|| आयुश मिनी बुलेटिन ४ मार्च २०१८ ||

5 views
Skip to first unread message

AYUSH adivasi yuva shakti

unread,
Mar 8, 2018, 10:12:26 AM3/8/18
to AYUSH | adivasi yuva shakti
|| आयुश मिनी बुलेटिन ४ मार्च २०१८ || 

आज सकाली मुंबय ला गेलुतुं. म्होटे सायबासीं मिटिंग होती. आपले लोखाना काम मिलवाया काही आयडियावर गोठी केल्या. काहीं तरी सुरु कराया लागलूच हलू हलू, भलता वखत झालाहे. आपले पोरांना हाताला काम नीही ना मंगा व्याट मरगाला लागत. बीजी लोखा हजारो किलो मीटर वरसी येन मिलल त्या काम करीत मेहनत करीत, पयस कमवीत ना एकी करून रेहेत आपल्याना बिहवित हो कव्हां कव्हां. आपले कोठं कमी पडत होवूं? काहीं गवसलावां तं सांगजास. 

१) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक : 
आज आदिवासी विकास विभागाच्या उप सचिव आणि व्यवसाय कन्सल्टंट यांच्यासोबत सुमारे ४ तास "पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मिती" (खास करून वारली चित्रकला आणि आदिवासी पर्यटन) या साठी सोशियल इंटरेप्रेनरशिप मोडेल तयार करण्यावर चर्चा झाली. आदिवासी समाजात असलेले पारंपरिक ज्ञान आणि कला सोबत उद्योजग क्षेत्रातले प्रोफेशनॅलिज्म यांचा मिलाप करून नक्कीच एक चांगले मॉडेल उभे राहू शकते. या संदर्भात कलाकार आणि तज्ज्ञ एकत्रित येऊन सदर उपक्रम मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या विषयवार सविस्तर चर्चा करून योग्य दिशा ठरविण्यात येईल.  या चर्चेत आयुश तर्फे सचिन दा सातवी आणि चेतन दा गुराडा सहभागी झाले होते. 

२) रशियन दर्शकांना वारली चित्र शिकवणी : 
३ मार्च रोजी रशिया हुन एक जोडपे डहाणू ला आले होते त्यांना संजय दा पऱ्हाड यांनी वारली चित्रकला ची शिकवणी / डेमो दिले. ते पुन्हा त्यांच्या पूर्ण टीम सोबत भेट देणार आहेत  

३) स्वीडन हुन आदिवासी संस्कृती अभ्यासक : 
स्वीडन हुन एक अभ्यासक भारतीय आदिवासी संस्कृती जाणून घेण्यासाठी आला होता, त्यांना संदिप दा भोईर यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले. 


पारंपरिक ज्ञान आणि आदिवासी कलाकृती यात अनंत पोटेन्शियल आहे ज्यातून सांस्कृतिक ओळख जतन करण्यासोबत रोजगार निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन मजबूत करू शकतो. त्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. 

आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे. आपण पण आपल्या परिसरात आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊन अधिक प्रभावीकरूया. 
Lets do it together!

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages