राज्यातील लाखो शिक्षकांना
सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाची नवीन ड्युटी जाहीर करण्यात आली
आहे. ही निवडणूक ड्युटी लागलेल्या शिक्षकांचा मुंबईतला आकडा तब्बल ६० हजार,
तर राज्यभरातील आकडा सुमारे दीड लाखांच्या घरात असल्याने ही संख्या सध्या
चर्चेचा विषय ठरली आहे. ऐन परीक्षांच्या हंगामात ही ड्युटी लागल्याने
पुन्हा एकदा शिक्षकांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अभ्यासातून देशाची नवी
पिढी घडवणं, हे शिक्षकांचं मुख्य काम असताना प्रत्यक्षात मात्र जनगणना,
निवडणुका, माध्यान्ह आहार योजना ते अगदी हागणदारी मुक्ती योजनेच्या
कामासाठीही त्यांना राबवलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला शिक्षक आता
फक्त ज्ञानाच्या धडे देण्यापुरता मर्यादित न राहता, त्याचा बहुपयोगी शिक्षक
झाला आहे. त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप....
>> संकलन : सौरभ शर्मा
हागनदारी मुक्त योजना
> राज्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात
येणाऱ्या राज्य सरकारच्या हागनदारी मुक्त योजनेसाठी शिक्षकांचीच मदत घेतली
जात आहे.
> या योजनेअंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील,
विशेषतः ग्रामीण भागातील १०० टक्के शिक्षकांना राबावलं जात आहे. ही योजना
प्रभावशाली पध्दतीने राबविण्यासाठीची कामं त्यांच्यावर सोपवण्यात आली आहेत.
> या योजनेसाठी गावोगवी, घराघरात जाऊन स्वच्छतेचे धडे देण्याऱ्या शिक्षकांची संख्या सुमारे अडीच ते तीन लाख आहे.
शुध्द पेयजल योजना
> राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित,
शुध्द पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यासाठी सरकारच्या
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अविरत प्रयत्न करीत असून जनतेला पिण्याच्या
पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुध्द पेयजल योजना
सुरू केली. त्यानुसार या योजनेचं महत्व पटवून देण्यासाठीही राज्यातील
शिक्षकांचीच मदत घेण्यात आली आहे. त्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील
सुमारे ३ लाख शिक्षक हे काम करत आहेत.
निवडणुकीच्या कामांची जबाबदारी
> राज्यातील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य किंवा ग्रामपंचायत,
निवडणुका कोणत्याही असोत, त्यांच्या प्राथमिक कामासाठी शिक्षकांनाच जुंपलं
जातं.
> आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील शालेय शिक्षण
विभागातील ८० हजार शिक्षक, तर राज्यातील साडे तीन लाखाहून अधिक शिक्षक या
कामासाठी निवडले गेले आहेत.
> यामध्ये फक्त शालेय विभागातीलच शिक्षकांचा समावेश नसून विद्यापीठ पातळीवरील प्राध्यपकांनाही या कामासाठी जुंपण्यात आलं आहे.
> अमरावती, मराठवाडा, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर या विद्यापीठांमधील
६० ते ७० टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम देण्यात आलं आहे.
> सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या पुणे, मुंबई विद्यापीठांमधील ९०
टक्के कर्मचारी हे निवडणुकांच्या कामावर असल्याने परीक्षांबाबतही
प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यात मुंबई विद्यापीठाचे एकूण ९५० पैकी
८६० कर्मचारी, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील ५९० पैकी ३७०, पुणे
विद्यापीठाचे एकूण ६२७ पैकी ५९० कर्मचारी, संत गाडगेबाबा अमरावती
विद्यापीठाचे ५५० पैकी साधारण ४०० विद्यार्थी, नांदेड येथील स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे २८५ पैकी साधारण १७० कर्मचारी आणि बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे एकूण २५० कर्मचारी निवडणुक कामासाठी घेण्यात
आले आहेत.
