तलासरीत रस्त्याला भेगा

1 view
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 4, 2013, 1:43:34 PM8/4/13
to AYUSH google group


नरेंद्र पाटील, पालघर 

ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील एका पाड्याजवळील रस्त्याकडेला मोठ्या भेगा पडल्याचे आढळून आल्याने स्थानिक आदिवासींमध्ये घबराट पसरली आहे. या भेगा नेमक्या कशामुळे पडल्या आहेत हे अभ्यासण्यासाठी भूगर्भ तज्ज्ञांना पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

तलासरीतील वसा या गावातील एका पाडयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत डोंगराळ भागातील जमिनीला ६० फूट लांब आणि अडीच फूट खोल अशा भेगा गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या प्रचंड पावसामुळे जमीन खचली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पाड्यात दोन-तीनच घरे आहेत, तसेच मुख्य रस्त्यापासून आठशे मीटर आत या भेगा पडल्याने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे तलासरीचे तहसीलदार गणेश सांगळे यांनी सांगितले.


Reply all
Reply to author
Forward
0 new messages