|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : 7 फेब्रुवारी २०१६ ||
आदिवासी समाजाची जीवनमूल्य आणि पारंपरिक ज्ञान यांच्याकडे जग आदर्श मार्ग म्हणून बघत असताना आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे.
हे प्रयत्न सर्व पातळी वरून होने गरजेचे आहे. त्या साठी विविध संस्था/संघटना/ग्रुप यांनी एकमेकांना पूरक प्रयत्न करायला हवे. अखंड आदिवासी समाज एक कुटुंब हि या भावनेने केलेले नक्कीच समाजा साठी हिताचे राहील.
आपल्या माहिती साठी
1) ५/०२ रोजी मुंबई मध्ये स्किल डेवेलोप्मेंट आणि इंत्रेप्रेनार्शीप डेवलोपमेंट खात्यातील अधिकाऱ्यासोबत प्राथमिक चर्चा झाली. वारली चित्रकलेचा अभ्यासक्रम निर्मिती आणि आदिवासी युवकांसाठी रोजगारनिर्मिती साठीचा उपक्रम शासकीय स्थरावर राबविण्या संदर्भात विचार विनिमय झाले. (संदर्भ - संसदेत खासदारांनी कौशल्य विकास मंत्रालयाला प्रश्न केला होता. वारली चित्रकला चा उपयोग करून कौशल्य विकास आणी रोजगार निर्मिती करता येता येयील का? त्या साठी ते मंत्रालय या संदर्भात चर्चा आणि तपासणी करत असताना त्यांनी आयुश ला संपर्क केला.) या मिटिंग मध्ये आयुश तर्फे चेतन गुराडा (मुंबई युनिवर्सिटी, प्राध्यापक), प्रांजन राऊत (एअर इंडिया, अभियंता), बबलू वाहुत (बेस्ट, अभियंता) यांनी सहभाग घेतला. लवकरच पुढील माहिती कळवली जायील
2) आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.
3) ६/०२ रोजी आदिवासींची स्वतःचे (E Commerce Website) ओन लयीन विक्री संकेत स्थळावर पेमेंट गेटवे चे इंटिग्रेशन साठी पेयू मनी सोबत करार आज पूर्ण करण्यात आला
4) आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249).
आणि आता आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together!
5) ६/०२ रोजी आदिवासी विकास प्रकल्पांचा अधिक विस्तृत अभ्यास करण्या करिता आयुश तर्फे सचिन सातवी यांनी “राष्ट्रीय ग्राम विकास एवं पंचायत राज संस्था” हैदराबाद (NIRD – National Institute of Rural Development and Panchayat Raj) येथे एक वर्षाच्या Post Graduate Diploma In Tribal Development Management दुरस्त अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यात देशभरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ञांचा समावेश आहे. हा अनुभव आयुश तर्फे घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रम आणि आदिवासी समाजा साठी च्या उपक्रमांना नक्कीच उपयोग होईल.
# आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता किवा स्वयंसेवक म्हणून येथे (
www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता
आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय लागली पाहिजे" आयुश चा हाच एक उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. त्या मुळे आयुश हे करेल आयुश ते करेल अशी अपेक्षा करण्या पेक्षा जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. हेच आयुश आहे. Lets do it together!
AYUSHonline team