|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : मार्च २०१६ ||
आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे. आदिवासी जीवनमूल्य आणि पारंपरिक ज्ञान यांच्याकडे जग आदर्श मार्ग म्हणून बघत असताना आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजात या विषयी जागरुकता महत्वाची आहे.
आणि त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक आणि सकारात्मक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रयत्न करूया.
आपल्या माहिती साठी
1) संपत ठाणकर गुरुजी यांचा एक आदर्श उपक्रम, आदिवासी समाजात असलेले नैसर्गिक सहकार्याची भावना अधिक मजबूत करण्या करिता त्यांनी जितगाव येथे आदिवासी महिला बँक स्थापन केली आहे सध्या गावातील ४४ महिला सदस्य आहेत. IIT मुंबई येथील १० विद्यार्थी सोबत त्यांना भेट देवून बचत आणि बचतीचे महत्व या विषयावर १३ रोजी गावातील माणसांसाठी कार्यशाळा घेणार आहेत.
2) दिल्ली येथील महाविद्यालयातील शिप्रा आणि ४ विद्यार्थिनी २८/२/२०१६ रोजी आदिवासी परंपरा, कला आणि संस्कृती चा अभ्यास करण्या करिता आल्या होत्या. त्यांनी वाघाडी येथे दर्शना, अंकिता यांनी मार्गदर्शन केले. गंजाड येथे जपान येथील संस्थेचा चालू असलेल्या वाल आर्ट फेस्टिवल ला भेट देवून प्रमुख अनिल वांगड यांना भेट दिली. आणि आदिवासी संस्कृती अभ्यासक संपत ठणकर गुरुजी यांच्या कडून आदिवासी परंपरा आणि संस्कृती या बद्दल जाणून घेतले.
3) फ्याशन दिझायीन कोलेज पुणे येथून स्वाती आणि १ विद्यार्थी आदिवासी कला (वारली चित्रकला) आणि त्याचे मोटीव जाणून घेण्य साठी ९/०३/२०१६ रोजी येत आहेत.
4) कल्याण येथून निवृत्त अधिकारी आदिवासी संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्य साठी खंबाळे येथे भेट दिली, संजय पऱ्हाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले
5) हैदराबाद येथील आर्किटेक्चर कोलेज मधून मृणाली वारली चित्रकला आणि संस्कृती आणि पारंपारिक बांधकाम ज्ञान जाणून घेण्य साठी डहाणू (वाघाडी, घोळ, खंबाळे) येथे ३ दिवस भेट देणार आहेत . त्या नंतर तेजगढ येथील भाषा अक्याडमी ला भेट देणार आहेत. त्यांना डॉ सुनील पऱ्हाड, अभिजित पिलेना, संदीप भोइर, संपत ठाणकर मार्गदर्शन करतील
6) रुयीया एग्रो फार्म दुर्वेश येथे नवीन बांधकाम केलेल्या इमारतीच्या आवारात वारली चित्रकला काढण्या करिता शर्मिला घाटाळ आणि सहकारी यांनी परिसराची पाहणी केली, या आठवड्यात काम चालू होईल
7) आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रदर्शनात सहभागी झालेले बापुगाव येथील कलाकार रमेश हेंगाडी वारली चित्र प्रदर्शना साठी इंग्लंड ला जात आहेत. (ठिकाण आणि तारीख लवकरच कळवले जायील) तेथील वाचकांनी प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी
8) वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी संजय पऱ्हाड यांच्या वस्तूंचे छायाचित्रीकरण वाघाडी येथे करण्यात आले. ज्या कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे.
9) आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.
10) आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249).आता आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together!
# आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता
आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. हेच आयुश आहे.
Lets do it together!
AYUSHonline team
Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!
Aim of our Initiative through Warli Painting
Mati : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
Pani : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology
Chavul : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation