वयक्तिक अनुभव : आपल्यासाठी कोण? (सांस्कृतिक)
आज प्रत्येक पंथ, विचार सरणी, धर्म त्यांच्या विचार सरणीचा प्रचार आणि प्रसार यासाठी नियोजित कार्य पद्धती चे अवलंब करते. प्रामाणिक पणे त्यांच्या ध्येय उद्दिष्टसांठी मेहनत घेत आणि ते चालू ठेवण्यासाठी माणसे तयार करीत आहेत. आदिवासी संस्कारा मुळॆ बऱ्यापैकी आपण अजून प्रामाणिकपणा टिकवून आहोत, भले कोणतीही विचार सरणी असूदेत आपल्यात मदत केलेल्यांची साथ सोडत नाही. प्रामाणिक पणे त्यांच्या साठी मेहनत करतो वेळ प्रसंगी तन मन धन वाहून देतो. ज्यांनी ज्यांनी आपल्यानं हात दिला त्यांना आपण आपले सगळेच दिले.
म्हणून तर आरोग्य सेवा देणाऱ्या ख्रिश्चनांना आसरा देऊन गावा गावात चर्च उभारले, शिक्षण देणाऱ्या संघ परिवारात हजारो स्वयंसेवक तयार केले, पांढर पेश्यांची वस्ती वाढून मंदिरे उभारली, ताईत बांधून दर्ग्यात गेलो, अगदी पंजाबी, पांढरपेशी पंथ आणले गावात त्यांची प्रार्थना स्थळे उभारली, कोण कोणते कागदावरचे/धातूचे/प्लास्टर ऑफ पॅरिस चे देव घरात आणून देव्हारे उभारले. सत्संग बैठक मिसा चर्च दर्गा मंदिर च्या फेऱ्या करू लागलो. यो बाबा तो बाबा ला पुजू लागलो. तेल लावले केक खाल्ले पाणी पिले. केलेंडर पाहून उपवास केले. देव दर्शनाला जाऊ लागलो वर्गणी दक्षिणा देऊन पोरांच्या गळ्यात दोरे बंधू लागलो, पुस्तके, गाणी त्यांच्या टोप्या घालू लागलो. असो प्रत्येकाची आवड निवड
पण वाईट याचे वाटते कि आपण पिढ्या न पिढ्या जतन केलेल आपले बांधावरचे, झाडाखालचे देव, गाव देव, कुटुंब देव आणि वर्षानुवर्षे साजरे केले जाणारे पारंपरिक सण, परंपरा तसेच काम हाच देव आणि पूजा, हि संस्कृती आज आपण विसरत जातो आहोत. प्रचंड वेगाने आपल्या आदिवासी समाजा बद्दल ची आत्मीयता, आपल्या संस्कृती आणि सण उत्सवाबद्दल आपुलकी कमी होताना दिसतेय. पारंपरिक ज्ञान जुन्या मांसासोबतच संपत आहे आपल्यातले आदिवासीत्व च संपत चालल्याचे जाणवतेय. इतरांचे आदर्श सेवक बनता बनता आपली आदिवासी संस्कृती आपल्यातून संपत जाते आहे
जग आदिवासी जीवन मूल्य आणि संस्कृती ला आदर्श मानते आणि प्रत्येक्षात आदिवासी समाज मात्र इतरांच्या आयात केलेल्या गोष्टी मिरवण्यात धन्यता मानतोय आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी कामगारासारखा राबतोय याचे वाईट वाटतेय.
कोण आपली संस्कृती जतन करणार ? आपल्या नव्या पिढीला परंपरांची ओळख कोण देणार ?
फ्लेगझिबल आणि मोस्ट प्रॅक्टिकल म्हणून ओळख असलेली आपली संस्कृती जतन करण्यासाठी हि सध्याच्या परिस्थितीत काळानुरूप अनुसरून आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्य महत्वाची भूमिका पार पडतील.
आदिवासी विचार आणि संस्कार देणारी व्यवस्था मजबूत करण्यासाठी आपली पारंपरिक सांस्कृतिक रचना टिकविणे आणि विविध माध्यमातून आदिवासी सांस्कृतिक मूल्य या विषयी जागरूकता करण्यासाठी आधुनिक तंत्र्यज्ञान सोबत प्रयत्न करूया. आहात ना सोबत ?
(काही चुकेल होवा त संभालूंन घिजास)