जागतिक आदिवासी " दीन " मुक्त होईल का ?

17 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 7, 2015, 8:38:19 AM8/7/15
to AYUSH google group


AYUSHonline team


---------- Forwarded message ----------
From: vijaykumar ghote <vijayk...@gmail.com>
Date: 2015-08-07 17:41 GMT+05:30
Subject:
To: AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>


जागतिक आदिवासी " दीन " मुक्त होईल का ? 


भारताला स्वतंत्र होऊन साठी गाठली आहे मात्र् आजही ८० टक्के आदिवासी समाज पारतंत्र्यात जगात आहे बोटांवर मोजता येईल इतक्या लोकांनी आरक्षण ,सवलती ,मिळून स्वतःला सावरून घेतलं मात्र मागे गरिबीत खितपत पडलेल्या आपल्या समाज बांधवांकडे कधीच लक्ष दिल नाही सवलती आणि आरक्षण हा मुद्दा समोर आला कि निर्लज्ज माणसालाही समाज आठवतो फक्त फायदा समोर असला कि आदिवासी आदिवासी म्हणणारे खूप आहेत. आदिवासी दिन 'असला कि आमच्या पुढार्यांना ,सामाजिक कार्यकर्त्यांना संघटना ,संस्था ,यांना आमची आठवण येते खर तर आज ९०टक्के आदिवासी समाजाला आदिवासी दिन काय आहे हेच माहित नाही, आणि जे हा दिन साजरा करतात त्यांचे खिसे भरलेत ,नोकरी आहे सर्व काही व्यवस्थित चालू आहे फक्त आत्ता प्रसिद्धी कसी मिळेल आणि आपल्या पाठीशी भाऊ, दादा ,साहेब ,आन्ना  , तात्यां यांची शाबासकी कसी मिळेल , आपण साहेबांच्या कसे जवळ जाऊ हाच विचार करतात. आदिवासी आदिवासी म्हणून पूर्ण आदिवासी समाज्याला तमाश्या करून ठेवलाय "आदीवासी दिन "साजरा करून शक्ती प्रदर्शन करणे हाच उद्देश असेल तर त्याच फलित काय ? आदिवासी सामाज्यला न्याय मिळेल का ? कि फक्त दिवसी दिन आदिवासी दिन म्हणत आदिवासींच्या टाळूवरच लोणो खात बसायचं
आदिवासींसाठी काम करणाऱ्या अनेक आदिवासी संस्था ,संघटना ,सामाजिक कार्यकर्ते ,नेते पुढारी झालेत प्रत्येक गावात ५/१० आदिवासी पुढारी ,२/५ संघटना ,आणि गटारीत पडलेल्या दुकरांसारखे कार्यकर्ते व त्यांची पिल्लावळ; आहे हा सर्व प्रकार पहिला कि अस वाटत आत्ता आदिवासी सामाजिक प्रश्न संपले मात्र् एकमेकांचे पाय खेचण्याच्या नादात मूळ उद्देश बाजूला राहतोय. महाराष्ट्रात  आदिवासींच्या ४५ जमाती आहेत  प्रत्येक जमातीत १०/१५ संघटना आहेत प्रत्येकाचे स्वतंत्र गट आहेत , प्रत्येक गटाचा एक स्वतंत्र नेता आहे , या येत्यांनी प्रत्येक शहरात  कट्टर कार्यकर्तारूपी पाळलेला एक कार्यकुत्रा आहे .हेच कार्यकुत्रे  सामाज्यासाठी लहान मोठ्ठे आंदोलन करतात आणि प्रतेक आंदोलनात वापरल्या जाणार्या फलकांवर यांच्या नेत्यांचे फोटो असतात मग जर हे सामाजिक आंदोलन आहे समाज्याच्या हितासाठी आहे तर प्रत्येकवेळी नेत्यांची प्रसिद्धी का याचा मात्र उलगडा अध्याप झालेला नाही .  नेत्यांना समोर ठेऊन आंदोलने करून  स्वताला सामाज्याचे तारणहार समजणार्या कार्यकर्त्यांनी जरा ग्रामीण भागात जाऊन समाजाची परिस्थिती पाहिलीय का ?