[success story] अर्जुन पुरस्कार हा आदिवासी भागाचाच गौरव -कविता राऊत

673 views
Skip to first unread message

AYUSH

unread,
Aug 21, 2012, 3:21:28 PM8/21/12
to AYUSH google group, adik...@googlegroups.com

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे मी खूप निराश झाले होते. मात्र आता अर्जुन पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे नव्या उमेदीने मी आता सराव करणार आहे, असेसावरपाडा एक्स्प्रेसम्हणून ख्याती असलेली धावपटू कविता राऊत हिने सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविणाऱ्या कविताला लंडन ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्यात अपयश आले होते. त्यामुळे ती अतिशय निराश झाली होती. आता जागतिक मैदानी स्पर्धा (२०१३) आशियाई क्रीडा स्पर्धा (२०१४) या स्पर्धामध्ये ती १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीवर लक्ष केंद्रित करीत आहे. ती सध्या नाशिक येथे विजिंदरसिंग या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
पुरस्काराची बातमी मला शनिवारी रात्री उशिरा कळली, त्यावेळी मी प्रवासात होते. घरी गेल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना अतिशय आनंद झाला. परंतु आमच्या गावातही जल्लोष करण्यात आला. अनेक जण माझ्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत गावाच्या वेशीजवळ माझी वाट पाहात होते. मी लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकले नाही याचे दु:खही त्यांना वाटत होते. मी गावात पोहोचल्यानंतर अनेकांनी मला मिठाई खायला दिली. अर्जुन पुरस्कार हा आमच्या आदिवासी भागाचाच गौरव आहे, असे कविताने सांगितले.
कविता सध्या ओएनजीसी कंपनीत नोकरी करीत आहे. तिचे प्रशिक्षक विजिंदर सिंग यांनी कविताला मिळालेला अर्जुन पुरस्कार हा तिच्या कारकीर्दीचा गौरव असल्याचे सांगितले. ती आगामी आशियाई जागतिक स्पर्धेत पदक मिळवील, अशीही खात्री त्यांनी व्यक्त केली.

 

Original Link : http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245090:2012-08-19-18-34-27&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5

 

Kavita’s facebook page : https://www.facebook.com/kaveeta.raut

 

 

From: AYUSH [mailto:adi...@gmail.com]
Sent: 28 November 2010 21:58
To: 'AYUSH on net'
Subject: FW: [success story]
सावरपाडय़ाची कविता!

 

 

कविताच्या चिंतेने रात्रभर आमचा डोळा लागत नाही
सावरपाडा एक्सप्रेसची संघर्षमय कहाणी
प्रज्ञा सदावर्ते
http://www.saamana.com/2010/November/28/Images/kavita-raut.jpgनाशिक, दि. 27 - आशियाई स्पर्धेत कविताने रौप्यपदक जिंकल्याची बातमी कळल्यावर अख्खा सावरपाडा गाव आमच्या घरी धावला. कविता घरी कधी येणार, हाच प्रत्येकाचा सवाल होता. दोन वर्ष झाली आमची कविताशी भेट झाली नाही. तिला टीव्हीत पाहतो तेव्हा तिला कडकडून मिठी मारावीशी वाटते. ती फोन करते तेव्हा आमच्या तोंडून शब्दच फूटत नाहीत. परदेशात असलेल्या कविताकडे पुरेसे पैसे असतील का? ती कशी असेल? या चिंतेने रात्रभर डोळा लागत नाही. ती दूर असली तरी आमचा जीव तिच्याजवळ असतो. आम्हाला आता तिला भेटायचंय... सावरपाडा एक्सप्रेसम्हणून जगात यशाचा झेंडा रोवणार्‍या कविता राऊतचे आईवडील आपल्या लेकीची यशोगाथा सांगत होते. प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती कविताची चिंता आणि तिच्या भेटीची ओढ.
कविताने रा्रकुलमधील कास्यपदकापाठोपाठ चीनमध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य आणि कास्य पदक जिंकून मराठीचा झेंडा फडकविला आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वरातील सावरपाडा हा दुर्गम आदिवासी भाग पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकला. दै. सामनाप्रतिनिधीने तिचे वडील रामदास राऊत आणि आई सुमित्रा यांची सावरपाड्यात जाऊन भेट घेतली. तेव्हा त्यांनी कविताच्या संघर्षमय भरारीचा पटच उलगडला.
विजयेंद्र सिंग यांनी हेरलं झाकलं माणिकhttp://www.saamana.com/2010/November/28/Images/27NPH13.jpg
कविताचे धावण्यातले गुण हेरले ते नाशिक येथील प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांनी. तिने एका स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर विजयेंद्र सिंग कविताच्या घरी गेेले. कविता फार नाव कमवील, शिकण्यासाठी तिला मी घेऊन जातो असे सांगितल्यावर कविताच्या आईवडिलांनी त्यांना स्प नकार दिला, पण सिंग यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. गावकर्‍यांना ते भेटले. कविता देशात नाव कमावील असा विश्‍वास त्यांनी दिला. त्यानंतर गावकर्‍यांनी कविताचे वडील रामदास राऊत यांची समजूत काढली आणि ते तिला घेऊन गेले. तिला मुलीसारखे सांभाळले. तिच्या प्रशिक्षणासाठी दिवसरात्र क केले.
*
तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवावे
ती बारा वर्षांची असतानाच धावण्याच्या शर्यतीत जिल्हा पातळीवर चमकली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. जिद्द व मेहनतीने राज्य आणि रा्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटविला. आता तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवावं, हीच आमची इच्छा आहे. दोन वर्षात तिची भेट नाही. तिला पाहण्यासाठी जीव तुटतो म्हणूनच तिला भेटण्यासाठी आता रविवारी 28 तारखेला बंगळुरूला आम्ही जाणार आहोत. सुमित्रा राऊत सांगत होत्या. त्याच वेळी लेकीच्या पराक्रमाने त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रूही हळूच वाट काढत होते.
*
शाळेने ट्रॅकसूट परत मागितला
प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांनी तिला नाशिकला नेण्याचे ठरविले. तेव्हा हरसूलच्या शाळेतून तिचा दाखला काढण्यासाठी त्यांना जिल्हाधिकार्‍यांपर्यंत जावे लागले. इतकेच नव्हे शाळेने तिला दिलेला ट्रॅकसूट मागून घेतला आणि आमच्याकडून सहाशे रुपये घेतले, अशी कटू आठवण रामदास राऊत यांनी यावेळी सांगितली.
*
कविताची भरारी
रा्रीय पातळीवरील बहुतांश विक्रम आज कविताच्या नावावर आहेत. मुंबई, पुणे, दिल्लीसह इतर मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानी महिला गटात ती अव्वल ठरली आहे. फेडरेशन कप, नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षात तिने पदकांची लयलूट केली आहे. त्यात भोपाळ आंतरराज्य स्पर्धेतील दोन कास्यपदके, 48व्या रा्रीय खुल्या स्पर्धेतील पदके, आंतरराज्य रेल्वे स्पर्धेतील सुवर्णपदके अशी पदकांची संख्या मोठी आहे. जपानच्या वर्ल्ड क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला आहे. एशियन चॅम्पियनशिप 2004मध्ये तिने रौप्यपदक पटकावले होते.
*
सावरपाड्यात अजूनही ना पाणी ना रस्ते
रा्रकुल व चीनमधील आशियाई स्पर्धेच्या वेळी सावरपाड्यातील रहिवाशांनी आमच्या घरी टीव्हीसमोर कविताला पाहण्यासाठी गर्दी केली होती. तिथं ती जिंकल्यावर मोठ्या माणसांचे पाय आमच्या घराला लागले. दिवाळीच्या आधी आणि नंतरही घरासमोर फटाके फुटले. कविताने देशाचं नाव मोठं केलं, आम्ही कधी मोठे शहर पाहिले नाही. बंगळुरू पाहण्यासाठी कविताने 28 नोव्हेंबरला बोलावलं असलं तरी आम्हाला तिला भेटण्याचीच जास्त ओढ आहे. कविता रामदास राऊत, सावरपाडा, पोस्ट - खरशेत, ता. त्र्यंबकेश्‍वर हा पत्ता आता आंतररा्रीय पातळीवर झळकलाय, पण तिचे गाव सावरपाड्याला जोडणार्‍या रस्त्याची दुर्दशा असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा फक्त फलक आहे. वीस वर्षांपासून पाणी योजना अजून रखडलेली आहे.
*
आठ दिवस फक्त पपईवर
कविता मुळात काळू आहे. आता कधीतरी घरी येते तेव्हाही शांत बसत नाही. हलाखीच्या परिस्थितीतही तिने सावरपाड्यात चौथीपर्यंत शिक्षण घेतले. चप्पल, बुटांचा तिने हट्ट धरला नाही. अनवाणी धावतच जिल्हा पातळीवरील स्पर्धांपर्यंत अव्वल होती. तेव्हापासून आतापर्यंत ती दूर राहते. सुरुवातीला महारा्राबाहेर होणार्‍या स्पर्धेसाठी काही स्पर्धक विमानाने यायचे. आमची कविता तीन दिवस आधी निघायची, रेल्वेने प्रवास करीत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायची. एकदा मलेशियात स्पर्धेसाठी गेली तेव्हा तिथलं खाणं तिला आवडलं नाही. पपई खाऊन तिने आठ दिवस काढले. दिल्लीत आल्यावरच अन्न खाल्लं. म्हणूनच तिच्या काळजीने आमचा जीव तुटतो... सुमित्राबाई सांगत होत्या.
*
आदिवासी धावपटूंना आर्थिक मदतीची गरज
कवितासारख्याच बारा गुणी मुलांना विजयेंद्र सिंग नाशकात प्रशिक्षण देत आहेत. बाळासाहेब शिरफुले, किसन तडवी, सुरेश वाघ, गोविंद राय हे चौघे अवघ्या एक वर्षाच्या सरावानंतर रा्रीय पातळीवर चमकले आहे, तर काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या अभिजित हिरकुट, संतोष भसरे, धनराज भोये व अंजना यांच्यातही कवितासारखीच क्षमता आहे. ही मुले कुठल्याही अत्याधुनिक सुविधांशिवाय सराव करताहेत. घरच्या गरिबीमुळे हातात पैसे नसल्याने योग्य आहारामुळे ते मागे पडण्याची भिती आहे. काही दानशूर मंडळी मदत करतात. मात्र, ती तोकडी ठरतेय.

 

 

 

Original at - http://www.saamana.com/2010/November/28/Link/Main5.htm

 

From: AYUSH [mailto:adi...@gmail.com]
Sent: 15 October 2010 19:28
To: AYUSH google group; ayus...@googlegroups.com
Cc: 'AYUSH on net'; 'AYUSH yahoo'
Subject: [success story]
सावरपाडय़ाची कविता!

 

 

AYUSH success stories

This mail sent you to share success story.
We believe sharing success stories will be definitely can impact your life positively. We are sharing story received from reference. If you have any success story please send to us with necessary details [mentioned below]

अपले कडलि बिजि लोखा फ़ार सुधरेल आहात. त अपले त्याहि काय वेगला केला त्या समजुन घेव ना आपले हो काहि नविन करुन पाहु. माना माहित आहे अपले सगले फ़ार मोहरप जाव.

क्रीडाधोरणाच्या आयचा घो..

 

 

 

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत कविता राऊत या सावरपाडय़ाच्या मुलीने केलेला विक्रम हा नक्कीच अभिमान वाटावा असा आहे. मिल्खासिंगने याच स्पर्धेत पुरूष गटामध्ये केलेल्या विक्रमानंतर पन्नास वर्षांनी तो घडला आहे, असे म्हटले की मग त्या विक्रमाचे महत्त्व आपल्याला कळेल. मिल्खासिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत १९५८ मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. या मुलीने महिलांच्या अ‍ॅथलेटिक्समध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ पदक मिळवले आहे. तिने या अंतरासाठी ३३ मिनिटे आणि ५.२८ सेकंद एवढा वेळ घेतला. कोचीमध्ये याच वर्षी मे महिन्यात झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने एवढय़ाच अंतरासाठी ३२ मिनिटे आणि ४१.३१ सेकंद एवढा वेळ घेतला होता. याचाच अर्थ तिला कोचीपेक्षा सेकंदभर जास्त वेळ लागूनही ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ब्राँझ पदकाला पात्र ठरली. ती नाशिक जिल्ह्यातील ज्या आदिवासी भागातून आणि समाजातून आली, त्या भागाला आणि अर्थातच समाजालासुद्धा तिच्या या यशाबद्दल दाद द्यायला हवी. लाकूडफाटा जमवण्यासाठी जंगलात अनवाणी पायी चालत जायचे तसेच पाण्यासाठी चारपाच किलोमीटपर्यंत वणवण करायची आणि कसेबसे आवरून शाळेला जायचे हा तर तिचा काही काळ दिनक्रमच राहिला असेल. अशा या मुलीला शालेय स्पर्धेत पळताना पाहून क्रीडा प्राधिकरणाच्या प्रमुखांनी निवडले आणि तिला प्रशिक्षण द्यायला प्रारंभ केला, अन्यथा हे झाकले माणिक, हर्सूल आणि सावरपाडय़ाच्या परिसरात तसेच राहिले असते. विजेंदरसिंग यांचे महाराष्ट्राने त्यासाठी आभारही मानले पाहिजेत. कविताचा आता सारेच सावरपाडा एक्स्प्रेसम्हणून गौरव करतील आणि तिला जास्तीत जास्त पारितोषिके द्यायचा प्रयत्नही होईल. पण तो तिच्यासमवेत काढायच्या छायाचित्रांसाठी किती आणि खरोखरच महाराष्ट्र सरकार खेळासाठी उत्तेजन देते हे सांगण्यासाठी किती, हाही पुन्हा प्रश्नच आहे. कविता राऊत हिच्यापूर्वी मेलबोर्नच्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्य पदक मिळवले होते. लांब उडीमध्ये त्याच स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज आणि सीमा अंटील यांनी अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझ पदके मिळवली होती. मँचेस्टरच्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत २००२ मध्ये नीलम जसवंत सिंग हिने थाळीफेकीत रौप्य पदक मिळवले होते, पण एवढय़ा अंतराच्या पळण्याच्या शर्यतीत राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत मिळालेले हे पहिलेच पारितोषिक होय. याआधी अर्थातच पी. टी. उषा हिने आशियाई क्रीडास्पर्धा आणि राष्ट्रीय क्रीडास्पर्धामध्ये विक्रम केलेले आहेत, पण हा तिचा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेतला सर्वात मोठा म्हणून तिचा विजय हा अधिक स्पृहणीय होय. पी. टी. उषाने असंख्य स्पर्धामधून सुवर्ण पदके मिळवली. शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिचा विक्रम ११.३९ सेकंदांचा आहे. ४०० मीटर स्पर्धेत तिने ५१.१६ सेकंदांचा वेळ घेतला होता. १९८४ च्या लॉस एन्जेलिसच्या ऑलिंपिक्समध्ये उषा चौथ्या क्रमांकावर आली होती. उषाचा कोणताही विक्रम कमी लेखायचा म्हणून नव्हे, पण अनेकदा विक्रम केल्यानंतर उषानंतर कोण, असे विचारले तर नाव घेण्यासारखे एकही नाव आमच्या डोळ्यासमोर येत नाही, ही केवढी लाजीरवाणी बाब आहे, हे आमच्या क्रीडा संघटकांपैकी कुणी लक्षातच घेतलेले नाही. आपल्याकडे मॅरेथॉन स्पर्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत भरवण्यात येते, पण त्याचा आपल्या स्त्रीपुरूष खेळाडूंना उपयोग होतो किंवा नाही, हे कोणीच पाहात नाही. उपक्रमशीलमंडळींना केवळ व्यवहारामागला अर्थचांगला कळत असल्याने, त्यांचे झेंडे आकाशात फक्त फडकतच राहतात, पण त्याचे पदकांमध्ये रूपांतर होताना कधीच दिसत नाही. सावरपाडय़ासारख्या खेडय़ात तर या अशा स्पर्धाचे लोण पोहोचायचा प्रश्नच येत नाही. अमेरिकेत बेट्टी रॉबिन्सन नावाची एक महिला अ‍ॅथलेट होऊन गेली. तिचा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये झालेला प्रवेश हाच मुळी अतिशय चमत्कृतीपूर्ण म्हणावा लागेल. १९२८ च्या एप्रिल महिन्यात घडलेला हा प्रसंग आहे. इलिनॉयमध्ये रिव्हरडेलहून थॉन्र्टनला शाळेत जाण्यासाठी ती रेल्वे स्टेशनवर आली आणि गाडी सुटल्याचे तिने पाहिले. गाडी पकडण्यासाठी ती विद्युतवेगाने प्लॅटफॉर्मवर पळाली आणि तिने आपला डबा पकडला. तिच्या या धावण्याने चकित झालेल्या सी. बी. प्राईस या क्रीडा प्रशिक्षकांनी तिला बोलावून घेतले आणि शाळेच्या व्हरांडय़ामध्ये पळायला सांगितले, ती पळाली. मग त्याने तिला त्याच शाळेतल्या मुलांच्या बरोबरीने पळायला सांगितले. ती मुलांमध्येही पहिली आली. तेव्हा मात्र त्यांनी तिला शिकागोमध्ये ऑलिंपिक्सच्या सरावासाठी येण्यास सांगितले आणि आश्चर्य म्हणजे १९२८ च्या अ‍ॅमस्टरडॅम ऑलिंपिक्समध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने सुवर्ण पदक प्राप्त केले. पुढे १९९६च्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्सच्या निमित्ताने एका पत्रकाराला तिच्या या प्रसंगाविषयी जाणून घ्यावेसे वाटले तेव्हा तिच्या वृद्ध पतिराजांनी तुम्हाला माहिती देतो, पण तुम्ही त्यासाठी मोबदला काय देणारअसा त्या पत्रकाराला प्रश्न केला. काळाचा महिमा म्हणतात तो हाच. सांगायचा मुद्दा हा, की नाव आहे, तोपर्यंत त्यांच्यामागे धावणारे, त्यांना नंतर विस्मृतीच्या अडगळीत टाकून देतात. कविताच्या ब्राँझ पदकानंतर तिला यापुढे येणाऱ्या लंडन ऑलिंपिक्समध्ये उतरवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार संबंधित सर्व संघटकांनी करण्याची गरज आहे. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा हा तिच्या आयुष्यातला एक टप्पा झाला. पण अशा असंख्य टप्प्यांना तिला पार करायचे आहे. अनेक अडथळ्यांच्या शर्यतींना जिंकायचे आहे. आपलाच विक्रम मोडीत काढून नवे विक्रम करायचे आहेत. ऑलिंपिक्समध्ये कोणतीच कामगिरी कायमस्वरूपी नसते. तिथे दर वेळी नवनवे विक्रम होत असतात. त्यासाठी तिला तयार करावे लागेल. आज ती नाचणीची भाकरी खाऊन यश मिळवू शकली, म्हणजे तिच्या वाटय़ाला फक्त नाचणीची भाकरीच येईल, असेही घडता कामा नये. ऑस्ट्रेलियाची धावपटू कॅथी फ्रिमन हिने सिडनी ऑलिंपिक्समध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमालाच एवढा प्रचंड विक्रम केला की सारे जग तोंडात बोटे घालून त्याकडे पाहात राहिले. तीही ऑस्ट्रेलियातल्या आदिवासी जमातीची आणि तिला ऑलिंपिक्सच्या ज्योती प्रज्वलनाचा मान दिला गेला म्हणून तिथे अनेकांनी आदळआपट केली होती. पण त्यानंतर तिने जी कामगिरी केली, त्याने या साऱ्या मंडळींचा आवाजच बंद करुन टाकला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियन सरकारने तिथल्या आदिवासींना खेळांसाठी अधिक प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतले जे देदीप्यमान यश दिसते आहे, त्यामागे हे धोरण आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तिथेही आदिवासींना खेळासाठी कसले प्रोत्साहन देता, त्यापेक्षा त्यांची गरिबी दूर करा, असे सांगून मूळ प्रश्न टोलवायचा प्रयत्न कमी झाला नाही. आपल्याकडे खेळाकडे लक्ष द्या, असे सांगायचा अवकाश, की आमचे क्रीडाप्रेमी घराबाहेर पडतात आणि कोणता गोलंदाज चांगला आणि फलंदाजांमध्ये सचिनशोधतात. ते त्यांनी अवश्य करावे पण कोण चांगले धावू शकतो, कोण जास्त चपळ आहे, हेही त्यांनी तपासावे. ज्या अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदके, तिथे भारत दिसतच नाही, हे थांबायला हवे. कविताचे प्रशिक्षक विजेंदरसिंग यांच्या गुणग्राहकतेचे कौतुक आहे ते यासाठीच. आपल्याकडे ज्या मैदानांवर सिंथेटिक ट्रॅकतयार करण्यात आला आहे, तिथे विशिष्ट प्रकारचेस्पोर्ट्स शूजअसल्याशिवाय चालूही दिले जात नाही. अनवाणी चालणाऱ्यांना तर मज्जावच केला जातो. या अशा स्पर्धामध्ये एकशतांश सेकंदाने प्रत्येकाचा कस लागत असतो. त्यातही तिघे-चौघे वाटेकरी निघू शकतात. तेव्हा प्रत्येक खेळाडूचा जोम कसा वाढवायचा आणि त्यासाठी त्याला जास्तीत जास्त सराव कसा करता येईल हे पाहण्याचे काम करायला हवे. कुणाच्या पायामध्ये काय आहे किंवा काय नाही, हे पाहिले जाता कामा नये. आपल्याकडे योग्य त्या सरावासाठी बदली मागावी लागते, त्यासाठी रदबदली करायचा प्रसंग येतो आणि मंत्रालयाच्या दारामध्ये घोटाळावे लागते. पुण्याची अनिसा सय्यद नेमबाजीचा सराव करण्यासाठी रेल्वेकडे दोन वर्षे बदली मागत होती, अखेरीस तिला राजीनामा देणे भाग पडले. या पाश्र्वभूमीवर कविताचे यश खुलून दिसणारे आहे. सावरपाडा या गावाने विचार करावा आणि भोसला मिलिटरी स्कूलच्या ज्या मैदानावर कविताने नियमित व्यायाम केला, तिथे फिरायला येणाऱ्या समाजालाही अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा हा प्रश्न आहे.

 

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=107041:2010-10-11-08-27-20&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

 

 

 

क्रीडाधोरणाच्या आयचा घो..

महाराष्ट्र देशातील सर्वात विकसित राज्य मानले जाते. क्रीडासुविधांच्या, सवलतींच्या आणि प्रोत्साहनांच्या बाबतीत मात्र पंजाब, हरियाणा, यांच्यासारखी राज्ये आपल्या खूपच पुढे आहेत. ही खंत आहे महाराष्ट्राच्या साऱ्या उदयोन्मुख खेळाडूंची. दोन सुवर्णपदके पटकाविणाऱ्या नेमबाज अनिता सय्यदची. कांस्यपदक पटकाविणाऱ्या धावपटू कविता राऊतची, कुस्तीगीरांची. कारण महाराष्ट्राला निश्चित असे क्रीडाधोरणच नाही. पार्टटाइम काम करणारे क्रीडा संचालक आणि खेळाशी सुतराम संबंध नसलेले क्रीडामंत्री यामुळे राज्याच्या क्रीडाविश्वास इतर राज्यांच्या तुलनेत झाला नाही.
कविता राऊत जिंकल्यानंतर आता जाग आलेल्या राज्यकर्त्यांनी तिला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. अशा अनेक गरजू कविता राऊत आहेत. नगरच्या एका छोटय़ा खेडेगावातून आलेली पूजा वऱ्हाडे सध्या बंगलोरच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेत आहे. नगर ते बंगलोरचा कॅम्प यादरम्यानचा तिचा प्रवासही कवितासारखाच खडतर होता. खो-खोमध्ये विद्युल्लतेसारखी पळायची म्हणून तिला अ‍ॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर आणण्यात आले. खो-खोमुळेच धावण्याचा स्टॅमिना वाढला. म्हणून मध्यम पल्ल्यांच्या शर्यतीत उतरविण्यात आले. धावायला बूट नाहीत. ७ हजारांचे बूट आणि स्पाइक्सचे १० हजार रुपयांचे बूट घालून धावणे केवळ स्वप्नातच शक्य होते पण राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेने प्राथमिक खर्च दिला. काही देणगीदार उभे केले. पूजा वऱ्हाडेदेखील कवितासारखीच पुढे आली. सिंगापूरच्या एशियन स्पर्धेत ब्रॉन्झपदक पटकाविले. तेथेच झालेल्या ऑलिम्पिक ट्रायल्समध्येही १५०० मीटर्समध्ये ब्रॉन्झपदक मिळाले. म्हणून बंगलोरचा कॅम्प लाभला. तेथे परदेशी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. १६ वर्षांच्या पूजाचा अभ्यास मात्र बुडाला. १८ पूर्ण नाहीत म्हणून कुणी नोकरी देत नाही आणि स्कॉलरशिपही. खेडेगावातून आलेल्या या छोटय़ा मुलीला आधी पालक एकटे सोडतच नव्हते. पण कविता राऊत, मोनिका आठरे, ललिता बाबर या मुलींचा राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंचा एक गट बनला. एकमेकींना आधार मिळाला. पालकांची काळजीही काही अंशी मिटली. पूजा वऱ्हाडेची कैफियत तीच मोनिका आठरेची आणि तीच तक्रार ललिता बाबरची. कॅम्पला येण्या-जाण्याचा खर्च कोण करणार? धावपटूंना घ्याव्या लागणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या आहाराचा, कृत्रिम प्रथिनांचा व तत्सम उत्पादनांचा खर्च कोण करणार? ८ ते १० हजारांचे बूट दोन महिने सतत धावल्यानंतर झिजतात. दरवेळी हा खर्च कोण करणार?
विजयी झाल्यानंतर लाखांची बक्षिसे देणाऱ्यांपैकी जर कुणी या स्पर्धकांना आधीपासून मदत केली तर ती सत्कारणी लागेल. प्रत्येक उदयोन्मुख खेळाडूंना वेगवेगळ्या मदतीची गरज असते. कुणाला वाया गेलेला अभ्यासाचा वेळ भरून काढायचा असतो. कुणाला घरापासून दूर राहिल्यामुळे मरगळ आलेली असते. कुणाला आहार, प्रथिने यांची गरज असते. कुणाला किटहवे असते. यापैकी कोणत्याही प्रकारची मदत करून सच्चा क्रीडाप्रेमी आपला खारीचा वाटा उचलू शकतो. प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूला वेगवेगळ्या प्रकारची मदत हवी असते. कीर्तीच्या शिखरावर पोहोचण्याआधी अशा मिळणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा मदतींचे महत्त्व आगळे असते. नाशिकमध्ये काही स्थानिक मंडळी, डॉक्टर्स, क्रीडाप्रेमी कविता, मोनिका, यांच्यासारख्यांना आधीपासून मदत करीत आहेत. गरिबीत वाढलेली ही मुले म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकली. कविता राऊत आज म्हणत होती, ‘मी गावात गेली, की माझे कौतुक होईल; पण घरी गेल्यावर स्वच्छ पिण्याचे पाणी आणण्यासाठी आजही मला डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन ३-४ किलोमीटर्सचा प्रवास करावा लागणार आहे.एशियाड कॅम्पमुळे कविताला घरी जाता येणार नाही. आईच्या हातची जोंधळ्याची भाकरी खाता येणार नाही. जन्मापासूनच अनेक गोष्टींचा त्याग करण्याची सवय असणारी ही मुलं तरीही जिद्दीने पुढे जात आहेत. आहार, क्रीडासाहित्य यांची उणीव दूर करणारी संस्था, संघटना किंवा एखादा दानशूर भेटतो. राज्य शासनाचे, क्रीडा खात्याचे कर्तव्य या संस्था, संघटना आणि व्यक्ती पार पाडतात. गरिबीत वाढणाऱ्या क्रीडा गुणवत्तेला फुलण्याचा विश्वास आपले राज्य सरकार देऊ शकत नाही, हीच खरी खंत आहे. खेळाच्या नावावर करोडो रुपयांची बरसात होते. दुर्दैवाने तो पाऊस कविता राऊत, पूजा वऱ्हाडे, मोनिका आठरे, ललिता बाबर यांच्यासारख्यांवर पडत नाही.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106931:2010-10-11-07-34-27&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5

कविता राऊत

जिथे हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल डोंगरदऱ्यांमध्ये पायपीट करावी लागते, अशा आदिवासी भागातील सावरपाडा या छोट्या व
स्तीतील कविता राऊत ही मुलगी. कविताचे वडील वनखात्यात गार्ड. त्यांनी तिला हरसूलच्या शाळेत घातले आणि विश्व हिंदू परिषदेच्या हॉस्टेलमध्ये ठेवले.
त्या शाळेतर्फे कविता एका विभागीय स्पर्धेत सहभागी झाली. मात्र, योग्य प्रशिक्षण नसल्याने तिला या स्पर्धेच्या दोन दिवस आधी स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या नाशिक केंदात आणले गेले. त्या स्पर्धेत कविताने एक पदक तर मिळवलेच पण तिला या केंदाचे प्रशिक्षक विजेंदसिंग यांच्या रूपाने गुरूही लाभले. तत्पूवीर् पुरेसं प्रशिक्षण नसतानाही तिने बंगलोरला झालेल्या शालेय स्तर राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक कांस्य पदकाची कमाई केली होती.
कविताच्या धावण्यात दम आहे, हे लक्षात आल्यावर विजेंदसिंग यांनी तिच्यावर लक्ष केंदित केले. प्रारंभीच्या काळात शनिवार सायंकाळ ते सोमवार सकाळ या काळात प्रशिक्षणासाठी कविता हरसूलहून नाशिक गाठत असे. पण, हे अवघड होऊ लागल्यावर तिला नाशिकच्या 'भोसला'मध्ये प्रवेश देऊन विजेंदसिंग यांनी स्वत:च्या घरीच कविताच्या राहण्याची सोय केली. प्रशिक्षण मागीर् लागल्यावर कविताने विविध मॅरेथॉन स्पर्धा गाजवत पदकांची लयलूट सुरू केली. भोपाळला आंतरविभागीय स्पर्धेत दोन रजत, चैनैतील २० वर्षांखालील फेडरेशन राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रजत, क्युलोनला झालेल्या कनिष्ठ स्तर राष्ट्रीय स्पर्धेत तीन रजत अशी, तिच्या या यशाची जंत्री भलीमोठी आहे.
त्यात अनेक लांब पल्ल्याच्या स्पर्धांमधले अनेक विक्रमही आहेत. अलीकडच्या सहा महिन्यांमध्ये कविताने हैदाबाद, बंगलोर, पुणे आणि मुंबई अशा विख्यात मॅरेथॉन स्पर्धा गाजवल्या आहेत. तीनवेळा आंतरराष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धांमध्येही तिने सहभाग नोंदवला आहे. मात्र, खर्चाची तोंडमिळवणी करताना तिची आणि विजेंदसिंग यांची नेहमीच धावपळ होताना दिसत होती. दोन वर्षांपूवीर् बंगलोरच्या भारतीय अॅथलिट प्रशिक्षण कँपमध्ये निवड झाल्यापासून कविताची ही अडचण दूर झाली आहे. त्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली पदचिन्हे उमटवण्याचा कविताचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवछत्रपती पुरस्काराने तिच्या घोडदौडीला बळ मिळेल हे नक्की.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4818260.cms

