एकच उत्तर म्हणजे आदिवासी संस्कृती होय हे सांगू या!

10 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 25, 2015, 9:04:04 AM8/25/15
to AYUSH google group
आदिवासी संस्कृती आज पर्यन्त आपण जगत आणि जपत आलो आहोत. आता वेळ आली आहे लोकांना त्याची जाणिव करून देण्याची. 

आपला फक्त फोटोपुरता आणि गरीब उदाहरण मांडन्यासाठी लोकांनी वापर केलाय. चला आपण लोकांना सर्व दुखांवर एकच उत्तर म्हणजे आदिवासी संस्कृती होय हे सांगू या.

आज पर्यंत लाजरा बजरा आदिवासी पाहिला आहे....चला लोकांना बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, झलकारी बाई, तंट्या मामा आदि आदिवासी क्रांतिकारक दाखवू या.

आज पर्यन्त इतर लोकं आपल्याला म्हणत की तुम्ही आदिवासी आहात...चला आपण जगाला छाती ठोकून सांगू या, होय आम्ही आदिवासी आहोत.

आजपर्यंत लोकांनी आरक्षणातील आदिवासी पाहिला आहे. चला आपण जगाला रक्षणातील आदिवासी लढ़वय्ये दाखवू या.

कार्यक्रमात आदिवासी नृत्य करणारे आदिवासी पाहिले...चला त्यांना आदिवासी सणान्तिल आदिवासी नृत्य दाखवू या.

आज पर्यंत लोकांनी जंगलातील आदिवासी म्हणून आपल्या कड़े पाहिले आहे. चला आपण इतिहासातील आदिवासींचा क्रांतिकारी लढा सांगू या.

योजनांच्या नावावर कुपोषणातील बातम्यांत आदिवासी मुले मीडियात झळकली...चला मिड़ीयाला आदिवासी Talent मधील किसन तडवी, कविता राऊत, अंजना ठमके, योगेश भरसट, सचिन सातवी हे चमकते सितारे दाखवू या.

कोंडवाड्यागत आश्रमशाळा लोकांनी पाहिल्या...चला लोकांना निसर्गातील उपजत गुणसंपन्न एकलव्याचे वारस दाखवू.

आदिवासी बोलू लागला असे म्हणून चालणार नाही. आदिवासींनी लोकांना हे पटवून सांगण्याची गरज आहे. लोकांनी खोटा इतिहास रेटून सांगितला. आपणास फक्त खरा इतिहास समोर मांडायचा आहे. 
आपण जोपर्यन्त लोकांना आपल्यातील चांगल्या गोष्टी सांगत नाहित, तोपर्यंत लोकांच्या डोळ्यावरील पट्टी निघणार नाही.

-आदिवासी स्पंदनं 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages