HAPPY DIWALI
अरे म्हणता म्हणता आली पण नाय का … ! एका मित्राने मेल पाठवला "HAPPY DIWALI" आणी लक्षात आले अरे हो आजपासून दिवाळी नाही का … ?तुमची आमची सर्वांची आवडती दिवाळी ! बाहेर जल्लोष चालू आहे … फटाके ,आरास ,फराळाचा घमघमाट । नी दिव्यांचा लखलखाट ! । पण माझे पण मात्र अंधारातच बुडालेय .. विचारांच्या गर्तेत त्या लाखो दिव्यांचा प्रकाश पण मला अंधुकच वाटला . मी एकदम मागे म्हणजे माझ्या बालपणात गेलो .
घरी सगळी मंडळी जमलीत…बेरया पूजन चालू आहे …. . आजोबा कुलदैवताला मातीच्या कोड्यात तेल भरून दिवे लावताहेत ,सर्वजण शेंदराच टीळा लावून वाकून कपाळ टेकवून कुलदेवासमोर नतमस्तक होत आहे … आई ,आज्जी ह्या सर्व जणी स्वयपाकघरात व्यस्त …अरे बापरे ! काय तो घरच्या चवळीचा नि पानमोडीचा घमघमाट …आम्हा पोरांची आतुरता कि कधी हे सर्व ताटात पडेल … गावात सर्वच जणू दिवाळीमय झालेले कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही,सर्व गावकरी एकमेकांना "चवल खाल के नीही " असे विचारात एकमेकांच्या आनंदात सहभागी होत आहेत …. चार दिवसांच्या दिवाळीत घरगडी पांडू पण राजा, नि घरमालक पण राजाच!कारण सर्वांच्याकडेच दिवाळी आलेली असते …!
आज पहिले तर ते "खळे "बेरया पूजनाची आतुरतेने वाट पाहतेय ,चकली लाडवांच्या सुगंधात चवळीचा
सुगंध मिसळून MORDEN झालाय ,लाखो दिवे ,अगदी दारापासून ते अंगणात पर्यत आहेत, पण त्या दिव्यांच्या प्रकाशातही शेजारच्या पांडूच्या घरचा अंधार दिसत नाही आम्हाला !आजोबांची मातीची 'कोडी' तर माळ्यावर धूळ खात पडलीत … आणी आमचे काही बंधू "आमची दिवाळी अजून दूर आहे …… " असे म्हणून आपली हतबलता व्यक्त करताहेत , आपल्या मुलांची समजूत काढताहेत ….
फटाक्यांच्या आवाजाने भानावर आलो …. खरेच बालपणीची दिवाळी किती उल्हासमय होती . ना फटाके न फुलबाज्या … दिवे तेही मातीचे, आजच्यासारखे विजेवर चालणारे DISIGHNER दिवे नाहीत ,पण खरेच त्या दिव्यांनी घरचा अंधकार दूर व्हायचा ,आजच्यासारखे फराळाचे खूप सारे मेनू नसायचे,पण घरची सर्व मंडळी मात्र एकत्र यायची. जसा एका ताटात गोड फराळ ठेवावा, तसी हि सर्व मंडळी गोडीगुलाबीने एकत्र यायची !
आज आपण मोठे झालो उच्च शिक्षण ,उच्च पद … म्हणून दिवाळीही मोठीच,मोठे फटाके मोठी आरास ! खूप खरेदी !… आणी करायलाही हवे ,दिवाळी आहे । पण जरासा विचार त्या घरगडी "पांडूच्या" मुलांचा पण केला तर …
जेव्हा आपली मुले फटाके फोडत असतात, तेव्हा त्या फटाक्यांच्या नुसत्या आवाजाने खूष होणारी हि मुले,यांची इच्छा नसेल होत फटके फोडायची …? आपली मुले नवीन कपडे घालून मिठायीचा आनंद घेत असतात ,तेव्हा हीच मुले एका रुपयाच्या नाण्यासाठी आयी वडीलांकडे रडून रडून सुकत असतात … थोडा विचार करा ,खरेच आपली दिवाळी HAPPY आहे …? पूर्वी सारखे घरगडी आणी घरमालक दिवाळीत राजा आहेत ….?नाही . आपण सधन आहोत, तर या आपल्या जातबांधवांना पण आपल्या आनंदात सामील करून घ्या . मोठमोठ्या आरास करण्याएवजी त्यातील काही हिस्सा या पोरांना खावू साठी दिला तर हि पोरे पण म्हणतील हैप्पी दिवाळी !
एक मैल पाठवून WISH करण्यापेक्षा रोजच थोडा वेळ समाजासाठी दिला तर येणाऱ्या दिवाळीत सर्वच खुश दिसतील नाही का …? फटक्यांनी धूर विकत घेण्यापेक्षा तेच पैसे समाजाला उपयोगात आणता आले तर खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल .
जग MODERN होत असताना आपण मागे का राहावे, हेही खरे असले तरी स्वतःच्या सामाजिक परंपरा व चालीरीतींना घेवून पुढे चालले तर आजोबांचे 'खळे' आणी माळ्यावर पडलेली 'कोडी' यांनाही आपल्या दिवाळीत सामावून घेता येईल.
उत्सव, सण हे सर्वांसाठी आहेत, मग जर ऐन दिवाळीत आपल्या जातबांधव अंधारात झोपत असेल तर आपल्या घरच्या लाखो दिव्यातला एक दिवा त्याच्या दारी नेवून लावला तर …। खरेच असे होईल …? मला खात्री आहे नक्की होईल ,आपण करू .
आणी हो एक सांगायचे राहिलेच कि , तुम्हा सर्वांना HAPPY DIWALI