|| वारली चित्रकला उमक्रम माहिती ३१ मे २०१८ ||
जिव्या बा म्हसे नां श्रद्धांजली आणि मानाचा जोहार, आदिवासी कला संस्कृती प्रसाराचे कार्य अविरत सुरु ठेवूया.
१) आंतराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग :
एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ हँडीक्राफ्ट (EPCH) तर्फे मलेशिया, कोलालंपूर येथे होणाऱ्या १६व्या जागतिक भारतीय महोत्सवात (९ ते १७ जून पर्यंत) आयुश तर्फे संजय दा पऱ्हाड व जयवंत दा सोमन सहभाग होत आहेत. या वेळेस वेगळ्या वेगळ्या कलाकारांनी कलाकृती जमा केलेले अंदाजे ११०० प्रोडक्ट्स प्रदर्शनात नेतो आहोत.
आयुश EPCH चे सभासद आहे आणि कलाकारांना चांगली संधी असल्याने आपण आदिवासी विकास विभागाला संपर्क करून सहभागासाठी विनंती केली होती. त्या नुसार महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांचे इत्तर प्रोडक्ट्स महा ट्राईब्स या उपक्रमा अंतर्गत या प्रदर्शनात नेली जात आहेत. या साठी आदिवासी विकास विभागाचे आर्थिक सहकार्य केले जाते आहे.
विदेशी प्रदर्शनाचा पहिलाच अनुभव असल्याने सध्या कस्टम क्लिअरन्स आणि इत्तर तयारी सुरु आहे. *६ जून रोजी प्रवास सुरु करत आहेत. प्रदर्शनासाठी आणि प्रवासासाठी शुभेच्छा* !
*२) फॅशन टेक्नॉलॉजी च्या अभ्यासकांची भेट*
नॅशनल फॅशन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील १२ विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक १ आठवड्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी ५ जून रोजी येत आहेत. कलाकारांचा सर्वे आणि पारंपरिक डिझाईन ची थीम अभ्यासण्यासाठी त्यांचा महाविद्यालयीन अभ्यास प्रकल्प आहे. संदिप दा भोईर आणि कल्पेश दा वावरे त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
*३) वारली चित्रकलेचे डुडल डिजाईन*
पुणे येथील एक कंपनी नि त्यांच्यासाठी डुडल डिझाईन करण्यासाठी संपर्क केला आहे. सध्या रिक्वायरमेंट्स वर चर्चा सुरु आहे.
*४) बेंगलोर येथे भिंतीवर चित्र काढणे*
बंगलोर येथील घरात लहान मुलांच्या खोलीत भिंतीवर चित्र काढण्यासाठी विचारणा झाली आहे.
*५) नैसर्गिक प्रोडक्स्ट च्या बॉक्स वर डिझाईन*
काही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन प्रोडक्स्ट च्या बॉक्स वर वारली पेन्टिंग ची थीम डिझाईन करण्यासाठी विचारणा आली आहे. थीम वर डिस्कशन सुरु आहे.
*६) एक कल्पक प्रकल्पात सहभाग*
सी एम फेलोज मार्फत एका कंपनीशी संपर्क करून देण्यात आला आहे. फ्लोटिंग कॅनवास नावाची कंपनी आहे. चित्र आणि कलाकृती या पोर्टल वर भाड्याने उपलब्ध करून देण्यात येतात. कलाकारांना एक चांगली संधी आहे. आपण लवकरच त्यांना चाचणीसाठी सॅम्पल्स पाठवतो आहोत.
*७) माहितीसाठी इत्तर घडामोडी*
मधुकर दा वाडु यांना फ्रान्स येथील ब्रिटनी इन्स्टिटयूट ऑफ ह्यूमन स्टडीज तर्फे मेगॅलिथिक प्रथा आणि संस्कृतीचे संशोधन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यांचे फ्रेंच भाषेतले पुस्तक ट्रॅडीशन ऑफ दि वारली या पुस्तकाचे प्रकाशन या दौऱ्या दरम्यान होणार आहे. त्यांच्यासोबत रमेश दा काटेला जात आहेत.
----------------------------------------
जास्तीत जास्त कलाकारांनी जोडून, एकत्रित प्रयत्न मजबूत करूया. रोजगार निर्मितीतून युवकांत सकारात्मकता पसरवण्यासाठी प्रयत्न करूया. सध्या हे क्षेत्र एक करियर साठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून एक पर्याय मजबूत करूया.
आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे. आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया. Lets do it together!
आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in