आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षक भरती आता परीक्षा न घेता मेरिटच्या (गुणवत्ता) आधारावर केली जाईल.
संग्रहित छायाचित्र मुंबई – आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षक भरती आता परीक्षा न घेता मेरिटच्या (गुणवत्ता) आधारावर केली जाईल. आदिवासी भागातील बोलीभाषा अवगत असलेल्यांना त्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले.
आदिवासी विकास विभागाच्या विविध विभागांत महिला वॉर्डन व गृहपाल यांच्या रिक्त असलेल्या पदांबद्दल नितीन भोसले व पंकज भुजबळ यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
आदिवासी विकास विभागाच्या चारही विभागांत गृहपालांची ५२२ पदे मंजूर असून त्यापैकी १७३ पदे रिक्त आहेत. आदिवासी आश्रमशाळांत महिला वॉर्डन व गृहपाल नेमण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पिचड यांनी या वेळी सांगितले