काल माझे बाबा आश्रम शाळेतून सेवा निवृत्त झाले… (देहरे तालुका जव्हार, मुरबाड तालुका डहाणू, उधवा तालुका तलासरी, नानिवली तालुका पालघर, चळनि, कांदर वाडी, आणि शेवटी सूर्यानगर तालुका डहाणू) …. उधव्याची आश्रम शाळा सुरवात करण्याची जबाबदारी त्यांनी १९८९ रोजी घेतली. मी या शाळेतल्या पहिल्या ब्याच मध्ये होतो येथे १ते ४ चे शिक्षण याच शाळेत झाले. मला बाबा, कुरकुटे गुरुजी, काटेला बाई, वनगा गुरुजी हे शिक्षक होते ….
थोडक्यात माझे शालेय अनुभव येथे येणाऱ्या दिवसात शेअर करीन…
दोन शब्दात माझे अनुभव, अक्षरशः गोठ्यात चालू केलेल्या उधवा शाळेत आम्ही पावसाळ्यात वर्गात पण छत्री घेवून बसत असू आणि सुरवातीची काही वर्ष तर पाणी आणि वीज पण नव्हती. पण शाळेत दिले जाणारे शिक्षण अगदी मुल्यावण होते, आमचा पाया अगदी मजबूत होत होता, आज इंजिनियर बनलो… गेल्या वर्षी याच उधवा शाळेत गेलो होतो. खूप चांगल्या इमारती आहेत, शाळे भोवताली कुंपण आहे, शाळेत संगणक आहेत. पण सगळे शिक्षक देशावरून आलेले आहेत त्यांना येथील स्थानीक भाषे विषयी, समाजा विषयी, संस्कृती विषयी आपुलकी नाही. विद्यार्थ्यांशी बोलल्यावर लक्षात आले शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक जागरुकते विषयी तर बोंब त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अंधकारमय आहे … कसे काय होणार आपल्या पुढील पिढीचे कुणास ठावूक….