|| वारली चित्रकला उपक्रम – बातमी : २९ नोव्हेंबर २०१५ ||
सध्या आदिवासी समाज अतिशय नाजूक वळणावरून जातो आहे. एकी कडे आपली नैसर्गिक साधन संपत्ती हळू हळू आपल्या हातून निसटते आहे, आदिवासी समाजाची असेलेली स्वायत्ता आणि आपली स्वावलंबन टिकविण्या साठी आदिवासी / बिगर आदिवासी / नेतृत्व/शासन इत्यादी मध्ये आदिवासी परंपरा विषयी जागरूकता होणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने आदिवासी अस्मिता, आपले पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक ओळख जतन करण्या सोबत व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घेवून समाजात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आदिवासींनी पुढाकार घेण्यासाठी विविध उपक्रम द्वारे जागरूकता करतो आहोत.
आपले पारंपारिक ज्ञान जतन करून समाजात रोजगार निर्मिती साठी काही केलेले प्रयत्न आपल्या माहिती साठी
१) चित्र फ्रेम बनवणे : आरा फ्रेम तर्फे मशीन सेटअप, व प्रत्याक्षिक याचे प्रशिक्षण वाघाडी येथे ४ सभासदांनी पूर्ण केले. लवकरच नवीन कलाकृती निर्मिती चालू केली जाणार आहे. (10 Nov 2015)
२) ठाणे रेल्वे स्थानक नुतनीकरण प्रकल्प : स्थाकानात पुलावर वारली चित्रकला काढणे या साठी रोटरी क्लब सोबत संजय पऱ्हाड यांनी पाहणी केलिय. बोलणे चालू आहे. (27 Nov 2015)
३) आदिवासी पर्यटन : स्वित्झरलंड येथून हरीनी या आपल्या परिवारासोबत ५ दिवसासाठी आदिवासी संस्कृती आणि कला यांचा अनुभव घेण्य साठी येत आहेत. त्यांना संदीप भोइर, संचिता सातवी हे मार्गदर्शन करणार आहेत. (2 Dec to 7 Dec 2015)
४) आदि कला : या उप्रकम द्वारे कलेची आवड असणाऱ्या कलाकार, विद्यार्थी, युवा, महिला,बेरोजगार यांना आपली कलाकृती जगभरात पोचवून आर्थिक
उन्नती साठी हातभार लावण्या साठी नोंदणीची सुरवात केली आहे, सगळ्यांना आवाहन करण्यात येते कि आपल्या कलाकारांना या उपक्रमात जोडावे. कलाकारांचे नाव , गाव, कलेचे नाव sms करा 0 9246 361 249
५) आपले हक्काचे संकेत स्थळ : आदिवासी कलाकृती आणि तयार केलेली विविध साधन सामग्री विक्री साठी स्वतः आदिवासींचे संकेत स्थळ लवकरच सुरु होते आहे (
www.warlikala.com) – Under Updation
६) मोठा विक्री संस्था : आदिवासी कलाकृती आणि तयार केलेली विविध साधन सामग्री विक्री साठी विविध संस्था सोबत करार करण्यात आले आहेत , आणि चर्चा चालू आहेत. त्यात इंडिया कला, आर्ट बाजार, फ्लिपकार्ट, अमेझोन, नाप तोल, पेटीएम, क्राफ्ट्सविला, स्टिफ कॉलर, आस्क मी , इत्यादी . अजून आणखीन काही जोडत आहेत
७) केरळ यथील एका मोठ्या हॉटेल च्या नुतनीकरण करून पूर्ण परिसरात वारली चित्रकला काढण्या साठी बोलणे चालू आहे. (अंदाजे १० कलाकार १ महिना काम करतील). तसेच अलिबाग येथील एका मोठ्या फार्म हाउस वर भिंतीवर चित्रकला या साठी मुंबईतील एका कंपनी सोबत बोलणे चालू आहे (अंदाजे ५ कलाकार एक आठवडा काम करतील).
८) आगामी "राष्ट्रीय आदिवासी उत्सवा" मध्ये सहभागी : अंतराष्ट्रीय क्षेत्रात नामवंत व वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल पुरस्कार प्राप्त वारली चित्रकार अनिल वांगड, आदिवासी संस्कृती आणि परंपरा याचा अभ्यास आणि लिखाण करून अनेक पुस्तके प्रकाशित केलेलं संपत ठाणकर, जर्मन मध्ये पुस्तक प्रसिध्द केलेले आदिवासी छायाचित्रकार/चित्रकार/अभ्यासक मधुकर वाडू, यांना दिल्ली येथे आयोजित १२ ते १७ फेब रोजी "नेशनल ट्रायबल फेस्टिवल“ मध्ये जाण्या आमंत्रणं व कार्यालयीन प्रक्रिया एकात्मिक आदिवासी विकास विभाग या तर्फे चालू करण्यात आली आहे .
९) वारली चित्रकला भौगोलिक उपदर्शन : हे पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक बौद्धिक संपदा जतन व्हावी या साठी आपण या कलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शन म्हणून नोंद केली आहे, त्या बद्दल जागरुकते साठी लवकरच आपण एक कार्यक्रम घेण्याचे ठरवितो आहोत. अधिक माहिती कळविण्यात येयील
१०) इंडिया कला तर्फे विविध कलाकृती ची छायाचित्रण साठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात आदिवासी कलाकारांना स्वतः छायाचित्रण करून त्यांची कलाकृती संकेत स्थळावर देता या साठी प्रयत्न करणार आहोत.
११) आर्ट बाजार चे संचालक आणि कलाकार यांच्या सोबत वाघाडी आणि गंजाड येथे बैठक पार पडली त्यात आर्त बाजार ची कार्यप्रणाली आणि आदिवासी चित्रकारांसाठी संधी यावर अधिक विस्तृतपणे चर्चा झाली. (11Nov 2015)
गेली ९ वर्षे आयुश ग्रुप तर्फे आपण विविध पद्धतीने प्रयत्न करतो आहोत, पण असेच प्रयत्न प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक गाव गावात व्हावे या साठी प्रयत्न करूयात. समाजा साठी निस्वार्थ आणि सामाजिक भावनेतून आपले ज्ञान/कौशल्य उपयोगात आणत आणूया. (उदाहरण घेवून आपण आपल्या परीने आपल्या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवावेत या साठी प्रसारित ) let's do it together!
आयुश । आदिवासी युवा शक्ती