--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvV9zK7n21XoOe1817Wm0haH-ehesfC82%2Bu01bEr6w3ng%40mail.gmail.com.
नाशिक येथे जागतीक आदिवासी गौरव दिन श्रावण सरींच्या बरसातीत उत्साहाने बहरला.....
"पद आणि सत्ता यांच्या माध्यामातून आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविले पाहिजेत. आदिवासी संस्कृती हि मानसिक व भौतिक अशा दोन्हीही अविश्कारांनी संपन्न आहे. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय, राजकीय व संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. आदिवासी समाजाला गुणवत्तेसाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल.त्यासाठी येणारा १००% खर्च राज्यसरकार करेल. मला आदिवासी संस्कृतीचे कौतुक करतो कारण या संस्कृतीमध्ये भोगवादी संस्कृतीला थारा नाही" असे उदगार राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित पवार यांनी जागतीक आदिवासी गौरव दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आदिवासी सांस्कृतिक परिषदेच्या अंतर्गत नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
याप्रसंगी मा.श्री.मधुकरराव पिचड, मा.श्री.विजयकुमार गावित, मा.श्री.समीर भूजबळ, श्री.रवींद्र जाधव, श्री.उल्हास पाटील, जयंत जाधव, संभाजी सरकुंडे, जयश्री पवार व राज्यभारातून आलेले हजारो मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात "हैप्पी वेलकम...सबको शुभकामना" या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुमधुर गीतगायनाने झाली. त्यानंतर राजूर, ता.अकोले येथील इयत्ता १२ वी ची विद्यार्थिनी सोनाली साबळे हिने 'ऐ मेरे इतन के लोगो' हे गीत सादर करून सर्वांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त श्री संभाजी सरकुंडे साहेब यांनी केले. यात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाने हा जागतिक आदिवासी दिन साजरा का करण्यास सुरुवात केली याची माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.अजित पवार हे होते.
आपल्या मनोगतात मा.श्री.हरिश्चंद्र चव्हाण यांनी मागण्यांची एक मोठी यादीच मान्यवरांसमोर सादर केळी. यात आदिवासी सेवक पुरस्कार हा ९ ऑगष्टला दिला जावा, राज्यात आदिवासी तरुणांसाठी क्रीडाप्रबोधिनी उभारली जावी, दि.११/११/२०११ च्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, दि.१८/०५/२०१३ रोजी बोगस आदिवासींसंबंधित जो निर्णय आहे आहे त्यास यापुढे स्टे न देता काटेकोर अंमलबजावणी केली जावी, कुपोषणाच्या प्रश्नावर ठोस पावले उचलावीत, आश्रमशाळा जेवणाचे टेंडर आदिवासी बचतगटांना देण्यात यावे अशा अनेक मागण्या त्यांनी सादर केल्या.
मा.श्री.समीर भूजबळ यांनी पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी इगतपुरी येथे मंजूर झाल्याची माहिती दिली. तसेच आदिवासी कला जोपासण्यासाठी इगतपुरी येथे ट्रेनिंग सेंटर मंजूर झाल्याची माहिती दिली.
श्रीमती जयश्री पवार यांनी आदिवासींच्या प्रामाणिकपणाचे जाहीर कौतुक केले. तसेच आदिवासी जीवनमान सुधारण्यासाठी मुलभूत सुविधांकडे लक्ष्य देण्याची गरज व्यक्त केली. शेती विकासासाठी प्रयत्न होण्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले. कुमारी मातांमुळे कुपोषण अधिक आहे म्हणून त्याविषयी जाणीव जागृती होणे अपेक्षित आहे. तसेच घरकुलाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी केली.
मा.श्री.विजयकुमार गावित यांनी न्याय मिळविण्यासाठी आदिवासी समाजाने संघटीत होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.सरकारी निर्णयांची अंमलबजावणी होण्यासाठी संघटनाची गरज आहे.
आदिवासी विकास मंत्री मा.श्री. मधुकरराव पिचड साहेब यांनी आदिवासी समाजात हुंडा घेण्याची पध्दत नाही, आदिवासी समाजाची स्वताची बोलीभाषा आहे, रीतीरिवाज, कला, संगीत आहे म्हणून आदिवासी संस्कृती महान असल्याचे मत व्यक्त केले. कालचा-आजचा-उद्याचा आदिवासी यांचे चित्र त्यांनी आपल्या शब्दांद्वारे उभे केले. उद्याच्या आदिवासीला पुढे नेण्यासाठी शिक्षण घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.....आणि शेवटी "एक तीर एक कमान...सर्व आदिवासी एक समान" असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
कार्यक्रमातून काय साध्य झाले यावर कदाचित अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, संघटना, पत्रकार, लेखक, कवी आदींचे वेगवेगळे मत असेल परंतु मला एकाच म्हणावेसे वाटते चला कुठे तरी आता आदिवासी बोलता झाला आहे...आता तो स्वताच्या विचारांनी चालण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला प्रगतीच्या प्रवाहाबरोबर धावता करण्यासाठी अशा व्यापक कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आदिवासींसाठी कुठेतरी सकारात्मक पावले पडत आहेत.
पालघरमध्ये आदिवासी सन्मान दिवस उत्साहात | |
पालघर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण आमसभेत पारित केलेल्या ठरावाप्रमाणे ९ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व खेड्यापाड्यात तसेच डोंगरदर्यात राहत असलेल्या आदिवासी समूहापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याने हजारो संख्येने आज आदिवासी बांधवांनी आपली एकजुट दाखविली. यावेळी पालघर स्टेशन ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली आयोजित करून पालघर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आदिवासी संस्कृतीवर होणारे आक्रमण व मुख्य प्रवाहाच्या नावाखाली त्यांचे केले जाणारे सामिलीकरणामुळे आदिवासी संस्कृतीच धोक्यात आली आहे. निसर्गाशी त्यांचे वंशपरंपरेने चालत आलेले नाते संपुष्टात येत असून जागतिकीकरण व बाजारीकरणामुळे नैसर्गिक संपदा ओरबाडून नष्ट करून विकासाच्या नावाखाली आदिवासी समुहाचे बळी जात आहेत. मोठमोठी धरणे, खदाणी, खाणी, राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यामुळे आतापर्यंत सर्वांत मोठय़ा प्रमाणात आदिवासी समुहाचे विस्थापन करण्यात आले आहे. याचे दुष्परिणाम आदिवासी समुहाच्या संस्कृतीवर, शिक्षणावर पडत आहे. नैसर्गिक संपदेची वारेमाप लुट राजरोसपणे सर्वत्र चालू आहे. भोगवादी संस्कृतीमुळे ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम संपूर्ण जगालाच धोक्यात आणू पहात असून उत्तराखंडमध्ये झालेला प्रलय हे निसर्गावर झालेल्या आक्रमणाचे खरे उदाहरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भूमीसेना आदिवासी एकता परिषद आयोजित आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री राजेंद्र गावीत, जिल्हाध्यक्ष दत्ता करबट, निमंत्रक, काळुराम धोरडे, सुरेश हांडवा, तालुकाध्यक्ष अशोक ठाकरे, सचिव रामचंद्र सांबरे इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी आद्यक्रांतीकारक बिरसा मुंडा यांचे स्मरण करून मशाल प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी काळुराम धोदडे यांचा सत्कार करताना राज्यमंत्री म्हणाले की आदिवासी समाजातील संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजला असून शासनाच्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक योजना असून त्या योजनांचा लाभ माझ्या आदिवासी बांधवांनी घ्यावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.(वार्ताहर) - मोठमोठी धरणे, खदाणी, खाणी, राष्ट्रीय महामार्गा, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यामुळे आतापर्यंत सर्वांत मोठय़ा प्रमाणात आदिवासी समूहाचे विस्थापन करण्यात आले आहे. - आदिवासी समूहाच्या संस्कृतीवर शिक्षणावर परिणाम होत आहे. नैसर्गिक संपदेची वारेमाप लुट राजरोसपणे सर्वत्र चालू आहे. ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम संपूर्ण जगालाच धोक्यात आणू पहात असून नुकत्याच झालेल्या घटना हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगण्यात आले. |
Hello Friends!
Hope you are doing well. Similar to previous year this year also we are planning to celebrate Indigenous day with difference.
Please suggest some innovative proposals for same.
(Note : Specially to involve those who are not able to join physically event at Village or prefixed location)
Expecting exciting ideas.
Thanks & regards
AYUSHonline team
(marathi)
Johar Mitranno!
Gelya varshi pramane Apan hya varshi pan vaishishtpurn pane adivasi din sajara karanyache tharavale aahe.
Vividh thikani veg vegale karyakram ghyave ya sathi apalya suchana apexit aahet.
(Note : mukhyataha je ayojit karyakramat sahabhagi hovu shakat nahi tya sathi)
Apalya pratikriyanchya pratixet.
Abhari
AYUSHonline team