१0 दिवसांत दुकाने खाली करण्याचे आदेश | ||||||
कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी व कासा बाजारपेठेतील रस्त्यालगत दुकानदारांना वनविभागाने नोटिसा बजावल्या आहेत. ही दुकाने वनजमिनीवर उभारल्याने ती दहा दिवसांत स्वखर्चाने खाली करावी, असे नोटिसांमध्ये नमूद केल्याने कासा, चारोटी बाजारपेठेतील दुकानदार धास्तावले आहेत. --------------------------
|
जव्हारमध्ये आधारला नाही आधार | ||
नागरिक हैराण : तालुक्यासाठी दोनच केंद्रे | ||
जव्हार : जव्हार तालुक्यात आधार योजनेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. आधार कार्ड काढण्यासाठी आधार केंद्र हे शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालयांमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय शासनाकडून माहिती तंत्रज्ञान विभागाने २0 मार्च २0१३ रोजी परिपत्रकाव्दारे घेण्यात आला आहे. मात्र जव्हारमध्ये परिस्थिती जैसे थे, प्रथम जव्हारमध्ये आधार नोंदणी थेट जांभूळविहिर येथे एका केंद्रात सुरू होती. त्यानंतर जव्हार पोलीस स्टेशनच्या मागील साई मंदिराच्या पहिल्या माळय़ावर सुरू आहे. जव्हार तालुक्याकरिता फक्त दोनच आधार केंद्र असल्यामुळे नागरिकांना तासन्तास लांबलांब रांगा करून भरपावसात उभे रहावे लागत आहे. |