चेंज, वुइ कॅन!

3 views
Skip to first unread message

चेतन Chetan

unread,
Apr 30, 2014, 3:03:49 AM4/30/14
to adi...@googlegroups.com

चेंज, वुइ कॅन!

डॉ. मकरंद ठोंबरे 

http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/health-wealth/change/articleshow/33620675.cms

निर्णय घेताना तो वैचारिक स्तरावर घेण्यापेक्षा अनेकदा भावनिक स्तरावर घेतला जातो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या विचारांचा दर्जा आणि ताकद पुरेशी नसल्याने आपल्या भावनांना आपण अधिक प्राधान्य द्यायचे ठरवतो. यामुळेच आयुष्यात बहुतेक निर्णय चुकतात, असा माझा अनुभव आहे.

गेल्या लेखामध्ये आपण विचारांचे शुद्धीकरण का आवश्यक आहे, ते पाहिले. त्याचबरोबर मी माझ्यासाठीच्या हितकारक विचारांवर ठाम राहिलो, तर सहसा विचारांचा दर्जा घसरत नाही आणि साहजिकच मी तणावापासून स्वतःला दूर ठेवू शकतो, हेही आपण पाहिले. त्याचबरोबर ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर असणार आहेत, त्या वेळी मी तटस्थ राहणेच माझ्यासाठी श्रेयस्कर असणार आहे, हे सुद्धा जाणून घेतले.

बरेचदा पेशंट आम्हाला विचारतात, की असे विचारांमध्ये परिवर्तन किंवा बदल करणे शक्य आहे का? त्याचे उत्तर नक्कीच 'हो', असे आहे. विचारनिर्मितीची प्रक्रिया जरी संपूर्णपणे आपल्या आटोक्यात आणता आली नाही, तरी विचारांचा दर्जा आणि त्यांचे शुद्धीकरण आणि शेवटी विचार परिवर्तन संपूर्णपणे आपल्याच हातात आहे, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. त्यासाठी आधी विचार कशामुळे निर्माण होतात, हे आपण समजून घेतले पाहिजे.

विचारांची निर्मिती प्रामुख्याने तीन घटकांवर अवलंबून असते. १. आपण मिळवलेली माहिती, २. पूर्वानुभव आणि ३. आपण निर्माण केलेल्या ठाम; पण चुकीच्या धारणा.

आपल्या मनाचे कार्य पुष्कळ वेळा या तीन घटकांवर अवलंबून असते. किंबहुना कोणताही निर्णय घेण्याअगोदर प्रत्येक गोष्ट आपण या तिन्ही निकषांवर पडताळून पाहतो आणि नंतरच निर्णय घेऊ शकतो. निर्णय घेताना तो वैचारिक स्तरावर घेण्यापेक्षा अनेकदा भावनिक स्तरावर घेतला जातो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या विचारांचा दर्जा आणि ताकद पुरेशी नसल्याने आपल्या भावनांना आपण अधिक प्राधान्य द्यायचे ठरवतो. यामुळेच आयुष्यात बहुतेक निर्णय चुकतात, असा माझा अनुभव आहे. यातून मार्ग कसा काढला पाहिजे, याचे नियोजन आणि निर्णय करणे मात्र आपल्याच हातात असते. वास्तविक या सर्व गोष्टींची जबाबदारी आपलीच आहे; पण आपण नेहमीच समोरच्या व्यक्तीला, परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देण्यात धन्यता मानतो. वास्तविक ही पळवाट आहे, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

मी मिळवलेली माहिती, मला आलेले अनुभव आणि मी निर्माण केलेल्या धारणा नेहमीच वास्तवाला धरून असतील, असे नाही, हे आधी मनोमन स्वीकारले पाहिजे. आपणच केलेल्या चुकांचा स्वीकार केल्याशिवाय आपली कोणतीही प्रगती होणे अशक्य आहे. पुष्कळ जण म्हणतात, की सतत सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह विचारांची निर्मिती करा, म्हणजे आपोआप सर्व गोष्टी चांगल्या होतील. हे ऐकायला जरी योग्य वाटले, तरी प्रत्यक्षात अमलात आणणे थोडे अवघडच आहे. नुसते सकारात्मक विचार करून भागणार नाही, तर त्याला अनुरूप सकारात्मक भावना व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यानुसार जाणीवपूर्वक वर्तन होणे फार महत्त्वाचे आहे. आणि नुसते चांगले विचार करून परिस्थितीवर मात करणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी विचारांचा दर्जा, त्यातील सच्चेपणा यांचा जाणीवपूर्वक स्वीकार करावा लागेल. त्याशिवाय त्या ताकदीची ऊर्जा विचारांमधून आपल्याला मिळणार नाही. त्यासाठीच विचार परिवर्तन करता येणे अत्यावश्यक आहे. विचार शुद्धीकरण ही विचार परिवर्तनाच्या आधीची पायरी आहे. विचार परिवर्तन नक्की कसे करायचे, याबाबत पुढच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.


--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages