त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्व पक्षीय घडणार लवकरच राजकीय महाभुकंप .......
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांची एक गुप्त बैठक होऊन सर्व राजकीय पक्ष हे फक्त निवडणुका पुरते आदिवासी समाजाचा वापर करतात व निवडणुका झाल्या का कार्यकर्त्यांना प्रत्येक राजकीय पक्ष विसरतो याच्यावर सर्वांचे एकमत होऊन याला कुठे तरी आळा घालण्या साठी येत्या काही दिवसात सर्व पक्षीय नेते हे आप आपल्या पक्षाच्या पदाचे राजीनामे देऊन एकाच दिवशी सर्व पक्षाच्या पदांचे राजीनामे देऊन त्र्यंबकेश्वर तालुक्या मध्ये लवकरच राजकीय महाभुकंप घडवुन आणनार आहेत विशेष करुन या सर्व पदाधिकाऱ्यांची अशी भावणा होती कि या आदिवासी भागामध्ये आश्रमशाळा आहेत पण शिक्षक नाही व दवाखाने आहेत पण वेळेवर डॅाक्टर नाही विजेचे पोल आहेत पण दिवसातून बारा बारा तास वीज राहत नाही,आश्रमशाळा मध्ये निक्रुष्ट प्रकाराचे जेवण व अामच्या आदिवासी माता भगीनिंना आजही पाण्या साठी वणवण करावी लागते तसेच दळणवळण या सारख्या प्रश्नावर कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी ला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही व फक्त राजकीय पक्ष हे पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा फक्त निवडणूका पुरता वापर करतात व नंतर सर्वांकडे दुर्लक्ष करतात व वेळोवेळी अपमानस्पद वागनुक देतात हे सर्वांच्या लक्षात आले म्हणून याचा उद्रेक होऊन एक इतिहासात नोंद होईल असी चळवळ उभी करणार असल्याचे बोलले गेले हरसुल भागात शिव सेना, राष्टवादी कॅांग्रेस, भाजपा,कॅांग्रेस,सिपीएम, या पक्षाचे या भागावर वर्चस्व आहे पण वरील सर्व पक्षाचे प्रमुख नेते हे लवकरच आप आपल्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करुन येत्या काहि दिवसांत राजकीय भुकंप घडवुन येत्या दसरा या मुहूर्तावर आदिवाशींच्या न्याय हक्कासाठी एका नविन पक्षाची स्थापना करुन घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे यामुळे सर्व पक्षांना एक जबरदस्त धक्का हा मिळणार आहे नविन पक्षाची ध्येय धोरण चिन्ह ध्वज हे कसे असावे यासाठी एक स्वतंत्र समिती स्थगित करुन लवकरच या पक्षाची नोदंनी करुन गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवनार असे सांगितले आहे आणि दसरा या मुहूर्तावर वरील पक्षाची घोषणा करुन पहिल्याच दिवशी ५० शाखा उघडण्याचे ध्येय असल्याचे सांगितले असुन लवकरच वरील सर्व राजकीय पक्ष हटाव मोहीम सुरु करु असे सांगितले नंतर या पक्षाचे पेठ,सुरगाणा,दिंडोरी,इगतपुरी,कळवणं,मोखाडा,विक्रमगड,जव्हार,वाडा,डहाणू,पालघर,आदि आदिवाशी बहुल तालुक्यात मेळावे घेऊन जनजागृती करुन महाराष्ट्रात एक आदिवासींचा हक्काचा पक्ष म्हणून आदिवाशीं साठीच्या प्रश्नावर आक्रमक पण लढा देऊ असी शपथच दसरा या मुहूर्तावर घेतली जाईल आणि वरील बातमी हि काही युवकांना समजताच युवकांमध्ये व आदिवासी भागामध्ये एक आनंदाचे वातावरण असुन एक समाधानाचे वातावरण त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते या मध्ये विशेष करुन कॅालेजच्या युवकांचा प्रचंड असा वर्ग आहे.
एका पक्षाच्या युवा नेत्याने तर शपथच घेतली आहे कि त्या पक्षा मध्ये झेंडा लावायला कार्यकर्ता राहणार नाही सर्व पक्षाचे पदाधिकारी हे एकाच दिवशी राजीनामे देऊन एक मोठा भुकंप घडवुन आणणार आहेत या गुप्त मीटिंग मध्ये जोपर्यंत पक्षाची स्थापना होत नाही तोपर्यंत कोणाचेही नाव हे उघड होणार नाही याची काळजी प्रत्येक जन घेताना दिसत आहे