Cash rewards for Kavita Raut

Mumbai, Oct 9 – Two cash rewards were Saturday announced for Maharashtra lass Kavita Raut, who bagged an athletics bronze medal at the ongoing Commonwealth Games in New Delhi.
An elated Deputy Chief Minister Chhagan Bhujbal announced a reward of Rs.five lakh for Kavita, while Tribal Welfare Minister Babbanrao Pachpute followed suit with a reward of Rs.2.5 lakh for her.
‘She has done the state proud by her achievement and brought Maharashtra honour,’ Bhujbal told reporters here.
Kavita, 25, a tribal girl hails from Harsul village in Nashik, which is the home district of Bhujbal.
She became the first Indian woman to win an individual medal at a track event – 10,000 metres run – in the Commonwealth Games.
After her historic feat, she is now aiming for the gold medal in next month’s Asian Games scheduled in Guangzhou, China.
‘I will now aim for the gold in the Asian Games. I will also try to cut down on my timing,’ Kavita told mediapersons at the Jawaharlal Nehru Stadium in the Indian capital, soon after finishing third in the gruelling women’s 10,000 metres Friday.
Kavita, the current national record holder for 10 km road running, said she had expected a medal after the rigorous training in the lead-up to the Games.
‘I was 90 percent hopeful of a medal. So I am not surprised. We trained for six months at Ooty and also had a camp in Bangalore,’ she said.
Employed with public sector giant Oil & Natural Gas Corporation (ONGC), Kavita thanked her family and personal coach Vijender Singh for her success.
IANS

original at - http://www.indiatalkies.com/2010/10/cash-rewards-kavita-raut.html

Kavita Raut: A poor village girls journey to sporting glory

It has been an arduous journey for long distance runner Kavita Raut, a poor tribal girl from Maharashtra, who got into serious athletics nine years ago, and says she is thankful to her coach for having switched her to 10,000 metres that saw her winning a historic bronze medal in the Commonwealth Games.
Kavita started running 1500m and 3000m in 2001 and won her first national silver medal after 15 days of training.
“Then I realised I could do more. Later on I was approached by my personal coach (Vijender Singh) who saw my ability for 10,000 m and with his support I reached this level," said the 25-year old, who bagged countrys first-ever womens individual medal in track events here Friday.
In the last edition in Melbourne, the womens 4X400 metres relay team had won a silver while long jumper Anju Bobby George and discus thrower Seema Antil had won the silver and bronze.
Kavita finished with a timing of 33:05.28 minutes in front of some 30,000 spectators at the Jawaharlal Nehru Stadium in the gruelling 25-lap race behind Kenyans Kwamboka Momanyi and Chepkwemo Changeywo, who took the gold and silver.
"It has been nine years now. I come from the small village called Savpada in (Maharashtras) Nashik and did not have much means to start... The journey has been a bit difficult for me but it became easier after I won my first medal,” she told media persons here.
Asked about her family, Kavita said besides her parents, she has en elder brother, who now works in Mumbai Police, and a younger brother, who is preparing for the civil services examination.
“Now my parents, as also my brothers, are very proud of me,” said Kavita, participating in her first Games.
The Maharashtra government has also announced cash rewards for Kavita. An elated Deputy Chief Minister Chhagan Bhujbal announced a reward of Rs.5 lakh, while Tribal Welfare Minister Babbanrao Pachpute followed suit with a reward of Rs.2.5 lakh for her

http://www.prokerala.com/news/articles/a173586.html

Kavita Raut creates history for India in athletics at C'Wealth Games

Finally, some good news came for India from the track, when Kavita Raut brought India’s first medal in athletics by winning the bronze in the women’s 10,000m event. Kavita clocked 33:05.28 minutes to give the spectators a reason to cheer for India at the Jawaharlal Nehru Stadium here on Friday.
The gold and silver was won by Kenyans Kwamboka Momanyi (32:34.11s) and Chepkwemo Changeywo (32:36.97s).
Kavita got a good start and maintained the lead till the 4,000m mark, before India’s Preeja Sreedharan overtook. Later, the Indians lost the lead to Chepkwemo and then to Kwamboka, to finish third.
At the 8,000m mark, Kavita lost grip and was fourth, but then she pulled herself up to finish third. “I feel I could have run better than this. We have been working hard since last two years for this and I feel I didn’t run according to my preparation. But I am happy to win the medal for my country,” said Kavita, who hails from Nashik district.
“I will not say that it was a tough competition, as we were prepared for it. If I had performed according to my calibre, result would have been different,” she added.
India’s Prajusha Maliakkal missed out on the bronze in the women’s triple jump event after she jumped 13.72m to break Mayookha Mathalikunnel’s national record of 13.68m. She stood fourth after Jamaica’s Kaye Smith jumped 14.19m for gold and Trinidad’s Ayanna Alexander bagged silver by clearing 13.91m.
In the men’s 110m hurdles event, England made a clean sweep by winning all three medals. Andy Turner timed 13.38 sec to win the gold, while William Sharman (13.50 sec) and Lawrence Clarke (13.70 sec) won silver and bronze respectively. Olympic gold medallist Nancy Langat from Kenya created a new Games record finishing the 1,500m race in 4:05.26. She broke Kenya’s Jackline Maranga’s 12-year-old record of 4:05.27. New Zealand’s Nikki Hamblin clocked 4:05.97 and Stephanie Twell of Scotland 4:06.15 to win silver and bronze respectively.

http://www.dnaindia.com/sport/report_kavita-raut-creates-history-for-india-in-athletics-at-c-wealth-games_1449790

Kavita Raut: A poor village girl's journey to sporting glory

Sat, Oct 9 11:04 PM
New Delhi, Oct 9 (IANS) It has been an arduous journey for long distance runner Kavita Raut, a poor tribal girl from Maharashtra, who got into serious athletics nine years ago, and says she is thankful to her coach for having switched her to 10,000 metres that saw her winning a historic bronze medal in the Commonwealth Games.
Kavita started running 1500m and 3000m in 2001 and won her first national silver medal after 15 days of training.
'Then I realised I could do more. Later on I was approached by my personal coach (Vijender Singh) who saw my ability for 10,000 m and with his support I reached this level,' said the 25-year old, who bagged country's first-ever women's individual medal in track events here Friday.
In the last edition in Melbourne, the women's 4X400 metres relay team had won a silver while long jumper Anju Bobby George and discus thrower Seema Antil had won the silver and bronze.
Kavita finished with a timing of 33:05.28 minutes in front of some 30,000 spectators at the Jawaharlal Nehru Stadium in the gruelling 25-lap race behind Kenyans Kwamboka Momanyi and Chepkwemo Changeywo, who took the gold and silver.
'It has been nine years now. I come from the small village called Savpada in (Maharashtra's) Nashik and did not have much means to start... The journey has been a bit difficult for me but it became easier after I won my first medal,' she told media persons here.
Asked about her family, Kavita said besides her parents, she has en elder brother, who now works in Mumbai Police, and a younger brother, who is preparing for the civil services examination.
'Now my parents, as also my brothers, are very proud of me,' said Kavita, participating in her first Games.
The Maharashtra government has also announced cash rewards for Kavita. An elated Deputy Chief Minister Chhagan Bhujbal announced a reward of Rs.5 lakh, while Tribal Welfare Minister Babbanrao Pachpute followed suit with a reward of Rs.2.5 lakh for her

http://in.news.yahoo.com/43/20101009/377/tsp-kavita-raut-a-poor-village-girl-s-jo_1.html

Kavita Raut, Indian Runner, Registers First Ever Medal in Individual Track Event in CWG

Kavita Raut created a history in the chapter of Common Wealth Games 2010 for India. Kavita has become the 1st ever Indian Woman to win a medal in individual track event category in Common Wealth Games.
1 3Share0Email5ShareShe has won bronze medal for India today in women’s 10,000 meters event. She was quitehopeful of getting a medal in this event based on all the hard work she had done and her rigorous training.
Coming from a tribal family in Harsul near Nasik in Maharashtra, Kavita has proved that courage, will power and hard work can do any wonders. She is eyeing now on winning gold medal in Asian Games which are about to begin next month in Guangzhou, China.
She said she will work hard to improve on her timings which will certainly help her in fulfilling her dream. She was talking to the media persons at the Jawaharlal Nehru Stadium after getting her medal.
She got extensive training at Bangalore camp and at Ooty for six months. She thanked for all the cooperation she received from her family.
And a special thanks she announced for her coach Vijender Singh. She gave all the credif of her this success to her coach and family.
In the last Common Wealth Games held in Melbourne, Australia, India’s women team won silver in 4 x 100 meters relay race. Long jump player Anju bobby also won a silver for her feat there.
A Bronze medal was bagged by Seema Antil for getting third in women discuss throwing event.

http://www.commonwealthdelhi.com/?p=516

Kavita Raut: A journey against all odds


NEW DELHI: For Kavita Raut, the long and winding road from Savpada to New Delhi, via Nashik, has been paved with challenges and heartaches.
There was sweet reward at the end, though, as she won bronze in the 10,000m and gave Indian athletics a rare shot in the arm.
The journey began eight years ago, when this tribal girl ran barefoot in a national-level schools meet to win a silver medal. "I did not have a coach then, nor did I ever train," she recalled while chatting with TOI on Saturday. "I had only attended a 15-day camp that my school had conducted."
School was in Harsul, 14 kilometres from her village. She stayed in a hostel and would visit home during weekends. During those visits, she would often help her mother fetch water from the only well, about a kilometre away.
As fate would have it, SAI coach Vijender Singh happened to watch her race and was quite impressed with Kavita's grit. "He told me he wanted me to train under him," Kavita said. "I was quite apprehensive, but then I thought if with just a 15-day camp I could win silver, maybe proper training would fetch me much more."
While Kavita was convinced quite easily, her parents father, a forest guard, and mother were not. It took Vijender a lot more time to convince them. "Finally, they allowed me to accompany Vijender Sir to Nashik."
That was in 2002, and thus started Kavita's journey from a tribal hamlet tucked away deep inside Maharashtra, from where the means of transport were either the rickety jeeps to Harsul or the two daily buses to Nashik.
This journey would one day take this gritty sportswoman to a better life, a secure livelihood, and most importantly, give her a chance to win laurels for India.
"I knew I had to work hard if I had to make a name for myself in sport," she said. She was ready for that, and had her coach and family to support.
Read more: Kavita Raut: A journey against all odds - The Times of India

http://timesofindia.indiatimes.com/sports/commonwealth-games-2010/india-news/Kavita-Raut-A-journey-against-all-odds/articleshow/6721744.cms

CWG: Cash rewards for Kavita Raut

 
Mumbai, Oct 9: Two cash rewards were today announced for Maharashtra lass Kavita Raut, who bagged an athletics bronze medal at the ongoing Commonwealth Games in New Delhi.
An elated Deputy Chief Minister Chhagan Bhujbal announced a reward of Rs.five lakh for Kavita, while Tribal Welfare Minister Babbanrao Pachpute followed suit with a reward of Rs.2.5 lakh for her.
"She has done the state proud by her achievement and brought Maharashtra honour," Bhujbal told reporters here.
Kavita, 25, a tribal girl hails from Harsul village in Nashik, which is the home district of Bhujbal.
She became the first Indian woman to win an individual medal at a track event - 10,000 metres run - in the Commonwealth Games.
After her historic feat, she is now aiming for the gold medal in next month's Asian Games scheduled in Guangzhou, China.
"I will now aim for the gold in the Asian Games. I will also try to cut down on my timing," Kavita told mediapersons at the Jawaharlal Nehru Stadium in the Indian capital, soon after finishing third in the gruelling women's 10,000 metres on Friday.
Kavita, the current national record holder for 10 km road running, said she had expected a medal after the rigorous training in the lead-up to the Games.
"I was 90 percent hopeful of a medal. So I am not surprised. We trained for six months at Ooty and also had a camp in Bangalore," she said.
Employed with public sector giant Oil & Natural Gas Corporation (ONGC), Kavita thanked her family and personal coach Vijender Singh for her success. (IANS)

http://headlinesindia.mapsofindia.com/sports-news/commonwealth-games/cwg-cash-rewards-for-kavita-raut-65231.html

Kavita Raut becomes first Indian woman to win individual track medal

Kavita Raut on Friday became the first Indian woman to win an individual medal in track events of the Commonwealth Games as she bagged the bronze in 10,000m race at the Jawaharlal Nehru Stadium.
Raut clocked 33:05.28s to finish third in front of 20,000-odd crowd who cheered with a deafening sound all through her run.
Before her feat, the women’s 4X400m relay team had won a silver in track events fours ago in Melbourne.
Long jumper Anju Bobby George and discuss thrower Seema Antil had bagged a silver and a bronze each in the field events.
Incidentally, it is only the 10th medal for India in athletics in the Commonwealth Games history.

http://voteupindia.com/kavita-raut-becomes-first-indian-woman-to-win-individual-track-medal/

Kavita Raut shatters 10000m meet record

Maharshtra's Kavita Raut stunned National and Meet record holder Preeja Sreedharan (Railways) in the 10000m women's event to clinch the gold with a new record in the 50th National Open Athletic Championship in Kochi on Tuesday.
 In a close race, which saw the lead change quite often, Kavita forged ahead with 50 metres to go, held on to the lead and won with a time of 32:41.31 secs.
Preeja took the silver, timing 32:41.72 secs, while Lalita Babar of Railways got the bronze medal, clocking 35:13.76 secs.
The fallen record of 33:25.00 sec stood in the name of Preeja, who too had bettered her own mark.
"I was hoping to do well here. It was a close race and I am happy I could win. Preeja Didi is a good friend of mine," a jubilant Kavitha said.
An ONGC [ Get Quote ] employee, Kavitha said the weather conditions was were very good and she hoped to perform better in the forthcoming championships.
In men's 10000m race, S Raghunath of Police captured the gold medal with a time of 30:03.08 secs, while team-mate Ajay Kumar Patel settled for the silver at 30:07.60 secs.
Ajay Veer Singh of Railways got the bronze with 30:13.38 secs.
The 200m and 400m in men's and women's sections are among the other events scheduled for the evening.
Reigning overall champion Railways are virtually assured of the title, having collected 15 gold, 10 silver and 14 bronze medals, while Tamil Nadu is second with four gold, one silver and four bronze.

http://sports.rediff.com/report/2010/may/18/kavita-raut-shatters-10000m-meet-record.htm

I took to running as I can do it barefooted: Kavita Raut

New Delhi:  Born to a poor family in a non-descript village in Nashik district of Maharashtra, pursuing athletics was the only choice left for Kavita Raut.
And she does not regret her decision after becoming the first Indian woman to win an individual track medal in Commonwealth Games.
Raut bagged a bronze in women's 10,000m race on Friday by clocking 33:05.28 to give India its first athletics medal in Delhi Commonwealth Games.
Before Raut, the women's 4X400m relay team had won a silver in 2006 Games in Melbourne where long jumper Anju Bobby George and Seema Antil had also bagged a silver and a bronze respectively. Neelam Jaswant Singh had won a silver in discus throw in 2002 Manchester Games.
But Anju, Antil and Neelam's medals have come in field events.
25-year-old Raut from Sabpadda village in Nashik district says she chose running as it can be done barefooted and without spending any money.
"I am from a very poor family. I have an elder and younger brother. I wanted to pursue some sport but my family cannot afford. So I chose running as I can do it barefooted," says Raut.
Kavita, the only daughter in the family of five, says she has no regrets for choosing running and she now aims to win gold in Asian Games.
"I don't regret my decision, my target now is to win gold in Asian Games," she said.
Asked why she chose 10,000m, Raut said, "I am a small girl and my coach (at Nashik) Virender Singh tried me in 1,500m, 3,000m, 5,000m. Finally, he decided me to run in 10,000m. I also run in half marathons."
"It was in 2002, I started my active running career and my village folk supported me a lot and they encouraged me a lot whenever I won in national events. I then got scholarship for three years from a company and things got better for training," she explains.
Raut says backing from the people of her village has been a pillar of strength for her.
"Whenever I return home after winning national events they will come out in large numbers. My coach pasted papers at my village informing the people that I am going to run in Commonwealth Games. The support of people from my village has been my strength," she says.
"I would like to thank my parents for allowing do what I wanted. Then my coach at my village and coaches at the national camps including Nikolai sir I want to thank them for what I have achieved," she says.

http://www.ndtv.com/article/commonwealth%20games/i-took-to-running-as-i-can-do-it-barefooted-kavita-raut-58687

http://en.wikipedia.org/wiki/Kavita_Raut

For source of information, please visit -

Note -
1. This mail is to share success story
2. The above information are referred by reference
3. AYUSH opinions may not match in all case with individual opinions
4. You can check old mails sent to our group at - http://groups.google.com/group/adiyuva/topics 
5. to know details about our policies, please visit disclaimer at right bottom side of AYUSH home page
6. If you want to share your/friends success story please write us [name, address, educational baground, business/career, story, success criteria, etc]
7. You can share your stories , send us at ay...@adiyuva.in

8. You can submit the AYUSHonline membership form at www.join.adiyuva.in

   

image013.jpg
image014.jpg
image015.jpg
image016.jpg
image017.jpg
image018.jpg
image001.jpg
image002.jpg
image003.jpg

AYUSH activities

unread,
Oct 15, 2014, 10:39:20 AM10/15/14
to adi...@googlegroups.com, adik...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

दिल्ली में आयोजित खिलाड़ी सम्मान समारोह में आदिवासी अंतर्राष्ट्रीय हॉकी खिलाडियों के साथ क्रम से लिलिमा मिंज, दीप ग्रेस एक्का, डी. के. चौहान, सुनीता लकड़ा, नमिता टोप्पो और बिरेन्द्र लकड़ा

दिल्ली में आयोजित खिलाड़ी सम्मान समारोह में आदिवासी अंतर्राष्ट्रीय हॉकी खिलाडियों के साथ क्रम से लिलिमा मिंज, दीप ग्रेस एक्का, डी. के. चौहान, सुनीता लकड़ा, नमिता टोप्पो और बिरेन्द्र लकड़ा

<span lang=HI style='font-size:12.0pt;font-family:"Mangal",

...

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 19, 2015, 10:12:55 AM4/19/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in, adik...@googlegroups.com

...

Sandip Marbhal

unread,
Apr 19, 2015, 2:18:45 PM4/19/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in, adik...@googlegroups.com
Dear Mr Raj,

Very encouraging and proud feeling.

Just keep it up and wishing you all the best. Thank you

Regards

Sandeep

--
सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी बेरोजगार मेळावा" (30/04/2015 सकाळी 10.30 वाजता) स्थळ पालघर.
संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in
(share with your friends)
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/93be452a-fb8c-4771-99ef-a7beb279a58f%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--

Best Regards,

Sandeep Marbhal
9820754505
Reply all
Reply to author
Forward
0 new messages