| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जानेवारी २०१८ |

5 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 3, 2018, 2:24:53 AM2/3/18
to AYUSH google group
*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जानेवारी २०१८ ||*

जोहार !

आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि गेल्या हजारो वर्षा पासून जगभरातील आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया !

हा एक प्रयोग आहे, आपण पण आपल्या परिसरात याहून अधिक उत्तम उपक्रम सुरु करावेत किंवा अशे उपक्रम प्रभावी करण्याकरिता हातभार लावूया. *आपल्या उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हि प्रामाणिक इच्छा!*

या महिन्यातील काही घडामोडी आपल्या माहिती साठी उदाहरण म्हणून,

[अदिकला]

१) *मुंबई त काळाघोडा आर्ट फेस्टिवल* : (३ ते ११ फेब्रुवारी)
पालघर जिल्ह्यातील विविध कलाकारांनी बनवलेल्या कलाकृती एकत्रित करून एक स्टॉल आदिवासी विकास विभाग तर्फे देण्यात आला आहे. आदिवासी कलाकारांना प्रत्येक्ष स्टॉल वर आपल्या कलाकृती विक्रीस ठेवण्याची संधी मिळावी आहे. या मुळे मार्केट आणि कलाकार या मध्ये निर्माण होणारे मध्यस्त यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा कलाकारांना योग्य मोबदला मिळण्यास हातभार लागेल. 
२ तारखेला संध्याकाळी नियोजित स्थळी संजय दा पऱ्हाड, कल्पेश दा गोवारी डहाणू येथून पोचलेत. बबलू दा वाहुत यांनी त्वरित मार्केटिंग मटेरियल पुरवण्यात सहकार्य केले. या प्रदर्शनात आळी पाळीने कलाकार सहभागी होणार आहेत. 
 
२) *एक दिवशीय कार्यशाळा* (NGO पोर्टल) : (३ फेब्रुवारी)
One Day Seminar/Workshop on DC (Handicrafts) NGO Portal is being organized by National Centre for
Design and Product Development (NCDPD) at following venues for all Regions
मुंबई येथील टेक्सटाईल कमिटी च्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत कल्पेश दा गोवारी सहभागी होत आहेत. त्या नंतर कार्यशाळेत झालेल्या विषयावर सगळ्या कलाकारांना ते मार्गदर्शन करतील. 
 
३) *दिल्ली येथे हँडीक्राफ्टस प्रदर्शन*: (१ ते २८ फेब्रुवारी)
प्रगती मैदान येथील प्रादर्शनात विजय दा वाडु सहभागी झालेले आहेत. दिल्ली जवळील वाचकांनी जरूर भेट द्यावी 
 
४) *विशेष प्रदर्शन* : (१८ ते २१ फेब्रुवारी)
मुंबईत एका विशेष प्रदर्शनात संजय दा पऱ्हाड सहभागी होत आहेत. यात पारंपरिक पद्धतीने बनविलेली कलाकृती ठेवण्यात येणार आहे त्यासाठी दादांनी डिंक, शेण, माती आणि इत्तर लागणारे साहित्य नैसर्गिकरित्या बनविले आहे (सध्या अशा कलाकृती बनवण्याचे प्रमाण नगण्य आहे). या प्रदर्शनात विशेष आमंत्रित सहभागी होणार आहेत. 
 
५) *आगामी उपक्रम* -
आर्थिक सशक्तीकरण या साठी एक नवीन उप्रकम चालू करतो आहोत.
ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर चित्र काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, गवताच्या शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक १० जणांचे गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी.   (सध्या कासा, गंजाड रायतली, वणगाव, बोईसर, पालघर या परिसरात  गट बांधणी झाली आहे लवकरच उपक्रम सुरु करण्यात येतील)

६) *सहकार्य आणि सहभाग*:
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. ओन लायीन : मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, नवीन आयडिया देणे, जाहिरात करणे

क्रिएटिव्हिटी : कल्पक सूचना, माहिती, प्रकल्पासाठी 
तांत्रिक सहकार्य : चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर करणे
उपक्रम सहभाग व दायित्व : प्रत्येक्ष मार्गदर्शन, उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे, उपक्रमाचे नेतृत्व करणे, 
ग्रामीण संपर्क : नवीन कलाकारांना जोडणे, युवाना मार्गदर्शन, ग्रामीण संपर्क वाढवणे,
आर्थिक साहाय्य : वर्गणी देवून सभासद होणे, वार्षिक/मासिक स्वरुपात आयुश संचय निधी मध्ये संकलन करणे, आर्थिक सहकार्य कारानार्यासोबत संपर्क करून देणे

अधिक माहिती साठी काही लिंक्स -
* या उपक्रमाच्या अपडेट्स - https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli
* उपक्रमात सहभागी होण्या करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in) नोंदणी करावी

Towards constructive tribal empowerment, Lets do it together!
आयुश । आदिवासी युवा शक्ती 
संपर्क : ०९२४६ ३६१ २४९, ay...@adiyuva.in

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!
Aim of  this Initiative through Warli Painting

*माती* : Land – 
Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

*पानी* : Water – 
Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology

*चावूल* : Rice – 
Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

AYUSH main

unread,
Feb 4, 2018, 8:29:21 AM2/4/18
to adi...@googlegroups.com

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtckSrvn6mRcA9T1sGxZ0pU%2B2H3t1yyvWhE83pL4Rc2PA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages