हरसूल च्या विद्रोहानंतर राजकीय चमकुगिरी ....
टीचभर पोटाची खळगी आणि पोऱ्हां सोरांच्या भविष्याची चिंता म्हणून हरसूल परिसरातील आदिवासी समाज आपल्या मातीपासून पिंपळगाव, निफाड , येवला , नाशिक , सिन्नर , दिंडोरी ,मालेगाव आदी विकसनशील तालुक्यांच्या मातीत राबराब राबतोय ... भात आवणी संपली कि भात कापणीला परतणारा आणि भात कापणी संपली कि राब पेटवायला परतणारा आदिवासी समाज वर्षातले १० महिने असतो कुठे याचा अभ्यास केला तर त्यांचे राहण्याचे ठिकाण रस्ता ,नाका , हेच आहेत जिथे जागा मोकळी दिसेल तिथे आपला संसार थाटायचा आणि रोजंदारीसाठी कुणी न्यायला येतेय का याची वाट बघत बसायचे . रोजगारासाठी कुणी सेठ सावकार न्यायला आलाच तर गुरा ढोरांचा लिलाव करून न्यावा तसा आमचा लिलाव करून नेतात आणि १५० ते १७५ रुपयात १२ तास ढोरागत राबवतात लेकीबाळीकडे कुणी कुत्र्यागत पाहतय तर बाया बापड्यांना कुणी भुकेल्या लांडग्यांच्या नजरेने नेहाळतय अश्यातही जीव मुठीत धरून रोजचं जगणं आणि जगून सुद्धा रोज थोडं थोडं मरण ...आमच्या व्यथा आमची परिस्थिती सरकारदरबारी माहित व्हावी , आमची बाजू कुणीतरी मांडावी म्हणून आम्ही आमच्याच लोकांना आमदार खासदार केलंय पण आता ते कुठं आमचे राहिलेत साहेब झालेत ते ... गाडीच्या काचा लावून मधूनच हात दाखवीत टाटा करून निघून जात्यात आणि त्यांच्या पोटाचा वाढता “ घेर ” पाहून सरकार आमचा विकास ठरवितंय . नाशिक पासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी भागाची हि व्यथा , हरसूल हि सर्वात जुनी बाजारपेठ मात्र येथे व्यापारी तेली ,मारवाडी , वाणी आणि मुसलमान , एरव्ही या परिसराकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते मात्र मागील आठवड्याभरापासून हरसुलची ओळख देश पातळीवर गेली , कुणी आदिवासी विरुद्ध मुसलमान दंगल म्हटले , कुणी हिंदू मुसलमान दंगल म्हटले , ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने रंग देण्याचा प्रयत्न केला .... अश्या घटनांची वाट पाहणारी राजकीय मंडळी आणि या घटनांचा आधार घेत आपली चमकुगिरी दाखवणारे दिडशहाण्या लोकांनी मात्र मोठी गर्दी केली राज्यातून ,देशातून हरसुलकडे येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढला . पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे येथे दंगल झाली मात्र त्यावर नियंत्रण देखील त्यांनीच केले मग नेत्यांचे काम काय होते येथे येण्याचे . जो तो स्वताची लाल करायला येत होता ... हरसूल गावात मी फिरलो ...स्थानिक लोक सुद्धा बाहेर दिसत नव्हते मग नेत्यांच्या मागे फिरणारी गर्दी कुठली ..? हे सर्व कार्यकर्ते देखील बाहेरून आणत होते . प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी रोजंदारीने काम करणार्या लोकांसारखे वापरले जात होते ...! येव्हडे नेते ,पुढारी , येऊन गेले ...! काय फायदा झाला हरसूल चा किंवा येथील आदिवासींचा ..... एरव्ही आदिवासी भागात कधीही कधीही न फिरणाऱ्या नेत्यांना एव्हडा पुळका आला का हर्सुलचा . या दंगलीमधून अर्थ काय काढला ...? जातीय दंगल ...? आदिवासी मुसलमान दंगल ...? हिंदू मुसलमान दंगल ...? आरे मुर्खानो ज्या भागाची मालकीच आदिवासींची आहे तिथे कशी जातीय दंगल होणार , जरा ईतिहासाची पाने चाळा ...ऐतिहासिक वास्तुसंग्राह्लय चाळा ... मग तुम्हाला समजेल आदिवासींनी आजपर्यंत कधीही दंगल केली नाही , एका वेळच्या जेवणाची चिंता आम्हाला वेळ कुठे आहे दंगली करायला ...आदिवासी संस्कृतीने , परिस्थितीने आदिवासी माणसाला दंगली करायला नाहि शिकवले , ईतिहास आहे साक्षीला आज पर्यंत आदिवासी माणसांनी विद्रोह केलाय , व्यवस्थेच्या विरोधात , अन्यायाच्या विरोधात , अत्याच्याराच्या विरोधात , राघोजीचा ईतिहास वाचा... , बिरसाचा ईतिहास ज्या पुस्तकात लिहिलाय त्या पुस्तकाची पाने चाळा.. , तंट्याचा ईतिहास अभ्यासा ...! आपल्या हक्कासाठी दिलेली आरोळी हि दंगल कशी असू शकेल ...! हरसूल परिसरात झालेली हि दंगल नव्हती हा देखील एक विद्रोहच होता ...! अन्यायाच्या विरोधात ...अत्याच्याराच्या विरोधात ...! व्यवस्थेच्या विरोधात ...! पण राजकीय लोकांनी स्वार्थासाठी आणि येथील पोलीस प्रशासनाने स्वताचे पाप लपवायला याला धार्मिक रंग देऊन जातीची पेटलेली मशाल आदिवासींच्या हातात दिली . ज्याच्या त्याच्या परीने ज्यांनी त्यांनी अर्थ लावला आणि मूळ मुद्दा दडवण्याचा प्रयत्न केला ...! आदिवासी समाज वनात राहणारा आहे पण तो वनवासी नाही ..! तो या मातीचा मूळ मालक आहे ....! राजकीय लोकांनी त्यांची चमकुगिरी थांबवावी ......! आणि या विद्रोहाला कुणीही जात धर्म असा मुलामा देऊन दंगलीच्या नावावर विकायला काढू नये हीच विनंती ...!
विजयकुमार घोटे
०९६२३७०१७०९
Watch Dipak patel profile fb. Apalya aadivasi samajala shivya dilya ahet
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7c583858-1163-4598-a635-665ad75db4fe%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Ata dhangarancha mudda punha chalu zala kai karaych ....apan
--
Dipak Patel vr cyber crime under case nodva......9 August jagtik aadivasi perisad harsual peth yethe aadivasi Ekta perished chi mothi rally gheun program jhala pahije
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJ36add9KPkYC2F2AnVjSCHG_tUBYD094EH5%2B5q17D-aeZijNg%40mail.gmail.com.