कॉमर्सनंतर काय करू?

3 views
Skip to first unread message

चेतन Chetan

unread,
Sep 27, 2014, 5:49:30 AM9/27/14
to adi...@googlegroups.com

कॉमर्सनंतर काय करू?

http://maharashtratimes.indiatimes.com/career/Commerce/articleshow/43430605.cms

मी कॉमर्स पदवीधर आहे. गेली पाच वर्षे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत आहे. उज्वल भविष्यासाठी मी काय करु?

  तिथे किमान अकौंट्स, मार्केटिंग, सॅलरी, रिक्रुटमेंट यासारखी नित्य कामे नक्कीच असणार आहेत. यात कौशल्ये वाढवून प्रगती शक्य आहे. अन्यथा, रिसेप्शनच्याच कामासाठी मोठ्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, ट्रॅव्हल कंपनीत काम मिळविण्याचा प्रयत्नही करणे तुला शक्य आहे. अर्थातच तेथे आवश्यक असलेले कम्प्युटर वापरायचे उत्तम प्रशिक्षण गरजेचे राहील.

माझं बीकॉम पूर्ण झालं आहे. मला स्वतःची बेकरी सुरू करायची आहे. त्यासाठी बेकरी आणि कन्फेक्शनरीचा एखादा कोर्स सुचवावा.

तुझा बेकरी सुरू करायचा विचार आहे. त्यासाठी केवळ कोर्स करून उपयोग होत नाही, तर बेकरीचा व्यवसाय कसा चालतो, याची थोडीफार व्यावहारिक माहिती लागते. त्यासाठी तुझ्याच गावी प्रथम काम करावेस, असे मी सुचवेन. खरेदी, विक्री, मालाची साठवण, त्याचा ताजेपणा जपणे, या बेकरी व्यवसायातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजल्यावर पुढच्या वर्षी कोर्स करावा. किमान सहा महिन्यांपासून एक वर्षापर्यंत याचे कोर्स उपलब्ध आहेत. जेथे जेथे हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम चालतात, तेथे कोणतेही रीतसर प्रशिक्षण मिळलेच.

केवळ कोर्स पूर्ण करून घरगुती स्वरूपाची बिस्किटे, नानकटाई, केक्स इत्यादीचा व्यवसाय सहज शक्य आहे. वाटल्यास त्याचाही विचार करू शकतेस. त्यात मर्यादित यश व वाव आहे.


--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages