28:29 PM5/20/16
to Adivasi Yuva Shakti
सहावीच्या नवीन 'मराठी बालभारती' पाठ्यपुस्तकात आदिवासींविषयी चुकीचा उल्लेख! दुरूस्तीसाठी आदिवासी समाज आग्रही. 

'महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मीती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे' यांनी 'राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५' आणि 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९' अनुसार राज्यात 'प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - २०१२' तयार करून २०१३-१४ या शालेय वर्षापासून क्रमशः कार्यवाही सुरू आहे. याच शासनमान्य अभ्यासक्रमावर आधारित या वर्षी इयत्ता सहावीसाठी नवीन पाठ्यपुस्तक निर्मिती झाली आहे. त्या पाठ्यपुस्तकांपैकी 'मराठी बालभारती' या पाठ्यपुस्तकात नऊ क्रमांकाचा 'वारली चित्रकला' हा सुप्रसिद्ध 'वारली चित्र शैली' व आदिवासी जीवनावर प्रकाश टाकणारा डॉ.गोविंद गारे यांचा पाठ समाविष्ट केला आहे. पाठाची मांडणी अतिशय सुरेख असली तरी त्यात काही चुकीची माहिती आली आहे, जी दुरूस्त करून लिहणे नितांत गरजेचे आहे. 
सदर पाठात 'भित्तिचित्रे चितारणा-या स्त्रियांना 'धवलेरी' म्हणतात' असा चुकीचा उल्लेख आला आहे. खरे पाहता वधूवराच्या बैठकीच्या मागच्या कुडाच्या भिंतीवर 'चौक' चितारण्याचे काम 'सवासनी' (अनेकवचन) म्हणून नेमलेल्या स्त्रिया करतात. मुख्य 'सवासीन'(एकवचन) स्त्रीने चौकाची पहिली रेख प्रार्थना करून ओढल्यानंतर इतर स्त्रियांना घराच्या इतर कुडांवर आपापल्या कल्पनेतून वारली चित्रे चितारायची मुभा असते. पाठात उल्लेख आलेल्या 'धवलेऱ्या' (अनेकवचन) या नव वधूवराचे लग्न लावणाऱ्या 'स्त्री लग्न पुरोहित' असतात. येथे 'सवासीन' व 'धवलेरी' (एकवचन) या दोन संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. आणि त्याद्वारे आदिवासी समाजातील स्त्रियांना समानतेची व सन्मानाची वागणूक देण्याचे मुल्य विद्यार्थ्यांसमोर ठेवणे गरजेचे आहे. 
येथे धवलेऱ्या व सवासनी यांच्या लग्नातील व आदिवासी समाजातील स्थान व कार्याबद्दल आढावा घेणे अनुषंगिक ठरेल.
बहुसंख्य आदिवासी वारली समुदायाचे वास्तव्य असलेल्या 'वारलखंड किंवा वरलाट प्रदेशात' म्हणजेच उत्तर कोकणात लग्न प्रसंगी स्त्रीयांना विशेष स्थान असते. किंबहुना लग्नविधी स्त्रियाच पार पाडतात असेच म्हणावे लागेल. यामध्ये महत्वाच्या असतात त्या "सवासनी" आणि 'धवलेऱ्या' ह्या स्त्रिया. सवासनी म्हणजेच लग्नसमारंभाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत गाव कारभा-यांच्या जोडीने लग्न संचलन करणा-या स्त्रिया. विशेषतः सवासनी लग्नघरात वधूवराच्या बैठकीच्या मागे असलेल्या कुडाच्या भिंतीवर चौकाच्या देवाचे नक्षीदार चित्र रेखाटून त्यात इतरही देवता रेखाटतात. याला चौक लिहणे असे म्हणतात आणि ते फक्त सवाष्ण स्त्रिया करतात. सुप्रसिद्ध "वारली चित्र शैली" च्या सवासनी या निर्मात्या,वाहक व संरक्षक आहेत. सवासनींनी लिहिलेल्या या चौकाच्या देवाची प्राणप्रतिष्ठा भगत करतो. 
धवलेरी म्हटलेल्या स्त्रिया या बहुधा जेष्ठ स्त्रिया असतात आणि बऱ्याच वेळा त्या विधवा असतात. यांचे कार्य सवासनींनी चौक लिहिल्यानंतर (रेखाटल्यानंतर) भगताच्या जोडीने सुरू होते. चौकाच्या देवाची प्राणप्रतिष्ठा (देव खेलवने) विधी संपन्न केल्यानंतर भगताचे काम संपते परंतु धवले-यांचे काम लग्न लागेपर्यंत चालते. त्या लग्न घरात त्यांच्या जवळचा दिवा सदैव तेवत ठेवून देवदेवतांची गीते म्हणत असतात. लग्न कार्याची सुरूवात उंबर वृक्षाची फांदी (उंबरमेढ) आणून होते. उंबर हा निसर्गाच्या मालकीचा वृक्ष. त्याची फांदी तोडण्याआधी धवले-या इतर चार प्रजातीच्या वृक्षांखाली सवासनींसह जाऊन पुजाअर्चा करून निसर्गाची परवानगी घेतात.मंडपात लग्नासाठी सवासनींनी वधूवरांना उभे केल्यावर धवलेऱ्या लग्नविधी गीते म्हणायला सुरुवात करतात. या गीतांद्वारे त्या म्हणतात की वधूवर लग्नासाठी मंडपात ऊभे आहेत, लग्नाची तयारी झाली आहे. मग एका देवाचे नाव घेऊन त्या देवाला लग्न मंडपात येऊन बसण्याचे आमंत्रण देतात व त्या पार्थना करतात की देवा तुमच्या कृपे शिवाय आम्ही लग्न लावू शकत नाही म्हणून त्वरा करून या. देवांना वधूवरांना आशिर्वाद देण्याचे आवाहन करतात. अशा पद्धतीने एका देवाला आवाहन केल्यावर एक 'घडी' चढती झाली असे धवले-या आपल्या गीतातून जाहीर करतात.अशा चोवीस देवांना आवाहन करित चोवीस घड्या चढत्या केल्या जातात व प्रत्येक घडी चढती झाली असे जाहीर केल्यावर वधूवराच्या पाठीमागे ऊभ्या असलेल्या करवल्या वधूवराच्या डोक्यावरून मंगल कलश (क-हा) ओवाळतात. त्याच वेळी उपस्थित वऱ्हाडी मंडळी अक्षता म्हणजे हळदीतील तांदूळ,ज्वारी इ. धान्य वधूवराच्या डोक्यावर टाकून आशिर्वाद देतात. जशा चोवीस घड्या चढत्या केल्या जातात तशाच अजून चोवीस देवता आणि त्यांच्या जोडीला लग्न प्रसंगी आवश्यक मान्यवर यांना लग्न मंडपात येऊन बसण्याचे आवाहन करुन चोवीस घड्या उतरत्या केल्या जातात. म्हणजेच एकूण अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त कवने असलेले हे लग्नविधी गीत या धवले-यांना अचूक क्रमाने पाठ असते. हे गीत त्या कशा शिकतात किंवा पाठ करतात हे कोणालाच माहीत नाही. धवलेऱ्यांची ही लग्नविधी गीते म्हणजे मिळालेली दैवी देणगी आहे असे मानले जाते. याच विधीच्या पुढच्या भागात धवले-या छोटासा अग्नी पेटवून देवांना वधूवराच्या हस्ते विविध धान्ये दान करतात परंतु ती धान्य आगीत न पेटवता जमीनीवर सोडली जातात. आदिवासी समाजात धान्य(कनसरी) पेटवणे हे फार मोठे पाप समजले जाते. त्याच अग्नी भोवती धवलेऱ्यांच्या लग्न गीतांच्या सुरांवर वधूवरांना सवासनी हात घरुन मंगल कलसातील जल चार दिशांना सोडत फेरे पुर्ण करतात. वाजंत्रीच्या सुमधूर सुरांनी लग्नविधी संपन्न होतो.यानंतर धवलेऱ्यांचे कार्य संपते परंतु सवासनी मात्र अजून एक किंवा दोन दिवस लग्न घरी विविध विधी पार पाडत असतात. धवले-या या सेवेच्या बदल्यात काही धान्य घेत असत परंतु आज पैश्यांना महत्त्व आल्याने इतरांचे अनुकरण करत काही रक्कमही घेतली जाते. कोणतीही घाई गडबड किंवा गाजावाजा न करता भक्तिमय वातावरणात धवलेरींद्वारे लागणारे लग्न अनुभवण्यासारखे असते. आज आधुनिकीकरण व विकासाच्या रेट्यापुढे ही सुंदर परंपरा व हे सेवाभावी व्यक्तीमत्व टिकवून ठेवणे सुशिक्षित तरुण पिढीच्या हाती आहे.
बहुसंख्य समाजात विधवेला लग्नासारख्या शुभ कार्याचा सून दुर ठेवले जात असताना वरलाट प्रदेशातील आदिवासी मात्र विधवा स्त्रियांना लग्न लावण्याचा अधिकार देतात हे अनुकरणीय आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांसमोर वास्तविक व योग्य पद्धतीने याव्यात, नवीन पिढीसमोर चुकीचा पायंडा पडू नये म्हणून आदिवासी समाज आग्रही आहे. याच पाठाखाली प्रकल्प म्हणून दिलेला स्वाध्याय सुद्धा सदोष व देवतांची चुकीची प्रतिमा निर्माण करणारी आहे. विशेषतः आदिवासी युवा शक्ती संघ (आयूश), आदिवासी वारलखंड जनांदोलन (आवाज दो), आदिवासी एकता परिषद या संघटनांनी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे मान. संचालक,प्रकाशक तसेच मान. शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेटून आपल्या सुचना कळविण्याचे ठरविले आहे. तसेच याबाबतीत सोशल नेटवर्किंग व मिडिया वरून जागृतीची मोहीम सुरू केली जाणार आहे. :- विनोद देवजी दूमाडा, आदिवासी एकता परिषदेसह आदिवासी वारलखंड जनांदोलन (आवाज दो)


Inline image 1

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
May 20, 2016, 1:58:43 PM5/20/16
to AYUSH google group
Reply all
Reply to author
Forward
0 new messages