।। काळाघोडा : *आदिवासी ३D आर्ट* ।।
_काळाघोडा आर्ट फेस्टिवल येथे *आदिवासी वार्षिक कालचक्र* या थीम वर ३D आर्ट आकर्षणाचे केंद्र बनत आहे. नक्की भेट देऊन बघावे. काही कारणाने बघता आले नसल्यास या लिंक वर फोटो बघावेत._ [लिंक https://www.facebook.com/media/set/?set=a.2481530805250327&type=1&l=4223029fa4]
*थोडक्यात माहिती* -
आदिवासी समाज हजारो वर्षांपासून जल जंगल जमीन या मूलभूत वास्तविक घटकांसोबत जगत आला आहे, सामाजिक जीवनात हि नाळ अजूनही जोडलेली दिसते. त्याचा प्रभाव परंपरा, चालीरीती, संस्कृती, इतिहास, जीवनमूल्य, जडण घडण, दैनंदिन व्यवहार यावर आहे.
दैनंदिन जगण्यात वास्तविक घडामोडींच्या आधारे तो निसर्ग चक्र, काळ, ऋतू, हवामानात होणारे बदल यांचा अचूक वेध बांधत असतो. मग मानवी किंवा कोणत्याही जैव, आरोग्य, औषोधोपचार, सजीव-निर्जीव, वन्यप्राणी, नदी, नाले, ओढे, वृक्ष, सूर्य, चंद्र, आकाश, वारा या अश्या सर्व घटकांचा थेट संपर्क आणि सहवास असल्याने आदिवासी समाज यांच्या वार्षिक कालचक्रात आपले जीवन जगत आला आहे
_आदिवासी समाजात प्रचंड पारंपरिक ज्ञान आहे, जे मौखिक साहित्यातून जतन केले आहे अनेक पिढ्यांनी प्रत्येक्ष अनुभवून, प्रयोग करून, प्रात्यक्षिक करून विविध गोष्टीं विकसित केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे लिखित दिनदर्शिका किंवा घड्याळ तंत्र नसतानाही काळवेळ ठरविण्याची कला विकसित केली आहे. लोक बोलतात आदिवासी समाज ना अस्थिक, ना नास्तिक तो वास्तविक जीवन जगणे पसंत करतो. या समाजाच्या देवी देवता या समाजाच्या देवी देवता, पूजा अर्चना या सर्व गोष्टी ह्या वास्तविक निसर्गाशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ हिरवा देव, कनसरी, हिमाय देवी, वाघ्या देव, नाराणदेव, झोटिंग देव, सावरा देव, गावदेव, इत्यादी ज्या निसर्गाशी जोडलेल्या आहेत._
साध्या भाषेत बोलायचे झाल्यास आदिवासी समाज निसर्गाची पूजा करतो. म्हणून हा समाज वास्तविक जीवन जगात असताना निसर्गा सोबत नाते जपून ठेवून आहे, म्हणून कदाचीत या समाजाला "निसर्ग पूजक समाज" असेही म्हटले जाते.
*कालचक्र* :
कालचक्र संदर्भात विविध कला कौशल्य अनुभवायास मिळते. दिवसा सावली बघून वेळ सांगणे. झाडे, पशु पक्षी. किड्या मुंग्यांच्या हालचालीवरून किती, केव्हा, पाऊस पडणार, थांबणार याचा अंदाज. चंद्र, सूर्य दिशा आकार त्याचा हवामान वातावरणावर होणारा परिणाम. सजीव-निर्जीव घटकांवर होणारा परिणाम बदल व अचूक वेध घेण्याची कला आदिवासी समाजात बघायला मिळते.
*भाग एक* -
जंगल जिथे आदिवासी समाजाचा थेट संबंध पशु, झाडे, वेलींशी येतो. जंगलात होणाऱ्या घडामोडी, हालचाली संकेतांच्या प्रतीक आहेत. आदिवासी जीवनात जंगलाचे अमूल्य स्थान आहे. जशे शहरात इंटरनेट/मोबाईल शिवाय जगणे कल्पना करणे कठीण आहे तसे आदिवासी समाजाचं जीवन च जंगल आहे. म्हणून आदिवासी समाज अनेक पिढयांपासून जल जंगल जमीनी साठी आग्रही भूमिका घेत आला आहे याला इतिहास साक्षी आहे.
कालचक्र मध्ये मुख्य आदिवासी वारली कले मध्ये दर्शविलेले मुख्य पावसाळी अनुभव
१) चार महिने कालावधी मध्ये पावसाची पडण्याची मात्रा, कमी जास्त, चांगलं वाईट ची लक्षणे ठरविण्यासाठी ठराविक वृक्ष वनस्पती मधील होणारे ठराविक कालावधी मध्ये बदल होतात.
उदा. पळस, गुलमोहर, ई वृक्ष
२) पाऊस कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी पडेल याचा अभ्यास हा प्राणी-पक्षी, कीड मुंग्यांच्या गतिविधी हालचाली यांच्या अभ्यासावरून सांगण्याची कला
उदा. चहिय पक्षी, मुंग्यांमधील शारीरिक व हालचालीत बदल इ
३) पाऊस ठराविक कालावधी नंतर कधी आणि कोणत्या दिवसानंतर थांबेल हे मुंग्या, पोटाऱ्या पक्षी, भोरडा पक्षी चे अंडी पिल्लू घरट्यातच सोडून जाणे, खेकड्याच्या ठराविक आवाज, यांच्या आवाज आणि हालचालीतील बदलावर ठरवण्याची कला
*भाग दोन*
पावसाळ्यात लागवड करण्याची पद्धती निसर्ग चक्र व समाजातील उत्सव बघायला मिळतात. पेरणी, खणणी, आवणी, कापणी, झोडणी, असा चक्र नंतर समाजात उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा जातो. असाच उत्साह हा तारपा नाच या सामूहिक नृत्यातून एकत्र येऊन साजरा केला जातो. तारपा हे वाद्य निसर्गातील ठराविक घटकांपासून तयार केले जाते. परंतु हे वाद्य खूप परिश्रमांनी, कौशल्याने शिकता येते. हे वाद्य वाजवणाऱ्यास तारपकरी असे संबोधित केले जाते. त्याच्या वाजवण्याचा तालावर महिला पुरुष पेरण करून नाचत असतात. हे दृश्य डोळे दिपवणारे असून एकता आणि समतेचे प्रतीक आहे.
*भाग तीन*
थंडी ते उन्हाळा दरम्यान मधमाशी च्या माश्या आणि पोळे मधाचा गरा या सर्व घटकातील होणारे बदल अनुभवायास मिळतात.
सिमग्या नंतर तलाव, नदी या मधले पाण्याची पातळी खालावण्याचे होणारे परिणाम आणि त्याचा अंदाज
*भाग चार*
चंद्राचा बदलता आकार, चंद्र पृथ्वी मधील गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या समुद्राच्या भरती ओहोटी वर पावसाळी पाण्याचा अंदाज बांधणी. दरम्यान जलचर प्राणी, मासे, पक्षी, यांच्या जगण्यात होणारे बदल, बदल हवामान आणि त्याची लक्षणे
जोहार !
..........................................................
*कन्सेप्ट आणि कलाकार* : संजय दा पऱ्हाड, राजेश दा मोर, संदेश दा गोवारी, संदेश दा राजड, निलेश दा राजड, मंगेश दा कडू, संजय दा रावते, संदीप दा भोईर, कल्पेश दा गोवारी
*३D आर्ट आणि थीम* : विक्रम अरोरा & Team
*सहकार्य* : QUEST (Quality Evaluation for Sustainable Transformation) - आदिवासी विकास विभाग
_________________________________
चलो पारंपरिक ज्ञान जतन करूया, Lets do it together!
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4dbdc6db8a58f6696a3461351afd4eff%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.