आम्ही आहोत म्हणून हा समाज आहे असा पोकळ विचार करणाऱ्यांची अवस्था  …. बैलगाडी खालून चालणार्या कुत्रा जसा मीच गाडी ओढतोय असा आव आणतो त्या कुत्र्यासारखी झालीय  आदिवासी समाजासाठी काम करणार्या जास्तीत जास्त संघटना ह्या नेत्यांनीच उभ्या केल्या आहेत शिवाय अश्या संघटना नेत्यांच्या उदो उदो शिवाय अधिक काही करतांना दिसत नाहीत . अश्या संघटना समाजाचे प्रश्न घेऊन  सत्तेच्या खुर्चीला साहेबांचे पाय चाटत बसल्यात मग आदिवासी माणसाने करायचे काय …… आदिवासी दिनाची तयारी जोरात सुरु आहे …. श्रेय लाटण्यावरून हमरीतुमरी सुरु आहे शहरात आदिवासी दिनाची तयारी जोरात झालीय तर अगदी नाशिक च्या जवळ १२/१५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी गावांना “ आदिवासी दिन” काय असतो याची साधी कल्पनाही नाही मग अश्या आदिवासी दिनामधून समाज्याला काय मिळणार.  आदिवासी दिनाला अगदी शेवटच्या पाड्यातील आदिवासी माणसाचा सहभाग असेल का आदिवासी दिन आहे म्हणून आम्ही तो साजरा करायला शहराच्या दिशेने येणार असेल तर ग्रामीण आदिवासींचा यात सहभाग काय ?
९ तारखेला जागतिक आदिवासी दिन साजरा होतो आदिवासींच्या एकजुटीला अश्या दिवसांची नितांत गरज आहेच मात्र यात ग्रामीण आदिवासींचा जो पर्यंत सहभाग येत नाही किंवा शहरात साजरे होणारे असे आदिवासी उत्सव ग्रामीण आदिवासींपर्यंत पोहचत नाहीत तो पर्यंत त्याला अर्थ उरत नाही .  शहरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रम पाहिला कि हा आदिवासी दिन नसून एकमेकांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे असेच असेच वाटते . आज खेड्यांवर कुपोषण वाढत असतांना आदिवासी दिनाला स्वताचा सत्कार करून घेणाऱ्या आणि नेत्यांचा  सत्कार करणाऱ्या आदिवासी समाजसेवकांनी जर अतिदुर्गम भागातील पाड्यात जाऊन श्रमदानातून एखाद्या गरीबाची झोपडी उभी करा मग स्वताला आदिवासी सामाज्याचे तारणहार समजा । रात्रंदिवस आपल्या शेतात चीखलापाण्यात काम करणाऱ्या आदिवासी माणसांची किंमत तुम्हाला शहरात राहून "आम्ही आदिवासींसाठी काहीही करू "अस म्हणून कळेल का …. खूप दूर न जात नाशिक जावा ५५ किमी असलेल्या ठाणापाडा परिसरातील आदिवासी माणूस कसा जगतोय हे अभ्यासा मग छाती मोठ्ठी करा ….
भूक, बेकारी , भ्रष्ट्राचार , अन्याय , अत्याचार या पंचाम्हाभूतानी आमची पारंपारिक आदिवासी जगणे नष्ट केलेय आधुनिकीकरणाच्या , विकासाच्या  नावाखाली आमच्या जमिनी लुटल्या जात आहेत . महाराष्ट्रातील आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाचे बजट ५००० कोटी आहे आणि महाराष्ट्रातील आदिवासींची लोकसंख्या १ कोटी ३० लाखाच्या आसपास शिवाय यातील १५ % लोक नोकरी ,व्यवसाय , उद्योग आणि श्रीमंतीच्या जवळ आहेत . सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून गब्बर झालेत  मात्र आजही ८५ % आदिवासी समाज आदिवासी विकासाच्या योजनांपासून कोसो दूर आहे , शिवाय आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या विकासासाठी २० कोंबडया , १० बकऱ्या , २ म्हशी , अश्या फालतू योजना राबवत आहे कि ज्यातून आदिवासी माणूस जगणार देखील नाही आणि मरणारही नाही . आदिवासींच्या वाट्याला २० कोंबडया आणि बिगर आदिवासी भागाच्या विकासासाठी आदिवासिंच्या विकासाचा करोडो रुपये निधी खर्च केला जातो . प्रतेक आदिवासी दिनाला आदिवासी विभागामार्फत एक दिवसासाठी  १५ ते २० लाख रुपये खर्च केला जातो , मात्र त्याचं फलित काय .  