Fwd: Aadiwasi boys & girls hostel photo

59 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Sep 20, 2014, 7:59:11 AM9/20/14
to AYUSH google group
FYI

AYUSHonline team

---------- Forwarded message ----------
From: Ravindra Talpe <ravi...@gmail.com>
Date: 2014-09-19 16:28 GMT+05:30
Subject: Fwd: Aadiwasi boys & girls hostel photo
To: AYUSH Adivasi Yuva Shakti <AY...@adiyuva.in>

वाचा आणि विचार करा

आदिवासींच्या हक्कासाठी लढणे गुन्हा आहे का ?
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणा-या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

आदिवासी विद्यार्थ्यांची शारिरिक, मानसिक व आर्थिक छळवणूक करणा-या वणी, नाशिक येथील गृहपालांवर कारवाई करा, अशी मागणी करणा-या आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व गृहपाल यांनी संगनमताने गुन्हे दाखल केले आहेत. 

१२ सप्टेंबर रोजी वणी, नाशिक येथील शासकीय आदिवासी वसतीगृहात ९७ विद्यार्थी राहतात. विद्यार्थ्यांनी नाशिक येथील आदिवासी संघटनांच्या पदाधिका-यांना वसतीगृहातील त्रुटी व गैरसोयीबाबत निवेदन दिले होते. १४ सप्टेंबर रोजी पदाधिका-यांनी वसतीगृहाला भेट दिली होती. यावेळी येथील विद्यार्थ्यांनी वसतीगृहात अपुरा विद्युत पुरवठा होतो. ब-याच रुममधील स्लॅबचे प्लास्टर पडलेले आहे. पिण्याचे पाणी अशुध्द मिळते, निर्वाह भत्ता मिळत नाही. गणवेशाचे पैसे मिळाले नाहीत, तसेच तक्रार केल्यास संबंधितांकडुन दमबाजी केली जाते, अशा प्रकारच्या तक्रारींचे निवेदन पदाधिका-यांना दिले होते. पाठोपाठ या पदाधिका-यांनी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली. या वसतीगृहात ८२ विद्यार्थींनी राहतात. या विद्यार्थीनींनीदेखील असुविधांविषयी निवेदन दिले असून, यात प्रवेशाच्या वेळी प्रत्येकी २०० ते ५०० रुपये घेतले जातात. स्वयंपाक गृहातील कामे करुन घेतली जातात. वैयक्तिक कामे (उदा. पापड) करुन घेतली जातात. पिण्याच्या पाण्याचा अ‍ॅक्वागार्ड नादुरुस्त आहे. निर्वाह भत्ता वेळेवर मिळत नाही. अशा प्रकारच्या समस्यांचे निवेदन दिले. 

यावेळी तमाम आदिवासींचे दैवत असलेल्या बिरसाचा फोटो अधिक्षकांनी कार्यालयात न लावता आडगळीच्या खोलीत टाकून दिल्याचेही निदर्सनास आले होते. या अनुषंगाने आदिवासी वसतीगृहातील समस्यांबाबत आदिवासी संघटनांनी वसतीगृह अधिक्षकांना निलंबीत करण्याची लेखी मागणी आदिवासी विकास विभागाच्या सह आयुक्तांकडे केली होती. गृहपालांना पाठीशी घालणा-या सहआयुक्त सं. द गोलाईत व प्रकल्प अधिकारी नरेंद्र आघाव यांना कारवाई का केली नाही असा जाब विचारला होता. मात्र याचा राग धरुन एकीकडे गृहपालांच्या बदलीचा फार्स उरकण्यात आला तर दुसरीकडे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी व विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी लढणा-या नाशिकच्या सर्वश्री अशोक बागुल, गिरीष गावीत, प्रभाकर फसळे यासारख्या समाजाप्रती वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांवर गृहपालांकरवी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील सर्व वसतीगृहातील विद्यार्थी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. कोणताही राजकीय स्वार्थ नसलेल्या या कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत राजकीय नेते मात्र मुग गिळूण गप्प आहेत. म्हणून आता विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी लढणा-या कार्यकर्त्यांना बळ द्यावे, अन्यथा समाजासाठी लढणे बंद करण्याचा निर्णय प्रामाणिक कार्यकर्त्यांना घ्यावा लागेल ही कळकळीची विनंती.

Uposhan kartana photo.jpg
IMG-20140915-WA0003.jpg
IMG_20140913_222212033.jpg
IMG_20140914_142152409.jpg
IMG_20140914_144511585.jpg
IMG_20140914_144641504.jpg
IMG_20140914_144825420.jpg
IMG_20140914_144835690_HDR.jpg
IMG_20140914_144846376.jpg
_20140917_082729 (1).JPG
IMG_20140914_153211623.jpg
IMG-20140914-WA0015.jpg
IMG-20140914-WA0016.jpg
IMG-20140914-WA0017.jpg
IMG-20140914-WA0018.jpg
IMG-20140914-WA0019.jpg
IMG-20140914-WA0020.jpg
IMG-20140914-WA0021.jpg

चेतन Chetan

unread,
Sep 21, 2014, 10:01:32 AM9/21/14
to adi...@googlegroups.com
चला या मुजोर अधिकाऱ्यांची गुर्मी उतरवायची वेळ आली आहे . धनगर आरक्षणा विरोधात एकवटलेल्या आदिवासींची ताकद यांना कळली नाही वाटते

--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuOMQvupiFZ%2BP3StvKuZYjFtH5M%2BPN4Az6pNXNT-YNxSw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

sachin kokani

unread,
Sep 21, 2014, 12:14:09 PM9/21/14
to adi...@googlegroups.com

Arre he tr pratek aashram shalet as hot...

चेतन Chetan

unread,
Sep 24, 2014, 2:56:02 AM9/24/14
to adi...@googlegroups.com
मग ते सहन करण्यात आनंद मानायचा का?

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Ravindra Talpe

unread,
Sep 24, 2014, 6:44:27 AM9/24/14
to adi...@googlegroups.com
आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार
खोट्या गुन्ह्यांना विद्यार्थ्यांचे ख-या गुन्हयाने प्रत्युत्तर

आदिवासींच्या हक्कासाठी लढणे हा गुन्हा असेल तर आदिवासी कार्यकर्ते हा गुन्हा आता  वारंवार करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी लढणा-या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांनीच पाठबळ द्यावे ही कळकळीची विनंती शुक्रवारी केली व शनिवारी सकाळीच नाशिक गाठले. शनिवारी नाशिक शहरात एकाच दिवशी आदिवासी विद्यार्थी व संघटनांनी तीन ठिकाणी किल्ला लढविला व कोणत्याही राजकीय नेत्याच्या नेतृत्वाच्या मदतीशिवाय आदिवासी अस्मितेची ताकद दाखवून दिली. 

संघटना व विद्यार्थ्यांचा एक गट संघटनांच्या पदाधिका-यांच्या जामीनासाठी धावपळ व सर्व मोर्चेबांधणी करीत होता. तर दुस-या गटाने सकाळी ११ ते ९ या वेळेत शेकडो विद्यार्थ्यांसह आचारसंहिता व जमावबंदीच्या आदेशांना भीक न घालता वणी येथे दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या अन्यायाबाबत खरे गुन्हे नोंदविण्यासाठी दिवसभर बैठकच मारली. तसेच जोपर्यंत आमचे गुन्हे दाखल करुन घेत नाही तोपर्यंत पाणीदेखील घेणार नाही असा निर्धार मुला-मुलींना पोलीसांपुढे मांडला. विद्यार्थ्यांचा आक्रमकपणा पाहून पोलिस प्रशासनाला अखेर अधिक्षकांवर सायंकाळी ८ वाजता अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हे दाखल करणे भाग पडले.  तर विद्यार्थी व संघटनांच्या पदाधिका-यांचा तिसरा गट सकाळी ११ ते ६ या वेळेत शैक्षणिक वर्षाचे ४ महिने संपत आलेले असतानाही आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश न देणा-या आदिवासी विकास विभागाच्या विरोधात आदिवासी विकास भवन येथे आंदोलन करीत होता. त्या आंदोलनाची परिणती म्हणून नाशिक येथील आदिवासी वसतीगृहात ३०० जागा नव्याने मंजूर करुन सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय तात्काळ आदिवासी विकास विभागाने घेतला व तसे लेखी आदेश हातात घेतल्यावर आम्ही हे आंदोलन संपविले. 

मात्र एकट्या पुण्यातील ४ हजार दुर्बल, गरीब आदिवासी विद्यार्थी आजही प्रतिक्षा यादीत आहेत. त्यांचा वाली कोण? हजारो विद्यार्थ्यांच्या एक वर्षाच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण??? नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांनी संघर्ष केला आणि ३०० जागा पदरात पाडून घेतल्या. पुण्यातील विद्यार्थी काय करणार हा प्रश्नच आहे.
-- 
Thanks & Regards,
Ravindra U Talpe
==============================
Cell: 98227 65531
==============================

आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळेना

पुणे : शाळा-महाविद्यालये सुरू होऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. परंतु, तरीही पुणे शहर व परिसरातील महाविद्यालयात विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अद्याप वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. तसेच, विद्यार्थ्यांनासाठी भाडेतत्त्वावरील इमारती मिळविण्यातही आदिवासी विभागाला अपयश येत आहे. त्यामुळे सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पुणे शहरात शिक्षणासाठी येणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विभागाने आठ इमारती भाडेतत्त्वावर घेऊन वसतिगृह सुरू केले आहे. यात एकूण क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागत आहे. परिणामी वसतिगृहातील सोयी- सुविधांवर ताण येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना दाटीवाटीमध्ये व अपुर्‍या सुविधांसह राहावे लागत आहे. त्यातही पुण्यात आलेल्या सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाने वसतिगृहात प्रवेश दिला आहे. परंतु, अजूनही चार हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र आदिवासी संघटना फेड्रेशनचे अध्यक्ष रवींद्र तळपे म्हणाले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणार्‍या वसतिगृहामध्ये र्मयादित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. परंतु, हजारो विद्यार्थी वसतिगृह मिळण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे उपलब्ध वसतिगृहातच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा किंवा आदिवासी विभागाने भाडेतत्त्वावर इमारती घ्याव्यात, अन्यथा हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड म्हणाले, पुणे शहर व परिसरात आदिवासी विभागातर्फे आठ वसतिगृह आहेत. ही संख्या कमी असल्याने प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागत आहेत. एक हजार प्रवेशक्षमता असलेल्या वसतिगृहात बाराशे विद्यार्थ्यांंना प्रवेश दिला आहे. तसेच, १00 क्षमता असलेल्या वसतिगृहात १२0 मुलांना प्रवेश दिलेला आहे. भाडेतत्त्वावरील इमारती शोधल्या तरी त्यांची देखरेख ठेवण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतो. परंतु, केशवनगर येथे एक नवीन इमारत भाडेतत्त्वावर घेतली असून लवकरच या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना स्थलांतरीत केले जाणार आहे.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
Thanks & Regards,
Ravindra U Talpe
==============================
Cell: 98227 65531
==============================
SAKAL_21_9_2014_PG5.JPG
LOKMAT_20_9_2014_PG3.jpg
Nasik Hostel order.JPG

Harshad Jadhav

unread,
Sep 24, 2014, 6:44:36 AM9/24/14
to adi...@googlegroups.com

हिच परिस्थिती pune aakashvani st boys hostel चि सुद्धा आहे

SACHiNe SATVi

unread,
Sep 24, 2014, 6:46:10 AM9/24/14
to adi...@googlegroups.com
Nashik chya Vidhyarthyana aani karyakartyana Salam! 
chala hich prerana ghevun purn maharashtra bhar adivasi vidyarthyavar honarya annyayala vacha foduya... Lets do it together!
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages