।। आयुश उपक्रम माहिती : १२ ऑकटो २०१८।।

6 visualizzazioni
Passa al primo messaggio da leggere

AYUSH | Adivasi Yuva Shakti

da leggere,
14 ott 2018, 01:15:2614/10/18
a AYUSH group
।। आयुश उपक्रम माहिती : १२ ऑकटो २०१८।।

आदिवासी कलाकृती, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यातून आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन हेतू प्रयत्न सुरु आहेत. (स्थानिक पातळीवर रोजगार). 

आपल्या माहितीसाठी, वारली चित्रकला क्लस्टर विकास उपक्रम संदर्भात उच्चस्तरीय अधिकारी भेट दौरा संपन्न. 

*१) फिल्ड व्हिजिट* ५/१०/२०१८
क्वेस्ट (Quality Evaluation for Sustainable Transformation centre) कार्यकारी संचालक किशोरी गद्रे, बांबू बोर्ड चे सल्लागार विवेक नागभीरे, MTDC आंतराष्ट्रीय रेलशन ऑफिसर मानसी कोठारे, आदिवासी विकास विभाग मंत्रालयाचे कन्सल्टन्टआणि CMF, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू  चे विस्तार अधिकारी, सोबत आर्किटेक्चर, इंजिनिअर, आणि इको फ्रेंडली विषयावर चे तज्ञ असे एकूण १२ जण सहभागी झाले होते.  

वेती, सूर्या नदी (भीम बांध), एना, साखरे, खंबाळे, रायतली, गंगानगाव असा दौरा करण्यात आला. ठरलेल्या ठिकाणी तेथे एकत्र आलेल्या कलाकाकारांशी संवाद आणि कलाकृती निरीक्षण केले. या दौऱ्यात सचिन दा सातवी आणि डॉ सुनिल दा पऱ्हाड यांनी मार्गदर्शन केले. 

 *२) आयुश कोर टीम बैठक* ६/१०/२०१८ 
आदिवासी विकास विभाग चे उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू/जव्हार चे प्रकल्प अधिकारी कुंभार आणि त्यांचे सहायक, फिल्ड व्हिजिट चे १२ अधिकारी, आयुश ची कोर टीम, कलाकार, गट प्रतिनिधी सहभागी झाले होते. आयुश तर्फे प्रस्थावित वारली चित्रकला क्लस्टर विकास उपक्रम विषयी सचिन सातवी यांनी प्रेझेन्टेशन दिले. उच्च स्थरीय अधिकाऱ्यांनी काही गोष्टी सुचवल्या आणि त्यांचे मत मांडले. बैठक बिरसा मुंडा ग्राम पंचायत सभागृह कासा येथे पार पडली 

*३) कलाकार सवांद बैठक*  ६/१०/२०१८ 
उपस्तित कलाकारांसोबत उपक्रमविषयी माहिती आणि संबंधित विषयावर चर्चा झाली. अनेक अनुभव, आव्हाने, पुढील एक्टिविटी यावर पुढील दिशा ठरविण्यात आली. कोर टीम मीटिंग नंतर बिरसा मुंडा ग्राम पंचायत सभागृह कासा येथे पार पडली 

*४) फॉलोवॊ अप बैठक* ११/१०/२०१८
मुंबई येथे क्वेस्ट (Quality Evaluation for Sustainable Transformation centre) कार्यालयात फॉलोवॊ अप बैठकीत चेतन दा गुराडा, डॉ सुनिल दा पऱ्हाड, आणि संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. 

आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू, पर्यायी व्यवस्था मजबुतीकरणा चा प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक *उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे*. 

जल जंगल जमीन जीव सोबत आपली स्वायत्त आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत करूया.

*आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया*. 
Lets do it together!
जोहार ! 

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 0 9246 361 249



Rispondi a tutti
Rispondi all'autore
Inoltra
0 nuovi messaggi