डहाणूत निषेध : शासनाच्या धोरणाविरोधात वनपट्टय़ाची होळी

5 views
Skip to first unread message

AYUSH activities

unread,
Oct 2, 2013, 7:27:29 AM10/2/13
to adi...@googlegroups.com


कष्टकरींचा वन विभागावर मोर्चा

डहाणूत निषेध : शासनाच्या धोरणाविरोधात वनपट्टय़ाची होळी

डहाणू : स्वातंत्र्याची ६५ वष्रे उलटूनही शासनाचा वनविभाग ब्रिटिशांनी वसाहत असल्याप्रमाणे आदिवासींवर अन्याय भावनेने धोरण राबवत आहे. आदिवासींना सामाजिक हक्क आणि वनाचे जतन करण्यासाठी कायदा लागू करूनही जमिनीवर आदिवासींचे हक्क मान्य केलेले नाहीत. आदिवासींना अप्रत्यक्षरीत्या वनहक्क कायदा नाकारत असल्याच्या निषेधार्थ डहाणूत मंगळवारी सकाळी हजारो आदिवासींचे नेतृत्व करीत कष्टकरी संघटनेचा विराट मोर्चा उपवनसंरक्षक डहाणू यांच्या कार्यालयावर धडकला. 
सागरनाका येथे शासनाने दिलेल्या वनपट्टय़ाची सामूहिक होळी करून शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष सीराज बलसारा, ब्रायन लोबो, पीटर प्रभू आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. 
गडचिरोलीत जवळपास साडेतीन लाख हेक्टर वनजमिनींवर सामूहिक हक्क मान्य केलेला असताना ठाणे जिल्हय़ास वनविभाग सावत्रपणाची वागणूक देत आहे. 
वनकायदा हा शासनाचा खोटारडेपणा आहे. वनखात्याकडून वनहक्क कायद्यातील आदिवासींच्या हक्कासंबंधीच्या तरतुदींची हेतूपुरस्सर आणि जाणीवपूर्वक पायमल्ली चालवली आहे. त्याचा जाहीर भाषणातून निषेध व्यक्त केला. यावेळी मोर्चात डहाणू, तलासरी, पालघर तालुक्यातील हजारो आदिवासी वनपट्टेधारक सहभागी झाले होते. (वार्ताहर) वनहक्क कायद्याविरोधातील मोर्चात आदिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


News : 



Reply all
Reply to author
Forward
0 new messages