तर ज्वालामुखी जागा होईल

3 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Nov 24, 2018, 11:22:53 AM11/24/18
to AYUSH | adivasi yuva shakti
तर ज्वालामुखी जागा होईल

नुकताच पालघर मध्ये भूकंप होऊन गेला त्याची तीव्रता 3.4 अशी होती, भूकंप का होतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं भुगर्रभ विज्ञान समजून  घेतलं पाहिजे. 

हजारो वर्षांपूर्वी पश्चिमघाटाची  निर्मिती अग्नीजन्य खडका पासून झाली पृथ्वी तुन बाहेर आलेला लावा थंड होऊन त्याच रूपांतर basalt खडकात झाले तेच आजचे डोंगर. हे डोंगर आजही आपल्या खाली तो लावा दाबुन उभे आहेत. सतत नवनवीन उद्योग,बांधकाम, रस्ते इत्यादी बनवत राहिल्या मुळे सिमेंट, दगड इत्यादी वस्तू लागतात. परिणामी हे मोठं मोठे डोंगर टेकडया पोखरुन त्यांचा रस्ते आणि इतर इन्फ्रास्ट्रकचर बनवले जाते. त्या मुळे डोंगराच्या पृथ्वीवर असलेल्या  वजनात फरक पडतो. तसेच हे डोंगर टेकडी एकमेकांना आतून बांधलेली असतात त्या मुळे अश्या लहान मोठ्या टेकडया फोडल्याने मोठं मोठ्या डोंगरावर त्याच्या मजबूती वर परिणाम होतो. तसेच धरण बांधणी मुळे कधी नसलेले एवढे वजन भूपृठावर पडते परिणामी हजारो वर्षात न झालेला बदल अचानक घडून येतो त्या मुळे भूकंप येतात. 
     Indian meteorology department  च्या संकेत स्थळाेवरून मिळालेल्या माहिती नुसार गेल्या आठवड्यात झालेल्या भूकंपाचे केंद्र बिंदू  तपासून असे लक्षात येते कि पालघर मध्ये बांधलेल्या डहाणू तलासरी आणि इतर भागात असलेले सर्व केंद्र बिंदू धारणा कडेच असल्याचे आढळून आले. भविष्यात विकासासाठी जर पालघर मध्ये आणखी शहर विकसित केल किंवा ठरल्याप्रमाणे मुंबई मेट्रो पोलिटिकल रिजन डेव्हलोपमेंट च्या रेंज बोईसर पर्यंत  वाढवून पालघर पण खूप जास्त कारखाने, शहरीकरण केल्यास त्या शहरीकरणा साठी खूप जास्त पाण्याची आवश्यकता लागेल परिणामी, धरणे बांधायला लागतील तसेच डोंगर फोडून रस्ते सिमेंट इत्यादी बनवलं जाईल त्या मुळे पालघर चे रूपांतर आधीच भूकंप प्रवण क्षेत्र 3 पासून अधिक होऊ शकते तसेच नवीन वासवलेले पूर्ण शहर क्षणारधात होत्याच नव्हतं होऊ शकते.
तसेच प्रस्तावित वाढवणबंदर येथे संपूर्ण पश्चिम किनारपटटी वर सर्वात खोल असलेल्या 22  मीटर खोल समुद्रात 2 किमी. रुंद आणि 8 किमी लांब एवढा मोठा भराव करायचा प्रस्तावित आहे. सदर भरावा साठी खूप मोठ्या प्रमाणात पालघर डहाणू परिसरातील डोंगर फोडावे लागणार. तसेच सदर खोल समुद्रात भराव केल्या मुळे समुद्रात देखील भूपृठावर बदल होईल परिणामी परिस्थिती आणखीन भयानक होईल. एवढ्या छोट्याश्या जिल्ह्यात एवढे सारे प्रकल्प केल्यास होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. 
वरील लेखा वरून शासनाने बोध घेऊन आपल्या जनतेचं हित लक्षात घ्येवून सर्व प्रकल्प त्वरित रद्द करावेत अन्यथा त्याचा परिणाम स्थानिक रहिवासी लोकांना भोगावा लागेल. 
तसेच बाहेर अमेरिकेत काय झाले कसा विकास केला??  इत्यादी गोष्टी जोडून घाणेरडे राजकारण करूनये अमेरिका चीन इत्यादी देश भारताच्या आकारमनाच्या तुलनेत खूप मोठे आहेत परिणामी त्यांचे प्रकल्प इत्यादी ठिकाणी विखूरलेले आहेत. त्या मुळे त्यांना वरील गोष्टीचा धोका कमी आहे हे लक्षात घेणं गरजेचे. तसेच तापमान वाढ महाराष्ट्रात झालेलं आवरशण 44% महाराष्ट्र वाळवंट झाल्याचा इस्रो चा अहवाल या वर्षी पडलेला कमी पाऊस, 180 तालुक्यातील दुष्काळ लक्षात घेता वेळीच जागे होण्याची गरज आहे. आणि जंगल बुडवून धरणे बांधणी, शेती घेऊन प्रकल्प आणणे, समुद्र गाडून बंदर बनवणे हे त्वरित थांबवून खरा विकास जंगल वाढवून नद्या नाले निर्मळ राखणं महत्वाचे. 
पालघर चा खरा विकास आता शेती फुलवून मासेमारी तसेच इतर शेती पूरक उद्योग धंदे वाढवून, निसर्ग संपदा राखून तसेच कोणत्याही आदिवासी, मच्छिमार आणि इतर समाज घटकाना विस्थापित न करता सहज शक्य आहे उगाच निसर्गाशी खेळून विनाश ओढून तुमच्या सोबत आम्हाला पण विनाशा कडे घेऊन जाऊ नका ही नम्र विनंती. अश्या प्रकारे केलेल्या विकासासाठी आम्ही कधीही सरकारच्या बाजूने उभे राहायला तयार आहोत.......
 सोबत भूकंपा चा केंद्र बिंदू असलेल्या gps स्थळाचे फोटो पाठवत आहोत ज्यात धरणे आणि भूकंप झालेल्या ठिकाणाचे satellite छायाचित्र जोडत आहोत.
 . 
 आपला विश्वासू 
प्रा. भूषण भोईर. 
8237150523
Reply all
Reply to author
Forward
0 new messages