।। आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम ।।

15 views
Skip to first unread message
Assigned to adi...@gmail.com by me

AYUSH main

unread,
Nov 20, 2017, 12:28:10 PM11/20/17
to adi...@googlegroups.com

।। आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम ।।

 

आयुश गेट टुगेदर या वेळेस कलाकार एकत्रीकरण हा विषय घेऊन आयोजित करीत आहोत. संपर्कात असलेल्या सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी व्हावे. आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल अशी खात्री आहे.

 

उद्देश : कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि त्यातून आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी एक प्रयत्न.

 

ठिकाण : (बैठकीचे ठिकाण लवकरच कळवले जाईल),

        कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर

दिनांक : १ डिसेंबर, शुक्रवार (सकाळी १० ते संध्याकाळी ५)

अपेक्षित सहभागी

१) आदिवासी कलाकार (चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे, शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)

२) पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि बौद्धिक संपदा या बद्दल आवड असलेले

३) सदर विषयाला धरून सकारात्मक मार्गदर्शन/अनुभव सांगणारे, नवीन शिकणायसाठी उत्सुक असलेले

चर्चेचे विषय:

- कलाकारांना सध्याची आव्हाने/अडचणी/कमतरता त्यांचे मूळ आणि यावर उपाय योजना (तात्पुरता आणि कायमस्वरूपी)

- एकत्रीकरणाची गरज, पद्धती, उपक्रम कसे असावेत आणि त्यात कलाकारांची भूमिका

- आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी लागणारी तयारी

- बौद्धिक संपदा कायदा, शहरात परस्पर बिगर आदिवासींकडून होणारा आदिवासी कलांचा व्यवसाय आणि त्यावर उपाय

- अपेक्षपार्ह (कपडे, अस्वच्छ भिंती इत्यादी वर आदिवासी देवतांची) केले जाणारे चित्रीकरण यावर आपली भूमिका

- नेदरलँड येथील कंपनीने नोंदविलेले वारली डिझाईन चे ट्रेडमार्क आणि त्या संबधी आयुश चा बौद्धिक संपदा कायदा अंतर्गत कायदेशीर लढा

- भविष्यात अशा प्रकारची येणारी अशी दृश्य अदृश्य आव्हाने आणि त्यासाठी आपली तयारी

सहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावीwww.gtogether.adiyuva.in (आपल्या परिचयाचे कुणी येत असल्यास त्यांच्या वतीने फॉर्म भरावा)

सूचना -

ज्या कलाकारांना हँडीक्राफ्ट (हस्तशिल्प विकास आयुक्तालय) खात्याचे ओळखपत्र बनवायचे असल्यास २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला आणि एक नमुना कलाकृती आणावी, सदर कार्यालयात एकत्रित अर्ज सादर करण्यात येतील

 

आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे

आयुश । आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | ay...@adiyuva.in | 0 9246 361 249

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Nov 23, 2017, 1:53:11 PM11/23/17
to AYUSH | adivasi yuva shakti

ओढं दिस झालंहात, निसतं आयुश आयुश मेसेज येत. नांगु बरं एकदा मिलून येव सगल्याना.

*१ तारखंला सकाली १० वाजता कास्याचे सालत* आयुश चे बयठकीला जायाचू आहू. तू हो इजोस मिलूं.

आझूक माहिती पाहजत होवी त होत्यावर जायजोस हाव www.gtogether.adiyuva.in


AYUSH main

unread,
Dec 4, 2017, 1:06:13 PM12/4/17
to adi...@googlegroups.com

आयुश तर्फे आदिवासी कलाकार एकत्रीकरण बैठक संपन्न 

पारंपारिक ज्ञानातून रोजगार निर्मिती आणि अर्थीक स्वावलंबनाचे पर्याय 
उत्पादकता दर्जा, स्पर्धात्मकता, सामाजिक उद्यामिता विकास मोडेल साठी चर्चा 

१ डिसेंबर २०१७, कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर : स्थानिक रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्वावलंबन मजबुतीकरण उद्देशाने, विविध पैलूंवर चर्चा करण्याच्या हेतूने आदिवासी कलाकार एकत्रीकरण बैठक आज कासा येथे आयोजित करण्यात आली होती. आदिवासी कलाकृती उत्पादकता दर्जा विकास आणि उद्योजगता विकासाचे पैलूवर चर्चा आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड, पालघर तालुक्यातून अंदाजे ३० कलाकार, तज्ञ, आदिवासी समाज हित चिंतक व आयुश चे पदाधिकारी सहभागी झाले होते. कलाकारांचे अनुभव आणि विविध समस्या यांवर उपाय तसेच सोशियल इंटरप्रेनरशीप मोडेल तयार करण्यासाठी *पुढील दिशा ठरविण्यासाठी सविस्तर चर्चासत्र २८ जानेवारी २०१८ कासा येथे आयोजित करण्यात येणार आहे*. सगळ्या कलाकारांनी या चर्चा सत्रात सहभागी होवून हा सामाजिक उपक्रम मजबूत करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
नेदरल्यांड येथील कंपनीने वारली चित्र असलेली कलाकृती ट्रेडमार्क म्हणून नोंद केली आहे त्या विरुद्ध आदिवासी युवा सेवा संघ तर्फे सदर कार्यालयात आक्षेप नोंदविला आहे. 

जयवंत सोमण (कलाकार आणि उद्योजक) विविध कलागुण विकसित करून स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी चित्रकारांनी आपला ब्रांड विकसित करावा. मूल्यवर्धित सेवा आणि संबधित कार्यकुशलता या कडे कलाकारांनी विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. 

रमेश माळी (उद्योजाग विकास प्रशिक्षक) - उद्योजगता विकासासाठी बिझनेस मोडेल सविस्तर समजावून सांगितले. कलेला फ्रेम मध्ये बंधिस्त करण्यापेक्षा तिला अनंत ठेवा. 

डॉ. सुनिल पऱ्हाड (सचिव, आदिवासी युवा सेवा संघ) - सामाजिक जबाबदारी ठेवून स्पर्धेत लागणारे गुण शिकण्याची तयारी ठेवावी. आपले आदिवासीत्व टिकवून विविध माध्यमातून आपले स्वावलंबन टीकवुया. 

सचिन सातवी (अध्यक्ष, आदिवासी युवा सेवा संघ) - स्पर्धात्मकता आणि कौशल्य विकास तसेच सामाजिक दृष्टीकोनातून सांघिक भावना मजबूत करू आणि सांस्कृतिक मूल्य जतन करूया. 

आदिवासी युवा शक्ती (आयुश) ची सुरवात १९९९ पासून अनौपचारिक पद्धतीने झाली. २००७ पासून वेग वेगळे कार्यक्रम आणि २०११ साली आदिवासी युवा सेवा संघ म्हणून संस्था नोंदणी झाली, आणि विविध माध्यमातून आदिवासी सशक्तीकरनाचे उपक्रम राबवते आहे. वारली चित्रकलेचे बौधिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये नोंदणी २०१४ साली केली आहे.

 

Pics at : https://www.facebook.com/pg/adiyuva1/photos/?tab=album&album_id=1468167259903530

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/485dde23-1231-451e-a104-cc9bee9b697b%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

चेतन Chetan

unread,
Dec 5, 2017, 4:08:46 AM12/5/17
to adi...@googlegroups.com
आदिवासी वारली चित्र लिपी कि अपनी एक पहचान है इसका उगम भिम्बैठ्का मध्यप्रदेश कि गुफा मे पाये गये भित्ती चित्रो मे धुंडा जा सकता है,
हम वारली इन चित्रो मे आपने पूर्वज निसर्ग देवता को चित्रित क्र पुजते है तथा इन चित्रो को धार्मिक स्स्कृतिक अधिष्ठान है. इन चित्रो को स्त्रियो ने निर्माण किया उसे देवलोप किया तथा उसे आज तक स्म्भाल कर पिढी दर पिढी फुचाने का महत्वपूर्ण कार्य किया है . यह कला साधारण १० हजार वर्ष पुराणी है .
पिछ्ले कई सालो से इस चित्रलिपी को चित्रकारी का एक नमुना के तूर पर प्रसिद्धी दि गयी और उसका मनमानी तौर से सिर्फ पैसा कमाने के लिये तथा यह कला खतम हो जायेगी यह डर पैदा कर उसका मुल स्वरूप उद्देश भाव संस्कृतिक महत्व दबा कर रखा तथा आधुनिकीक्र्ण के नाम पर कई जगह विडम्बन भी किया गया है.
हमे इन सभी चीजो को ध्यान राख्क्र सही उद्देश तथा जीम्मेदारीसे आगे बढना चाहिये

Inline images 1
हमारे धार्मिक देव देवता चौक कि ऐसी विडंबना
​ सराह्नीय है क्या ?​


जोहार जिंदाबाद



To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages