आपण काय करू शकतो?

14 views
Skip to first unread message
Assigned to ganeshw...@gmail.com by me

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 28, 2018, 9:41:36 AM4/28/18
to AYUSH group
आपण काय करू शकतो?

[स्थानिक आदिवासी बोली भाषा]
"इया य्या करां त्या करां, असा कराय पायज तसा कराया पायज, स्वतःचा काम करायचां का या करीत रेहायचां. जेमतेम कोठं आथां हलूं हलूं नोकरी लागलीहे त्यात कोठसीं घर नांगु का समाज समाज करीत बसूं ... निसतां डोक्याला ताप दसा ये पोराच मेसेज". असा वाटत होवा का काय काहींना. तय मन थोडां लिहून पाठवीतुं. संभालून घिजास....   

[साधारण मराठी भाषा]
सध्या नोकरी व्यवसाय करून आर्थिक चांगल्या परिस्थितीत असलेल्यांची संख्या जरी वाढत असली तरी एकूण समाजाचा विचार केल्यास हे प्रमाण खूप नगण्य आहे. असो पण यांची भूमिका खूप महत्वाची आहे, या अश्यानी समाजासाठी म्हणून काही करायचे ठरवल्यास खूप काही होऊ शकते.

जर यांनी प्रामाणिक मनाने (वयक्तिक/राजकीय/आर्थिक इ च्या इगो/महत्वाकांक्षे पेक्षा समाज हित यांना प्राथमिकता देऊन) तर नक्कीच चित्र खूप बदलू शकते. आपल्या कडे खूप मोठ्या प्रमाणात युवा वर्ग बेरोजगार आहे (मुबलक मनुष्यबळ), विविध क्षेत्रातले अनुभवी एक्सपर्ट आहेत (क्नॉलेज पूल), बऱ्यापैकी जमिनी आणि नैसर्गिक साधने आहेत (रिसोर्सेस, दुर्दैवाने हळू हळू जात आहेत आपल्या हातातून), नोकरी व्यवसाय करणाऱ्यांकडे आर्थिक धन आहे (भांडवल. सध्या बरेच जण फ्लॅट, जमिनी, गाड्या इत्यादी मध्ये गुंतवतात), सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्यांकडे दिशा आणि उद्देश आहे (व्हिजन आणि मिशन आणि कार्याचा अनुभव. पूरक आणि रचनात्मक कामाची सवय करावी लागेल), राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांकडे पॉलिसी मेकिंग मध्ये आवाज मांडण्याची संधी (पॉलिसी मेकिंग आणि गव्हर्नन्स, प्रभावी उपयोगात आणायला हवे). साशकीय तरतूद, योजना आणि निधी (पूरक कामांसाठी, त्या त्या तरतुदींसाठी प्रभावी पणे उपयोगात आणायला हवे)

या सगळ्यांची योग्य प्रकारे आपण "आदिवासी समाज हित" या वैचारिक दिशेने सांगड घालून एक सोशियल इंटरेप्रेनरशिप चे मॉडेल तयार करू शकतो. जे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करेल, आपले रिसोर्सेस टिकवेल, आर्थिक गुणवणूकदारांना (नोकरदार) सध्या पेक्षा जास्त मोबदला देईल, सामाजिक उपक्रमांना बळ देईल, राजकीय आणि सामाजिक प्रामाणिक नेतृत्व बळकट करेल, शासकीय तरतुदी योग्य राबवल्या जातील. आपण आर्थिक/सामाजिक/राजकीय स्वावलंबी बनू शकतो. एक ट्रायल म्हणून एका जिल्ह्यात/तालुक्यात प्रयोग करूया जर यशस्वी झाला तर त्यात ठराविक बदल करून इतरत्र प्रत्येक अनुसूचित क्षेत्रात आपल्यानं राबवता येईल.

(हजार-पाचशे किलोमीटर वरून इत्तर लोक आपल्याकडचे सगळे व्यवयास करून दबाव गट तयार करून सगळ्या पक्षात प्रभाव टाकतात, त्यांची लोकसंख्या ठराविक ठिकाणी वाढवत असतात, जमिनी घेतात, झोपडपट्ट्या वाढवतात, वरून गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रवृत्त करतात. असो सोबत ते मेहनत पण खूप करतात, आपण नेमके मेहनत करण्याचे विसरून गेलो आणि खेकडा वृत्ती वाढवून बसलो भांडत आपल्या आपल्या माणसात. 
उदाहरणासाठी अनुसूचीत क्षेत्रातील प्रत्येक नाक्यावर/स्टेशन/हायवे/बाजार/तालुका/जिल्ह्याची ठिकाणे वेवस्तीत निरीक्षण करा. उदाहरण - डहाणू, वाणगाव, पालघर, बोईसर, तलासरी, आशागड, वरोती, कासा, चारोटी, मनोर, जव्हार, उधवा ... अशी मोठी यादी बनवता येईल.)
 
जर आपण आपले उद्योग/व्यवसाय चे मजबूत जाळे बनवून एकत्रित उभे राहिलो तर कुणाची हिम्मत आहे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची? 
पण त्यासाठी आपल्याना खूप विचार पूर्वक नियोजन करून वेळ देऊन हे प्रयत्न करावे लागतील. समाज हितासाठी आपले वयक्तिक अजेंडा पेक्षा जास्त महत्व द्यावे लागेल. 

जल जंगल जमीन जीव टिकवून आर्थिक स्वावलंबनासाठी आपल्यानं मोठे पाऊल उचलावेच लागेल. बरीच वर्ष वेळ/मेहनत/आर्थिक खर्च करावा लागेल. पण हे सगळ्यासाठी आपल्यात एक परिवार म्हणून भावनिक आणि सामाजिक नाते आणि आपली दिशा स्पष्ट होण्या इतका सवांद आणि विश्वासाचे वातावरण तयार करावे लागेल. गेले ११ वर्ष आयुश मार्फत हेच प्रयत्न करीत आहोत. व्हाल सहभागी तुम्ही पण?

सध्या विचाराधीन उपक्रम क्लस्टर : भाजीपाला, वनोपज, शेतीउत्पन्न, आर्ट आणि क्राफ्ट, औषधी वनस्पती. 
सहभागी होण्यासाठी या लिंक वर फॉर्म भरावा  - www.in.adiyuva.in

आपले अभिप्राय / मार्गदर्शन ऊर्जादायक आहेतच. सक्रिय सहभाग घेऊन हे एक उदाहरण यशस्वी करूया !
Lets do it together ! 

जोहार !



AYUSHonline team

Abhay Sagar

unread,
Apr 29, 2018, 4:41:05 AM4/29/18
to adi...@googlegroups.com
Dear Ayush
I asked for a report by the way.
Regards

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtfAt_CXG4ey8Xvde572t40QQyCHqFqC5%3DspSd_xEg%3Dvw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages