Ankush Gawali
unread,Aug 1, 2013, 10:40:15 PM8/1/13Sign in to reply to author
Sign in to forward
You do not have permission to delete messages in this group
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to ayush, adiyuva
आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा मृत्यूचा सापळा
- विनोद पाटील - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2013 - 03:00 AM IST
Tags: tribal student, ashramshala
नाशिक - राज्यात एकीकडे कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूची चर्चा सुरू
असतानाच राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थीही सुरक्षित नसल्याचे भयावह
वास्तव समोर आले आहे. राज्यातील पाच संवेदनशील आदिवासी प्रकल्पांतील
आश्रमशाळांमध्ये दहा वर्षांत तब्बल 212 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची
माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे ही माहिती आदिवासी विभागाच्याच
सर्वेक्षणातून समोर आली असून, सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे
प्रमाण कळवण प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये असल्याचे समोर आले आहे.
पावसाळ्यात होणारे विविध आजार, सर्पदंश आदी कारणांमुळे मृत्यू झाल्याचा
दावा विभागाने केला आहे.
पावसाळ्यात दर वर्षी कुपोषणामुळे आदिवासी भागात शेकडो मुलांचे मृत्यू
होतात. शासनातर्फे कोट्यवधी रुपये कुपोषणावर खर्च होऊनही बालमृत्यूचे
प्रमाण कमी झालेले नाही. आदिवासी भागात एकीकडे हे वास्तव असताना दुसरीकडे
तटबंदी असणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेतही आदिवासी मूल सुरक्षित नसल्याचे
भयावह वास्तव समोर आले आहे. दर वर्षी आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलांचे
मृत्यू होत आहेत. नाशिक, कळवण, नंदुरबार, राजूर आणि अकोला प्रकल्पांतील
आश्रमशाळांच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. या पाच प्रकल्पांपैकी
सर्वाधिक आदिवासी मुलांचे मृत्यू नाशिक जिल्ह्यातील दोन्ही प्रकल्पांतील
आश्रमशाळांमध्ये झाले. कळवणमध्ये तब्बल 62, तर नाशिक प्रकल्पातील
शाळांमध्ये 57 आदिवासी मुलांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार या संवेदनशील
प्रकल्पात 47 मुलांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आश्रमशाळांवर दर वर्षी
तब्बल पाचशे कोटींच्यावर निधी खर्च होतो. मात्र, या शाळांमध्ये अपूर्ण
सोयींमुळे आणि दुर्लक्षामुळे हे मृत्यू झाल्याचे उघड झाले.
साथीचे आजार, सर्पदंश
पावसाळ्यातील साथीचे आजार, विषबाधा व सर्पदंशांमुळे मृत्यू वाढत आहेत.
आश्रमशाळा बंदिस्त असतानाही या घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले
जात आहे. विशेष म्हणजे या आश्रमशाळांमध्ये अपघातप्रसंगी आवश्यक
तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने
विद्यार्थ्यांना प्रथमोपचार मिळत नाहीत. त्यामुळे मुलांचे मृत्यूचे
प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तपासणीत शाळांमध्ये
त्रुटी आढळल्याने या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, याकडेही
दुर्लक्ष केल्याने या शाळांची नव्याने तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज
आहे.
प्रकल्पनिहाय मुलांचे मृत्यू
कळवण- 62
नाशिक- 75
नंदुरबार- 47
राजूर- 29
अकोला- 17