Jagatik Mahila Din @ Palghar

10 views
Skip to first unread message

Adivasi Ekta Parishad

unread,
Mar 2, 2015, 1:06:16 PM3/2/15
to Adivasi Yuva Shakti

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 9, 2015, 10:44:07 AM3/9/15
to adi...@googlegroups.com


पालघर जिल्ह्यात महिला दिन उपक्रमांनी साजरा

मनोर पोलीस ठाण्यात महिला दिन

सर्व पोलीस ठाण्यात होत्या महिला पोलीस प्रभारी

महिला पोलिसांनी चालवला पोलीस ठाण्याचा कारभार :रॅली, मेळावे, सोहळे यांचेही आयोजन

तलासरी : तलासरीत आज महिला दिनानिमित्त तलासरी पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांनी सांभाळला. दररोज नित्यक्रम, वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करण्याची सवय असलेल्या महिला पोलीसांना आज कामाचा वेगळा अनुभव मिळाला. तलासरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसांनी तलासरी स्टेशनचा कार्यभार सांभाळून, सकाळी पोलिसांची हजेरी, ड्यूटी वाटप, बंदोबस्त, गोपनीय, कारकून कक्ष आज महिला पोलिसांनी सांभाळला.
यावेळी पोलिस निरिक्षक धनश्याम आढाव यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच महिला दिनानिमित्त तलासरी पोलीस स्टेशनमध्ये महिलांची विशेष सभा आयोजिण्यात आली होती.
महिला रक्षणासाठी तत्पर - हक 
महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पोलिस तत्पर असल्याचे प्रतिपादन पोलिस अधिक्षक हक यांनी डहाणू पोलिस ठाण्यात मार्गदर्शन करताना केले. यावेळी डहाणूचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे, पोलिस निरिक्षक उत्तम सोनवणे अँड.संयुक्ता तामोरे, महिला दक्षता समितीच्या सुप्रिया फाटक, दक्षा सोडावाला यासह डहाणूतील महिला व पोलिस उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या तक्रारी आणि समुपदेशनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी यावेळी पोलीस ठाण्यात महिला कक्षाची स्थापना केली. मनोर पोलीस ठाण्यात महिला दिन ■ जागतिक महिला दिनानिमित्त महिला दक्षता कमिटी व पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मनोर येथे महिलांची सभा आयोजित करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी केलेल्या कार्याविषयी सहा. पो. मारूती पाटील यांनी मार्गदर्शन केले या वेळी जि.प. सदस्य नीता पाटील, पं.स. सदस्य o्रद्धा घरत, आरती धापशी तसेच विद्यार्थीनी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.
■ पाटील यांनी चंद्रपूर जिल्हयातील पारोमिता गोस्वामी, नोबेल पारितोषिक विजेती मलाला यांचे कार्य व महिला अत्याचार कायद्याविषयी माहिती दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त करण्यात स्त्री शक्तीविषयी महिलांनी आपले संरक्षण स्वत: करायचे याबाबत आपले मत व्यक्त केले. पालघर : पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार ज्या पोलीस स्थानकामध्ये महिला अधिकारी आहेत अशा सर्व पोलीस स्थानकाचा चार्ज आज महिला दिनाचे औचित्य साधत महिला अधिकारी कर्मचार्‍याकडे सोपविण्याच्या सूचना सर्व पोलीस स्थानकांना देण्यात आले आहेत. पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे, पो.नि. निलेश माईनकर यांनी महिला दक्षता कमिटी व प्रतिष्ठित महिलांची मिटींग घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन केले. सर्व पोलीस ठाण्यात होत्या महिला पोलीस प्रभारी जव्हारमध्ये बचत गटाची स्थापना
जव्हार ग्रामीण : महाराट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान(उमेद) तालुका व्यवस्थापन कक्ष जव्हार यांच्या सहकार्याने पंचायत समिती गण कोरतड या जव्हार तालुक्यातील आदिवासी भागातील गरीब, गरजू, विधवा, परीत्यक्ता, महिलांचे बचत गट स्थापून जागतिक महिला दिन साजरा झाला. आदिवासी महिलांमध्ये सक्षमीकरण. आरोग्य जागृती, गरिबी, या सारख्या समस्या खूपच आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे संघटन होणे फार महत्वाचे आहे. यासाठी महिलांना ८ मार्च जागतिक दिन का साजरा केला जातो. महिलांचे कायदे महिला अधिकार. महिला सक्षमीकरण या विषयी मार्गदर्शन माधुरी मुकणे, प्रतिभा भोये यांनी केले. तसेच दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक जव्हार यांच्या वतीने आर्थिक साक्षरता व बँकेच्या कर्ज योजना या विषयी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्र माला या भागातील १५ स्वयं साहायता गटातील ९0 महिला उपस्थित होत्या या वेळी हळदी कुंकुचा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्र माच्या अध्यक्ष अनुराधा डोके यांनी महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार. या विषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी माधुरी मुकणे पी. बी. हरड तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन, दशरथ दांगटे, मनोज कामडी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.






On Monday, March 2, 2015 at 11:36:16 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad wrote:

Adivasi Ekta Parishad

unread,
Mar 10, 2015, 9:59:45 AM3/10/15
to Adivasi Yuva Shakti

आदिवासी एकता परिषद-पालघर जिल्हा,महिला दिनी पालघर जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी त्वरित लागु करावी म्हणुन महिलांचे सरकारला "बाटल्यांचा आहेर" देण्याचे आंदोलन !!


आदिवासी एकता परिषद -पालघर जिल्हा, महिला आघाडीतर्फे महिला दिन रॅली ...!! आदिवासी क्षेत्रात संविधानाने लागु केलेली "संपूर्ण दारुबंदी" जाहिर व्हावी म्हणुन भव्य रॅली ! 





--
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/88b40541-1a9f-4ccc-a959-00e17b04155e%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--

Adivasi Ekta Parishad

unread,
Mar 12, 2015, 12:07:20 PM3/12/15
to Adivasi Yuva Shakti
Reply all
Reply to author
Forward
0 new messages