लेखनात एक वेलांटी एक उकार वापरा.
मी मराठी लेखनात एक वेलांटी एक उकार वापरतो. त्यातुन अर्थ नीर्मीती
व्यवस्थीत साधली जाते ना? योग्य अर्थच तुमच्यापर्यंत पोचतो ना? भाषा
म्हणजे अचुक संवाद साधायचे साधन होय. मराठी भाषा शेकडो वर्षे मोडी लीपी
वापरत होती. मोडी लीपीत केवळ एक वेलांटी एक उकार होता. मराठीचा इतीहास एक
वेलांटी एक उकार हा आहे. देवनागरीचा स्वीकार केल्यावर कागदावरील मराठी
संस्कृत सारखी दीसु लागली. मराठीचे आजवरचे व्याकरण म्हणजे 'संस्कृतच्या
व्याकरणाला साजेलसे मराठी' होय. मराठीसाठी देवनागरीत काय, कसा व कीती बदल
करावा? हा वीचारच झाला नाही. परीणामी चुकीचे व्याकरण आणी पाळता न येणारे
'शुद्धलेखन नीयम' लादले गेले. अधिक आणी सवीस्तर माहीतीसाठी संपर्क साधा.