देशभरात ५३० इतकी आदिवासी आमदारांची संख्या आहे हे स्वतंत्र पक्ष काढू शकतात किव्हा स्वतंत्र विचारमंच स्थापन करू शकतात पण गुलामगिरीचं आणि लाचारीचं  जगणे आमच्या पुढारी, आमदार ,खासदार , नेते यांच्या वाट्याला आल्याने आदिवासी समाज आजही आहे तिथेच आहे .,… आमच्या नेत्यांच्या पुढार्यांच्या पोटाचा लोंबकळत असणारा घेर पाहिला कि सरकारला वाटते आदिवासींची स्थिती सुधारली ,
 आदिवासी दिनाला जंगलामध्ये राहणारा ,कुपोषणाने पिडीत झालेला ,आरोग्य सुविधा नसलेला ,वीज, पाणी ,अश्या कोणत्याच सुविधा नसलेला आदिवासी माणूस येईल का ? किंवा अश्या ग्रामीण  गरिबीत खितपत पडलेल्या आदिवासी माणसाला या झागामागाटाचा काय उपयोग होणार . आदिवासी माणसांच्या नावचं  भांडवल करून आमचे स्वयंघोषित पुढारी ,तारणहार ,यांचा एकाच उद्देश आहे व्यासपीठावर बड्या नेत्यांना  बसवायचं सत्कार करायचा …. सत्कार करून घ्यायचा …. आणि आमची संस्था , संघटना , साहेबांसाठी काहीहि करू शकते व आमची पावर काय आहे हे दाखून द्यायचं …. कार्यक्रम संपला कि “ आम्ही मोठा कार्यक्रम साजरा केला ” म्हणून छाती ठोकून लाल करायची . रोज भूक ,बेकारी ,कुपोषण , यांचे बळी ठरलेल्या आदिवासी समाज्याला या दिनाचा काय उपयोग होईल राजकारण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था , संघटना ह्या फक्त साहेबांच्या जवळ जाण्यासाठी आदिवासी आदिवासी जप करतील आणि स्वार्थासाठी आदिवासी माणसाचा विश्वास साहेबांना मतदानासाठी विकतील …. नेते मंडळी या माणसांचा वापर तिकीट मिळवण्यासाठी करतील आणि असे कितीही आदिवासी दिन साजरे झाले तरी आदिवासी दिनामधून या आदिवासी समाज्याला मिळणार काही नाही ….सत्कार होतील सत्कार करून घेतले जातील जो तो आपली पावर दाखून देईल मात्र  तरीही  आदिवासी समाजाला  ….  " दीनातून " मुक्त होण्यासाठी स्वताच लाडावं  लागेल नाहीतर हे पांढरपेशी आपली गरिबी पण विकतील

 

विजयकुमार घोटे ( मुक्त पत्रकार )

आदिवासी समाजातील अभ्यासक , आदिवासी सामाजिक कार्यकर्ता ,

मो .न. ९६२३७०१७०९ 



pravin pawara

unread,
Aug 7, 2015, 10:54:02 AM8/7/15
to adi...@googlegroups.com
Manatale Bolala sir tumi................................................
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+u...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvkDXuk5yAMht11nHjZzaR61O2TP%3DFjLYT2Cg7KMRMgtg%40mail.gmail.com.
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>
Reply all
Reply to author
Forward
0 new messages