"युवा सत्याग्रहींचे प्रशिक्षण सत्र" - 26/4/2015 (9.30am ~ 1.30pm) @ PABV Kasa School

5 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 23, 2015, 7:05:16 AM4/23/15
to adi...@googlegroups.com
"युवा सत्याग्रहींचे प्रशिक्षण सत्र"
 100% स्थानिक आदिवासी नोकर भरती विषयक 9/6/2014 व 5/3/2015च्या राज्यपालांच्या GRची तातडीने काटेकोर अंमलबजावणी होऊन स्थानिक आदिवासी बेरोजगारांना नोक-या व रोजगार मिळावा,परजिल्ह्यातील व बिगर आदिवासींची छुप्या पद्धतिने होणारी नोकरभरती त्वरित थांबवुन त्या नोक-या बेरोजगारांना मिळाव्या म्हणुन सर्व स्थानिक आदिवासी बेरोजगार गुरुवार,दि.30/4/2015 रोजी पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ऐतिहासिक  'बेमुदत ठिय्या आंदोलना'साठी बसणार आहेत. हे आंदोलन ऐतिहासिक असुन बेरोजगारी,गरीबी व अन्याय यांपासुन स्वातंत्र्यासाठी जणु दुस-या स्वातंत्र्यलढ्यासारखे आंदोलन आहे  ! त्यामुळे नोक-या मिळवुन इतिहास घडवायचा असेल तर अनेक दिवस चालणारा कठिण लढा दिल्याशिवाय पर्याय नाहीं  !
 
नोकरी मिळण्यासाठी लागणारे ज्ञान मिळवण्यासाठी आम्हि शाळा-कॅालेजात 10-15 वर्ष मन लावुन अभ्यास केला,आता प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी काही दिवस , काही आठवडे तरी नक्कीच लढा द्यावा लागणार आहे ! यासाठी मानसिकता निर्माण व्हावी,मनाने व तनाने तयारी व्हावी !
लढ्याच्या मार्गातील खाच-खळगे समजावे व ते पार करण्याच्या युक्ता व क्लुप्त्या अनुभवी व्यक्ति कडुन समजुन घेण्यासाठी,कायदेशीर गोष्टिचा विचार विनिमय करण्यासाठी रविवार,दि.26/4/2015 रोजी कासा येथील आचार्य भिसे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 9:30-1:30 पर्यंत सर्व युवा सत्याग्रहींचे प्रशिक्षण व सशक्तिकरण सत्र आयोजित केले आहे तरी सर्व युवा वर्गाने व पालकांनी सत्रास हजर राहुन बेरोजगारी व अन्याय विरुद्ध चा हा लढा अधिक भक्कम करावा !!
 
मैसेज सर्व ग्रुपला Forward करा ! आदिवासी,आएप !!
www.fb.com/aep.mh | www.jago.adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages