प्रस्थापित होण्याचा प्रश्न ,
आदिवासीनो ……
तुमच्या जवळ काय आहे ? तुमची जल ,जंगल , जमीन आमच्याचकडे आहे , आता तुम्ही औधोगीकरण , प्रकल्प , धरणग्रस्त बनून विस्थापित होवून जा , म्हणजे आम्हाला प्रस्थापित होता येईल …। आदिवासीनो ……
तुमच्या जवळ काय आहे ? तुम्ही , जंगली , नंगे ,वनवासी बनून भटकत राहा , ढोल , तासे ,वाजवीत राहा , मोहाची थोडी थोडी पिउन नाचत राहा , त्यामुळे कुपोषण , भुकमरी , नक्षलि बंदुकीने मेल्याचे बिलकुल दुःख होणार नाही आणि आम्हाला निडर जगता येईल …। आदिवासीनो ……
तुमच्या जवळ काय आहे ? तुमचे पुढारी , नेते आमच्याच पक्षाचे ऐकतात , लेखक , विचारवंत जागतिक करणावरची चर्चा आमच्याच इश्याऱ्यावर करतात , तुमच्या जवळ काय आहे ? तुम्ही विस्थापित होऊन जा , म्हणजे आम्हाला प्रस्थपित होता येईल …. Adv. MADAVI L K
|
‘’केदारनाथचा त्सुनामी कहर ‘’
पंचतारका हाटेलातील बिळात बसलेल्या पशुसारखे , विमानात बसून , आकाश्यात झेप घेणाऱ्या पक्ष्यासारखे सुपरम्यान बनू पाहत आहात …. आणि आम्हालाच लुचून लुचून आमचे चितळे वेशीवर टांगत आहात , पण आता , ... तुमच्यावर असलेली देवाची कृपा, अल्लाचा करम , येशूचा आशीर्वाद, वाहे गुरूचा रहम , आदीचा पर्दाफाश होत आहे, केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार सारख्या त्सुनामीच्या कहर मध्ये सर्व काही नष्ट होत आहे……. Adv. Madavi L K --- On Thu, 20/6/13, AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in> wrote: |
|