जनगणनेचीही जबाबदारी
> दर दहा वर्षांनी एकदा होणाऱ्या जनगणनेसाठी राज्यातील सर्व शिक्षकांना वेठीला धरलं जातं.
> या वर्षी परीक्षेच्या काळात जनगणनेचं काम आल्याने शिक्षकांची मुक्तता
करण्यात आली असली, तरी आगामी काळात ते काम पुन्हा शिक्षकांकडेच सोपविण्यात
येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
> यासाठी राज्यातील साडे तीन लाख शालेय शिक्षकांबरोबरच ७५ हजार ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात येते.
सर्व शिक्षा अभियान
> केंद्र सरकारच्या 'सर्व शिक्षा अभियान - २०१२-१३' योजनेचं हे बारावं
वर्ष आहे. हे अभियान सक्षमपणे रावबण्यासाठीही मुख्याध्यापक-शिक्षकांचीच मदत
घेण्यात आली आहे.
> मुलांच्या शिक्षण हक्कांसंदर्भातील मोफत
आणि सक्तीचं शिक्षण अधिनियम (RTE)- २००९ या प्रक्रियेअंतर्गत 'महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षण परिषद' हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम असून राज्यात SSA
अर्थात सर्व शिक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सुमारे
साडेतीन लाख शिक्षकांचा समावेश करण्यात आला.
> त्यानुसार
विद्यार्थ्यांना आणि पालकांना शोधून, त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देऊन
त्या विद्यार्थ्यांची भर्ती शाळेत करणं हे महत्वाचं काम सध्या शिक्षकांनाच
करावं लागत आहे.
> यात राज्यातीलच नव्हे तर, देशभरातील सर्व
शिक्षकांचा समोवश आहे. यात राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिकचे सुमारे दोन
ते तीन लाख शिक्षक कार्यरत आहेत.
शिक्षकांनी पाजले पोलिओचे डोस
> एकेकाळी देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या पोलिओचं
निर्मूलन करण्यासाठी राज्यातील शिक्षकांनीच महत्वाची भूमिका बजावली होती.
सध्या या योजनेत शिक्षकांचा सहभाग म्हणावा तितका नसला, तरी ज्यावेळी पोलिओ
लसीकरण सुरू करण्यात आलं तेव्हा राज्यातील शिक्षकांनीच महत्वाची कामगिरी
बजावली होती. त्यावेळी साधारणपणे दीड लाख शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता.
विशेषत: यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १०० टक्के शिक्षकांनी ही योजना
यशस्वी करून दाखवली होती.
माध्यान्ह आहार योजना
>
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली माध्यान्ह आहार योजना
राबविण्यात आजवर शिक्षकच अग्रेसर राहिलेत. मुख्याध्यापकांच्या खांद्यावर
टाकण्यात आलेल्या या जबाबदारीच्या विरोधात गेली अनेक वर्षं शिक्षकांनीही
आवाज उठविला होता. या योजनेसाठी प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे सुमारे ७०
हजार मुख्याध्यापक काम करत आहेत. त्यात शिक्षकांची संख्या लक्षात घेता ती
सुमारे २० ते २५ हजाराच्या आसपास आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या
परिपक्व बनवितानाच, त्यांना शारीरि दृष्ट्या सक्षम बनवण्याची जबाबदारीही
त्यांनाच पार पाडावी लागत आहे.
इतर अनेक योजना आणि कार्यक्रम
> विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षकांना राज्य सरकारच्या इतर
अनेक योजना आणि कार्यक्रमातही सहभागी होऊन आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी
लागत आहे. यात स्काऊट, एन.एस.एस., एन.सी.सी, साक्षरता मोहीम आणि विज्ञान व
इतर प्रदर्शनं भरवणं यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यात सध्या
आरटीईनुसार येणाऱ्या अनेक कामांचीही भर पडत आहे.
--
-----------------------------------------------------------------------
Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2RHNs9O7tPrS%2BTeoPdorh3Ky6u3b%3D-aUsB06QFC%2BOUx2w%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.