|| *चिंतन: ९ ऑगस्ट झाला.... छान. पुढे काय?* ||
_गेल्या अनेक वर्षांपासून वाढता उत्साह आणि दर्शनी स्वरूप आपण अनुभवतो आहोत. विविध पाडा/गाव/बाजार/तालुका/जिल्हा/राज्य पातळीवर असंख्य जणांनी विविध माध्यमातून सहभाग घेऊन हे सगळे घडवून आणले. त्या सगळ्यांच्या *प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष मेहनतीबद्दल कौतुक आणि मानाचा जोहार!*_
देशभरात विविध ठिकाणी *एकच दिवशी शेकडो/हजारो/लाखो आदिवासी एकत्र येणे हे नक्कीच साधी गोष्ट नाही.* हि अफाट शक्ती/ऊर्जा योग्य पद्धतीने *समाज हितासाठी उपयोगात यावी* हि माफक अपेक्षा.🙏🏻
....................................................
उद्या कदाचित प्रसार माध्यमे/नेते/प्रतिनिधी/मंत्री/शासन/पंतप्रधान/राष्ट्रपती दखल/शुभेच्छा देतील हि. पण खरच *एवहडे पुरेसे आहे?*🤔
मला वाटते समाज म्हणून *या ऊर्जा/शक्तीचा उपयोग अधिक प्रभावी व्हावा.* पाड्यापासून ते देश पातळीवर आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न/अडचणी आहेत त्यासाठी त्या त्या पातळीवर एकत्रित पद्धतीने सहभाग, रचनात्मक कार्य, समाज आणि व्यवस्था योग्य पद्धतीने हाताळू शकणारे कौशल्य, समाजातून *प्रभावी नेतृत्वाची फळी निर्माणासाठी आवश्यक प्रणाली उभी करूया.*
जर खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य/वीज/पाणी/शिक्षण/रोजगार/सामाजिक सुरक्षा इत्यादींच्या सेवा सुरळीत सुरु राहिल्या. कायद्याप्रमाणे आदिवासींचे हक्क/योजना/निधी योग्य प्रमाणे शेवटच्या माणसा पर्यंत पोचत राहिले. संबंधित व्यवस्थेत आणि समाजात संवेदना, जागरूकता वाढविण्यासाठी हि ऊर्जा कामी आल्यास. नक्कीच वर्षभरातून भरातून एक दिवस आनंदाने एकत्र येऊन उत्सव म्हणून साजरा करण्यास काही अडचण नाही.
पण या दिवसाचे वाढत जाणारे फक्त नाच गाण्यातून *उत्सवाचे स्वरूप* आणि व्हिजन मिशन रहित *एक दिवसाची आदिवासी गर्दी* चिंताजनक वाटते.😌
दर वर्षीच्या *थीम प्रमाणे एक वर्ष फोकस कार्य* किंवा टप्या टप्प्याने प्रयत्न करत राहणे. विविध विषयावर आपल्या आवडीच्या कामाचे स्वरूप/पद्धत/प्राथमिकता/विषय घेऊन काम करत राहिल्यास मोठा बदल होऊ शकतो. काही मार्गदर्शक पायऱ्या या प्रमाणे सुरवात होउ शकेल.
▪️ *मार्गदर्शक पायऱ्या* :
१) सामाजिक कार्या विषयी माहिती वाचणे/ऐकणे *(माहिती)*
२) जवळील आवडलेल्या सामाजिक कार्यात दर्शक म्हणून जाणे *(सहभाग)*
३) अंमलबजावणी, नियोजनात सहभाग/सहकार्य करणे *(सहकार्य)*
४) संपर्कात इतरांना कार्यात सहभागासाठी सांगणे *(प्रचार)*
५) योग्य प्रतिनिधित्वाला प्रोत्साहन किंवा पुढाकार घेऊन दायित्व पार पाडणे *(नेतृत्व)*
६) कार्यक्रम अधिक प्रभावी होईल यासाठी सुधारणा करत राहणे *(सुधारणा)*
७) संपर्क ठेवून असेच काम करत असलेल्यांकडू नवीन शिकत राहणे *(संपर्क)*
८) संवाद वाढवून, समाजाला अपेक्षित विविध उपक्रमासाठी पुढाकार घेणे *(संवाद)*
९) अनुभव, निरीक्षण, परिस्थितीचे आकलन करून दीर्घकालीन योजना आखणे *(नियोजन)*
१०) आवश्यक असलेल्या विविध पातळीवर मार्गदर्शक म्हणून सहभाग घेणे *(मार्गदर्शक)*
_*किंवा या पेक्षा अधिक चांगली पद्धत* असल्यास त्या पद्धतीने कार्य करून आवडत्या क्षेत्रात आपला तन/मन/धन/वेळ समाज हितासाठी कामी आणूया.*तुमचे काय मत आहे यावर?*_
...................................................................
_#या दिशेने आयुश च्या माध्यमातून आपण गेली १५ वर्ष प्रायोगिक प्रयत्न करत आहोत.# *तुम्ही पण आवडीनुसार पुढाकार घ्यावा* 🙏🏻 Let’s do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!_
#[येथे तुमच्या कामाचे नाव टाकून प्रतिक्रिया बघाव्यात]